X
X

Fact Check: अफगाणिस्तानमध्ये व्हिसासाठी जमलेल्या गर्दीचे जुने चित्र, आता पाकिस्तानविषयीचे चित्र म्हणून व्हायरल झाले आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पाकिस्तानातील आर्थिक संकट सतत गडद होत चालले आहे. या आर्थिक संकटाशी निगडीत गर्दीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. चित्र शेअर करून दावा केला जात आहे की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबतचा करार रद्द झाल्यानंतर, पाकिस्तान सोडण्यासाठी व्हिसा मागणाऱ्या लोकांच्या जमावावर इस्लामाबादमध्ये लाठीचार्ज करण्यात आला. सोशल मीडियावर अनेक वापरकर्ते, हे चित्र सत्य असल्याचे मानून शेअर करत आहेत. विश्वास न्यूजला आपल्या तपासात असे आढळून आले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले चित्र, अफगाणिस्तानमधील जलालाबादचे आहे. खरेतर, 21 ऑक्टोबर, 2020 रोजी हजारो अफगाण नागरिक व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी जलालाबाद येथील पाकिस्तान वाणिज्य दूतावासात जमले होते आणि त्याचवेळी, वाणिज्य दूतावास समोरील क्रीडांगणावर जमलेल्या लोकांच्या प्रचंड गर्दीत टोकन वाटप सुरू असताना चेंगराचेंगरी झाली होती व्हायरल झालेला फोटो त्याच काळातील आहे, ज्यास आता पाकिस्तानचा असल्याचे सांगून शेअर केले जात आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

‘सनातन के सेवक’ या फेसबुक पेजने, 15 फेब्रुवारी रोजी व्हायरल झालेला फोटो शेअर लिहिले आहे की, “ही आली आहे जीवाला शांतता देणारी बातमी की, आयएमएफ (IMF)ने पाकिस्तानला कर्ज दिले नाही, मग पाकिस्तानात ही बातमी चर्चेत आहे की, देश वाचणार नाही; ज्यांच्याकडे पासपोर्ट आहेत, ते देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा फोटो इस्लामाबादहून आला आहे, परदेशात पळून जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी चेंगराचेंगरी झाली आहे. लाठीचार्ज झाल्याची बातमी आहे. मोदीजींनी काय डाव खेळला आहे. दिल्लीत बसून एकही गोळी न चालवता पाकिस्तानला केले चीत.”

अनेक वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ, तशाच आणि मिळत्या-जुळत्या दाव्यांसह शेअर केला आहे. व्हायरल पोस्टची संग्रहित लिंक येथे पहिली जाऊ शकते.

तपास

व्हायरल चित्राची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही गुगल लेन्सचा वापर केला. यादरम्यान, आम्हला अनेक न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये हे चित्र पाहायला मिळाले. CGTN.com वेबसाइटवर 21 ऑक्टोबर, 2020 रोजी प्रकाशित झालेल्या बातम्यांमध्ये व्हायरल चित्राचा वापर करण्यात आला होता. चित्रासह दिलेल्या माहितीनुसार, “पूर्व अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबाद शहरात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोक ठार झाले आणि 13 जण जखमी झाले. निवेदनात म्हटले आहे की, हजारो लोक व्हिसा घेण्यासाठी सकाळी पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावास जवळील फुटबॉल स्टेडियममध्ये जमले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि परिणामी, यामध्ये महिला आणि लहान मुलांसह अकरा जणांचा मृत्यू झाला असून 10 महिला आणि तीन पुरुषांसह 13 जण जखमी झाले आहेत. येथे संपूर्ण बातमी वाचा.

शोधाच्या दरम्यान, आम्हाला लोकमार्ग डॉट कॉमच्या वेबसाइटवर व्हायरल चित्र देखील सापडले. 21 ऑक्टोबर, 2020 रोजी प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, “अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांताची राजधानी असलेल्या जलालाबाद शहरात पाकिस्तानी व्हिसा शोधणार्‍यांच्या मोठ्या गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 12 महिला ठार आणि 12 जण जखमी झाले. घटनेच्या वेळी जलालाबादमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ जमाव जमला होता.

तपासादरम्यान, आम्हाला 22 ऑक्टोबर, 2020 रोजी गो फ्रीस्टी नावाच्या फेसबुक पेजवर शेअर केलेले व्हायरल चित्र देखील सापडले. फोटो कॅप्शनसह शेअर केला होता, “पूर्व अफगाणिस्तानमधील गर्दीच्या स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 12 महिलांचा मृत्यू झाला. वैद्यकीय उपचारांसाठी पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी व्हिसा मिळण्याच्या आशेवर असलेल्या हजारो महिलांमध्ये या महिला होत्या.

21 ऑक्टोबर, 2020 रोजी ‘व्हॉईस ऑफ अमेरिका’च्या सत्यापित फेसबुक पेजवर देखील ते शेअर केले गेले. आतापर्यंतच्या आमच्या तपासात हे चित्र जुने असून, अफगाणिस्तानातील जलालाबादचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिक माहितीसाठी, आम्ही पाकिस्तानच्या आज टीव्हीचे वरिष्ठ सामग्री निर्माता, आदिल अली यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी व्हायरल फोटो शेअर केला. त्यांनी आम्हाला सांगितले की, लोकांना पाकिस्तान सोडायचे आहे हे खरे आहे, पण व्हायरल झालेला फोटो पाकिस्तानचा नाही. पाकिस्तानच्या कोणत्याही दूतावासाबाहेर अशी परिस्थिती नाही.

शोधाच्या दरम्यान, आम्हाला 16 फेब्रुवारी, 2023 च्या अल जझीराची बातमी सापडली. जिच्यामध्ये माहिती देण्यात आली आहे की, “पाकिस्तान सरकारने, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)कडून रोखीच्या अडचणीत सुरक्षित निधीची मदत करण्यासाठी 170 अब्ज रुपये (643 दशलक्ष अमेरिकन डॉलर)चे वित्त विधेयक सादर केले आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान आयएमएफ (IMF)कडे कर्जाची मागणी करत आहे, मात्र आयएमएफ (IMF)ने पाकिस्तानसमोर अनेक जाचक अटी ठेवल्या आहेत.

तपासाअंती, आम्ही व्हायरल चित्र शेअर करणाऱ्या वापरकर्त्याची चौकशी केली. फेसबुकवर या वापरकर्त्याचे 1000 पेक्षा जास्त मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे. वापरकर्ता एका विशिष्ट विचारसरणीने प्रभावित आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासणीत पाकिस्तान सोडण्याच्या नावाखाली जमावाच्या फोटोबाबत व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. व्हायरल झालेला फोटो, पाकिस्तानचा नसून अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरातील जुना फोटो आहे. ज्यास आता अलीकडचे म्हणून शेअर केले जात आहे आणि त्यास पाकिस्तानशी जोडले जात आहे.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later