X
X

Fact Check: हे चित्र गुजरात मधील बुलेट ट्रेन्स चे नाही, व्हायरल दावा खोटा

व्हायरल चित्र ज्यात दावा करण्यात येत आहे कि असंख्य बुलेट ट्रेन्स चे गुजरात चे आहे, ते वूहान, चीन येथील चित्र आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक दावा फेसबुक वर शेअर होत असलेला दिसला. ह्या दाव्यासोबत एक चित्र शेअर करण्यात आले होते. ह्या चित्रात असंख्य बुलेट ट्रेन्स दिसत होते. असा दावा करण्यात येत होता कि हे चित्र गुजरात चे आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हे चित्र गुजरात चे नसून, चीन मधील वूहान येथील असल्याचे समोर आले.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक पेज, Voice of Maharashtra, ने व्हायरल चित्र शेअर केले आणि लिहले: विश्वास बसणार नाही पण हा गुजरातचा फोटो आहे

हे चित्र आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने गूगल चा उपयोग करून तपास करण्यास सुरुवात केली.

आम्हाला हे चित्र ‘Civil Engineering Discoveries‘ नावाच्या फेसबुक पेज वर सापडले, त्याच्या कॅप्शन मध्ये लिहले होते कि हे चित्र चीन चे आहे.

आता हे स्पष्ट झाले होते कि चित्र चीन चे आहे, गुजरात चे नाही.

विश्वास न्यूज ला एक ट्विट सापडले, ह्या ट्विट मध्ये सांगितले होते कि हे चित्र वूहान येथे मेन्टेनन्स ची वाट बघत असलेल्या हाय स्पीड ट्रेन चे आहे.

आम्हाला हे चित्र गेटी इमेजस च्या साईट वर देखील सापडले.

तसेच आम्हाला हे चित्र alamy ह्या स्टॉक इमेजस साईट वर देखील सापडले. ह्या चित्रातील कॅप्शन मध्ये लिहले होते: High-speed trains wait to set off at the Wuhan Railway Station in Wuhan, central China’s Hubei Province. The Spring Festival Travel Rush started on February 1st, 2018, in China.

विश्वास न्यूज ला ह्या ट्रेन बद्दलचा एक व्हिडिओ New China TV ह्या युट्युब चॅनेल वर सापडला.

विश्वास न्यूज ने गुजरात मधील बुलेट ट्रेन्स बद्दल काही बातमी सापडते का ते देखील शोधून बघितले. आम्हाला एक बातमी सापडली ज्यात लिहले होते कि एल अँड टी कन्स्ट्रक्शन हि कंपनी गुजरात मध्ये साबरमती डेपो बांधेल.

बुलेट ट्रेन्स भारतात दाखल झाल्या असल्या तरी हे चित्र गुजरात मधील नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही गुजरात येथील एएनआय करस्पॉन्डन्ट सुरेश पारेख ह्यांना संपर्क केला. त्यांनी स्पष्ट केले कि हे चित्र गुजरात चे नाही.

आम्ही चीन मधील भारतीय डायस्पोरा च्या एका सदस्याला देखील संपर्क केला. त्यांनी देखील पुष्टी केली कि हे चित्र चीन मधील वूहान चे आहे.

तपासाच्या शेवटकच्या टप्प्यात आम्ही ‘Voice of Maharashtra’ ह्या पेज चा तपास केला. ह्या पेज ला बारा हजार लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: व्हायरल चित्र ज्यात दावा करण्यात येत आहे कि असंख्य बुलेट ट्रेन्स चे गुजरात चे आहे, ते वूहान, चीन येथील चित्र आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

  • Claim Review : चित्र गुजरात चे आहे
  • Claimed By : Voice of Maharashtra
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later