नवी दिल्ली (विश्वास न्यूज). गाझा पट्टीमध्ये मारल्या जात असलेल्या आणि जखमी होत असलेल्या लोकांना बनावट म्हणून वर्णन करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या एपिसोडमध्ये एक कोलाज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रत्येक फोटोमध्ये एक जखमी मुलगी एका व्यक्तीबरोबर दिसू शकते. फोटो शेअर करताना वापरकर्ते असा दावा करत आहेत की, या पॅलेस्टिनी मुलीची तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून, तीन वेगवेगळ्या दिवशी, तीन वेगवेगळ्या लोकांनी सुटका केली आहे.
विश्वास न्यूजला आपल्या तपासणीत असे आढळून आले की, व्हायरल होत असलेल्या फोटोचा इस्रायल-हमास युद्धाशी काहीही संबंध नाही. 2016 मध्ये सीरियातील अलेप्पो येथे बचावकार्य करताना काढलेला हा फोटो आहे. या मुलीला सीरियात झालेल्या स्फोटानंतर वाचविण्यात आले होते. बचाव करतानाच मुलीला वेगवेगळ्या लोकांनी पकडले होते. हा फोटो वेगवेगळ्या ठिकाणांशी संबधित असल्याचा जो दावा केला जात आहे, तो देखील खोटा आहे.
फेसबुकवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘या पॅलेस्टिनी मुलीला 3 वेगवेगळ्या लोकांकडून, 3 वेगवेगळ्या ठिकाणी, 3 वेगवेगळ्या दिवशी वाचवण्यात आले आणि सर्व ठिकाणे एकमेकांपासून 50 किलोमीटर अंतरावर आहेत. विशेषत: संघर्षाच्या क्षेत्रात ती इतकी दूर का प्रवास करत राहते, याचे आश्चर्य वाटते.”
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
आमची तपासणी सुरू केल्यावर आम्ही सर्वप्रथम गुगल लेन्सच्या माध्यमातून व्हायरल कोलेजेस शोधले. 27 ऑगस्ट 2016 रोजी अल जझीराच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका लेखात आम्हाला या व्हायरल फोटोसारखाच एक फोटो सापडला. तिथे देण्यात आलेल्या माहितीनुसार, “अलेप्पोच्या बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात बॅरल बॉम्ब हल्ल्यात अंत्यसंस्कारात सामील झालेले किमान 24 जण ठार तर इतर 30 जण जखमी झाले आहेत. सीरियन नागरिक सुरक्षा या स्वयंसेवक बचाव गटाने अल जझीराला सांगितले की, सीरियन सरकार आणि रशियन युद्ध विमानांनी शनिवारी अल-मादी परिसरात मारल्या गेलेल्या 15 महिला आणि मुलांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी जमलेल्या लोकांच्या गटावर हल्ला केला होता.”
व्हायरल कोलाजमध्ये तीन फोटो आहेत, यांचे आम्ही एक – एक करून फॅक्ट चेक केले आहेत.
पहिल्या छायाचित्रात बचाव कर्मचाऱ्याच्या मांडीवर दोन मुले दिसत आहेत. यात एक मुलगी देखील आहे जिच्याबद्दल व्हायरल दावा केला जात आहे.
गेट्टी इमेजेसवर देण्यात आलेल्या या फोटोमधील माहितीनुसार, ‘27 ऑगस्ट 2016 रोजी शासकीय विमानांनी कथितपणे स्फोटकांनी भरलेले बॅरल बॉम्ब टाकल्यानंतर पूर्व अलेप्पोच्या माडी जिल्ह्यात मुलांना घेऊन जाताना एक सीरियन बचाव कर्मचारी.’
दुसऱ्या फोटोत एक व्यक्ती पिवळ्या रंगाचा शर्ट घालून त्याच मुलीची सुटका करताना दिसत आहे.
हा फोटो देखील गेट्टी इमेजेसवर आम्हाला 27 ऑगस्ट 2016 रोजी सीरियातील अलेप्पो येथे झालेल्या स्फोटकांच्या स्फोटानंतरच्या बचावाच्या हवाल्यातून मिळाला आहे.
तिसऱ्या फोटोत, तीच मुलगी दुसऱ्या व्यक्तीच्या मांडीवर त्याच कपड्यात दिसत आहे.
या फोटोसह देण्यात आलेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या स्फोटानंतर हा अशा ठिकाणी हा फोटो घेण्यात आला आहे, जिथे बचावकर्ते लोकांना वाचवत आहेत.
जर तुम्ही या फोटोंचा सीक्वल पाहिला, तर तो काहीसा असा दिसतो.
पहिल्या फोटोत मुलीला बचाव कर्मचारी वाचवत आहे, नंतर दुसऱ्या फोटोत बचाव कर्मचारी मुलीला दुसऱ्या व्यक्तीच्या स्वाधीन करताना दिसून येत आहे, आणि त्याच व्यक्तीसह मुलीचा फोटो कोलाजचा तिसरा फोटो आहे. त्याच वेळी, कोलाजचा दुसरा फोटो शक्य आहे की त्या वेळेचा असेल, जेव्हा दुसऱ्या व्यक्तीने मुलीला पिवळा शर्ट घातलेल्या तरुण व्यक्तीच्या स्वाधीन केले असेल.
आम्हाला रॉयटर्सच्या वेबसाइटवर या मुलीचे आणखी फोटो बघायला मिळाले. एक फोटोमध्ये व्हायरल कोलेजमध्ये मुलीला एक व्यक्ती बरोबर पाहिले जाऊ शकते आणि दुसरा फोटोत ती बचाव व्हॅनमध्ये बसलेली दिसत आहे.
व्हायरल फोटोची पुष्टी करण्यासाठी आम्ही हे फोटो ज्याने काढले त्या छायाचित्रकार अमीर अल हलबीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांनी पुष्टी करताना सांगितले की, हे फोटो सीरियातील अलेप्पो येथे एकाच वेळी काढलेले आहेत.
बनावट पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की, “श्रीनिवास स्वैन” हा वापरकर्ता ओडिशाचा असून त्याचे फेसबुकवर तीन हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला आपल्या तपासणीत असे आढळून आले की, व्हायरल होत असलेल्या फोटोचा इस्रायल-हमास युद्धाशी काहीही संबंध नाही. 2016 मध्ये सीरियातील अलेप्पो येथे बचावकार्य करताना काढलेला हा फोटो आहे. या मुलीला सीरियात झालेल्या एका स्फोटानंतर वाचविण्यात आले होते. बचाव करतानाच मुलीला वेगवेगळ्या लोकांनी पकडले होते. हा फोटो वेगवेगळ्या ठिकाणांशी संबधित असल्याचा जो दावा केला जात आहे, तो देखील खोटा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923