Fact Check: गाझा येथे इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा फोटो, हमासच्या दहशतवादी तरूणाचा म्हणून केला जात आहे शेअर
विश्वास न्यूज यांना त्यांच्या तपासात या फोटोसह व्हायरल होत असलेली कथा चुकीची असल्याचे आढळून आली आहे. गाझा येथील दिया अल-अदीनी नावाचा हा तरुण इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाला होता. तो हमासचा दहशतवादी असल्याचा दावा चुकीचा आणि निराधार आहे.
- By: Umam Noor
- Published: Nov 25, 2024 at 06:05 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर एका तरुणाचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचे हात कापलेले आणि पट्टीने बांधलेले दिसून येत आहेत. खोटा प्रचार करण्याच्या उद्देशाने हा फोटो शेअर करताना, वापरकर्ते असा दावा करत आहेत की, फोटोमध्ये मोहम्मद महरूफ नावाचा एक दहशतवादी दिसत आहे, ज्याने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हल्ला केला होता आणि आता इस्रायलने त्याचे दोन्ही हात कापून त्याला अपंग करून सोडून दिले आहे.
विश्वास न्यूज यांना त्यांच्या तपासात या फोटोसह व्हायरल होत असलेली कथा चुकीची असल्याचे आढळून आली आहे. गाझा येथील दिया अल-अदीनी नावाचा हा तरुण इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाला होता. तो हमासचा दहशतवादी असल्याचा दावा चुकीचा आणि निराधार आहे.
काय आहे वायरल पोस्टमध्ये ?
व्हायरल पोस्ट शेअर करताना ‘आनंद कुमार’ या फेसबुक वापरकर्त्याने लिहिले की, “हा दहशतवादी मोहम्मद_महरूफ आहे, जो पॅलेस्टाईन गाझा येथील हमासचा दहशतवादी आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी गुप्तपणे इस्रायलवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये तो होता. आणि त्याने ज्यू मुलांचे तुकडे केले, त्यांचे मांस ओव्हनमध्ये शिजवले, त्यातील काही ओव्हनमध्ये जिवंत भाजून खाल्ले, त्यांच्यापैकी काहींना तलावात टाकले, त्यांच्यावर पेट्रोल ओतले आणि त्यांना आग लावली होती. खूप लहान आणि निष्पाप मुले होती ती… आज इस्रायलने त्याला नि:शस्त्र करून जिवंत सोडून दिले आहे… इस्त्रायल आपल्या शत्रूंचे असेच हाल करतो.”
या पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
तपास
आमचा तपास सुरू करून आम्ही सर्वप्रथम गुगल लेन्सद्वारे व्हायरल फोटोचा शोध घेतला. शोध घेतल्यावर, आम्हाला 31 ऑगस्ट रोजी गेट्टी इमेजेसच्या वेबसाइटवर अपलोड केलेला हा फोटो सापडला. येथे दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2024 रोजी इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात पॅलेस्टिनी तरुण दिया अल-अदीनीने त्याचे दोन्ही हात गमावले होते.
या आधारावर, आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि फोटो एजन्सी शटर स्टॉक आणि अलामीच्या वेबसाइटवर देखील अपलोड केलेला व्हायरल फोटो सापडला. येथे दिलेल्या माहितीनुसार, दिया अल-अदीनी हा गाझा येथे राहणारा तरुण असून, तो इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाला होता. येथेही हा तरुण हमासशी संबंधित असल्याचा उल्लेख आढळून आला नाही. त्याचवेळी, हा फोटो उमर अष्टावि यांनी काढला आहे.
आम्हाला शटरस्टॉक आणि अलामी वेबसाइटवर त्या तरुणाचे आणखी फोटो सापडले, जिथे तो त्याच्या कुटुंबासह पहिला जाऊ शकतो.
28 ऑगस्ट 2024 रोजी अरब न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली हल्ल्यात जखमी झाल्यानंतर, तरुण दिया अल-अदीनी त्या काही पॅलेस्टिनींपैकी एक आहे, ज्यांना एक कार्यरत रुग्णालय सापडले. पण त्यांच्या हातांना इतक्या जखमा झाल्या होत्या की, डॉक्टरांना ते कापावे लागले. तथापि, इस्रायली सैन्याने त्यावेळी हमास विरुद्धच्या युद्धात हल्ला करण्यापूर्वी रुग्णालयातील रहिवाशांना तेथून जाण्याचे आदेश दिले. त्यात 15 वर्षीय आदिनीचाही समावेश होता.
आम्हाला रॉयटर्स आणि टीआरटी वर्ल्डच्या वेबसाइटवर दिया अल-अदीनीशी संबंधित तपशीलवार बातमी देखील मिळाली. दिलेल्या माहितीनुसार, संघर्षादरम्यान अनेक पॅलेस्टिनी विस्थापित झाले आहेत. अदिनीसारख्या पॅलेस्टिनींसाठी त्यांचे जीव वाचवण्यासाठी संघर्ष करणे विशेषतः कठीण आहे. त्यांना तातडीने वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते, परंतु ते युद्धाच्या अराजकतेमध्ये अडकलेले असतात. या बातमीतही अदिनीचा हमासशी संबंध असल्याची कोणतीही माहिती आम्हाला मिळाली नाही.
पॅलेस्टाईनची न्यूज एजन्सी, वाफाच्या यूट्यूब चॅनलवर आम्हाला अदिनीचा एक व्हिडिओ सापडला आहे, ज्यामध्ये तो तिच्या बहिणीसोबत त्याच्या घरात दिसत आहे. इथेही हमासचा अदिनीशी संबंध असल्याची कोणतीही माहिती मिळाली नाही.
तपास पुढे नेत, आम्ही अदिनीचा फोटो घेणारे छायाचित्रकार उमर अष्टावि यांच्याशी इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. त्यांनी आम्हाला सांगितले की, अदिनीबद्दल केलेले हे खोटे दावे आपल्याला माहीत आहेत आणि हे पूर्णपणे चुकीचे दावे आहेत. अदिनी हा गाझाचा एक सामान्य नागरिक असून त्याचा हमासशी कोणताही संबंध नाही. आम्हाला माहिती देताना त्यांनी असेही सांगितले की, ते स्वतः आदिनीच्या घरी गेले आहेत.
आता फेक पोस्ट शेअर करणाऱ्या ‘आनंद कुमार’ या फेसबुक वापरकर्त्याचे सोशल स्कॅनिंग करण्याची वेळ आली होती. आम्हाला आढळले की, वापरकर्त्याद्वारे विशिष्ट विचारधारेशी संबंधित पोस्ट शेअर केल्या जातात, त्याच वेळी, वापरकर्त्याला 19 हजार लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज यांना त्यांच्या तपासात आढळले की, या फोटोसोबत व्हायरल केली जात असलेली कथा चुकीची आहे. गाझा येथील दिया अल-अदीनी नावाचा हा तरुण इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाला होता. तो हमासचा दहशतवादी असल्याचा दावा चुकीचा आणि निराधार आहे.
- Claim Review : फोटोमध्ये हमासचा दहशतवादी आहे, ज्याने इस्रायलवर हल्ला केला होता, आणि आता इस्रायलने त्याचे दोन्ही हात कापून टाकले आहेत.
- Claimed By : FB User- Anand Kumar
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.