Fact Check: व्हायरल व्हिडिओ, 2017 मधील डरबन समुद्री वादळाचा आहे, तुर्कीच्या भूकंपाचा नाही

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): तुर्की आणि सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये या देशांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्सुनामीसारख्या मोठ्या लाटा किनारी भागात आदळताना दिसत आहेत. सोमवारी तुर्कस्तानमध्ये 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर, अडानामध्ये ही त्सुनामी आल्याचा दावा या व्हिडिओसह करण्यात आला आहे. विश्वास न्यूजने व्हिडिओची तपासणी केली असता असे आढळून आले की, हा व्हिडिओ, भ्रामक दावा करून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ 2017मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डर्बनला आलेल्या समुद्री वादळाचा आहे.

दावा:

व्हायरल व्हिडिओ (आर्काइव्ह लिंक) शेअर करत, सोशल मीडिया युजर, सलमान डी अलीने लिहिले की, “त्सुनामी सा अडाना, तुर्की मटपास आंग नपाकलकास ना लिंडोल ना तुममा सा रेजिओनियों कहापोन. #PrayForTurkey #PrayForSyria #Tsunami #earthquake. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अनेक युजर्सनीही हाच दावा करत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

तपास:

या व्हायरल व्हिडिओचा तपास करण्यासाठी विश्वास न्यूज टीमने रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून व्हायरल व्हिडिओचा मूळ स्त्रोत शोधला. रिव्हर्स इमेज सर्चमध्ये आम्हाला एक्सप्रेसो शो नावाच्या यूट्यूब चॅनेलवर हाच व्हिडिओ सापडला.

हा व्हिडिओ पाच वर्षांपूर्वी एका न्यूज बुलेटिनमध्ये पेजवर अपलोड करण्यात आला होता. 14 मार्च, 2017 रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओ बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील डरबनमधील ब्राहिमा फोफाना समुद्रकिनाऱ्याजवळील समुद्री वादळाचा आहे.

12 मार्च, 2017 रोजी अपलोड करण्यात आलेल्या सन न्यूजपेपरच्या यूट्यूब चॅनेलवरही हा व्हिडिओ युट्युब सर्चमध्ये सापडला होता.
या व्हायरल व्हिडिओसंदर्भात आम्ही तुर्कीची तथ्य तपासणी संस्था, टीटशी संपर्क साधला. अडानामध्ये त्सुनामीची कोणतीही माहिती नाही आणि व्हायरल होत असलेला व्हिडिओ, तुर्कीचा नसून दक्षिण आफ्रिकेतील असल्याचे त्यांनी सांगितले.

वृत्तसंस्था एएफपीने (AFP) दिलेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे आतापर्यंत 16,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

तुर्कीमध्ये 14,000 हून अधिक, तर सीरियात 3,000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

विशेष म्हणजे तुर्की-सीरिया भूकंपानंतर सोशल मीडियावर अनेक जुने आणि असंबंधित व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, ज्यांचा नुकत्याच झालेल्या भूकंपाशी काहीही संबंध नाही. भ्रामक दाव्यासह व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरला फेसबुकवर 4,000 हून अधिक लोकांनी फॉलो केले आहे.

निष्कर्ष: दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे 2017 मध्ये आलेल्या सागरी वादळाचा एक व्हिडिओला, तुर्कीमधील विनाशकारी भूकंपामुळे अडाना येथे निर्माण झालेली त्सुनामी म्हणून शेअर केला जात आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट