Fact Check: मदिनामध्ये नतमस्तक होताना (सजदा) नव्हता झाला व्यक्तीचा मृत्यू, फोटो पुन्हा व्हायरल
- By: Umam Noor
- Published: Oct 17, 2023 at 04:36 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). एका व्यक्तीचा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिला मशीदीच्या आवारात नतमस्तक होताना बघितले जाऊ शकते आणि जानमाझ (नमाजसाठी वापरली जाणारी एक छोटी चादर) तिच्यावर ठेवली आहे. आजूबाजूला उभे असलेले लोक हे दृश्य फोनवरून टिपताना दिसत आहेत. मदीना, सौदी अरेबियातील मशीद नबवी येथे प्रार्थना (नमाज) पढताना या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा धार्मिक भावनेच्या कोनातून वापरकर्ते करत आहेत.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासात असे आढळून आले की, फोटोत दिसणारी व्यक्ती मशीद नबवी येथे शुक्रवार (जुमा)च्या प्रार्थनेदरम्यान बेशुद्ध पडली होती, ही व्यक्ती नतमस्तक झालेली असतानाच्या दरम्यान मृत्यूचा दावा दिशाभूल करणारा आहे.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
व्हायरल पोस्ट शेअर करताना एका फेसबुक वापरकर्त्याने लिहिले की, “किती सुंदर मृत्यू आहे, नतमस्तक झालेल्या अवस्थेत मृत्यू आणि तोही #_मस्जिद_ए_नबवी मधील प्रार्थने दरम्यान. अल्लाहच्या सेवका (अल्लाह का बंदा)ला नतमस्तक होतानाचा त्याची वास्तविकता भेटली. मृत्यूही आला जेव्हा हा माणूस त्याच्या परमेश्वराच्या अगदी जवळ होता. अल्लाह आम्हा सर्वांनी अशाच प्रकारे नतमस्तक झालेलो असताना मरावे.”
तपास
व्हायरल फोटोची तपासणी करण्यासाठी, आम्ही गुगल रिव्हर्स इमेजद्वारे कीवर्डच्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधाच्या दरम्यान, आम्हाला 20 मार्च 2022 रोजी ‘अरब लोकल डॉट कॉम’ नावाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या या प्रकरणाशी संबंधित बातमी सापडली. येथे दिलेल्या माहितीनुसार, “आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या सौदीच्या रेड क्रिसेंट प्राधिकरणाने पुष्टी केली की, काल शुक्रवारी मस्जिद नबवी येथे तैनात असलेल्या रुग्णवाहिका पथकाला शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळी एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळली आणि तिला त्याच वेळी रुग्णालयात नेण्यात आले. मदीना अल-मुनावरा येथील सौदी रेड क्रिसेंट प्राधिकरणाच्या शाखेचे अधिकृत प्रवक्ते खालिद अल-साहली यांनी सांगितले की, शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान हा माणूस बेशुद्ध पडला होता. मात्र, त्याच्या मृत्यूची बातमी खोटी आहे.”
19 मार्च 2022 रोजी सौदी एक्सपॅट्रिएट्स वेबसाइटवरही या प्रकरणाची बातमी देण्यात आली होती. येथे देखील दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 18 मार्च रोजी घडले होते आणि शुक्रवारच्या प्रार्थने दरम्यान ही व्यक्ती बेशुद्ध पडली होती.
रेड क्रिसेंट प्राधिकरणाचे प्रवक्ते खालिद सहली यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर या प्रकरणावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मशीद नबवीमध्ये शुक्रवारची प्रार्थना पढत असताना एक व्यक्ती बेशुद्ध पडली होती. तिला तातडीने मदिना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याआधीही हा फोटो सोशल मीडियावर असाच भ्रामक दावा करून व्हायरल झाला होता आणि त्यावेळी आम्ही सौदी अरेबियाचे पत्रकार साद अल हरबी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या व्हायरल पोस्टला खोटे ठरवून सांगितले की, ती व्यक्ती फक्त बेशुद्ध पडली होती, पण हा फोटो प्रत्येक ठिकाणी खोट्या दाव्यांसह व्हायरल झाला.
फेसबुकवर ही दिशाभूल करणारी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक पेजच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की, या पेजचे 2 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला आपल्या तपासणीत असे आढळले की, फोटोत दिसणारी व्यक्ती मशीद नबवी येथे शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळी बेशुद्ध झाली होती, नतमस्तक झाल्याच्या दरम्यान मृत्यू झाल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.
- Claim Review : मशीद नबवी येथे नतमस्तक होत असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
- Claimed By : FB USER; मुस्लिम मुलींच्या गटात सामील व्हा
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.