Fact check: CNN चा चीन बद्दल बनावटी ट्विट व्हायरल

व्हायरल सीएनएन ट्विट बनावटी आहे. सीएनएन ने असे कुठलेच ट्विट चीन बद्दल केले नाही.

Fact check: CNN चा चीन बद्दल बनावटी ट्विट व्हायरल

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक पोस्ट व्हायरल होताना सोशल मीडिया वर दिसला. पोस्ट मध्ये सीएनएन च्या ट्विट चा स्क्रीनशॉट बघायला मिळतो. ट्विटमध्ये म्हटले आहे की लीक झालेल्या चिनी भू-राजकीय धोरण दस्तऐवजातून चीनचा आत्मविश्वास दिसून येतो. विश्वास न्यूजने तपासात सीएनएनचे ट्विट बनावट असल्याचे आढळले. व्हायरल पोस्ट खोटी आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर ‘Lord Miles Routledge Adventures’ ने व्हायरल पोस्ट ट्विटर वर पोस्ट केले आणि लिहले: Half of people think china is collapsing and the other half think china is doing great, however, idk anyone who thinks the west is doing great

स्क्रीनशॉट मध्ये लिहले होते: A leaked Chinese geopolitical strategy document reveals China’s self-confidence. The document predicts,”The US and Western Europe will collapse due to cultural and demographic conflict by 2050.” China’s leaders increasingly see multiculturalism as “cultural suicide” and believe the west is dying because of it.

हा पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात ह्या ट्विट ला निरखून पाहण्यापासून केली. हा ट्विट जून २ रोजी केल्याचे लक्षात आले.

विश्वास न्यूज ने त्या नंतर सीएनएन च्या सोशल मीडिया प्रोफाईल्स चा तपास केला.

आम्हाला सीएनएन द्वारे असे कुठले ट्विट केल्याचे दिसले नाही.

त्या नंतर आम्ही स्क्रीनशॉट मधला मजकूर कॉपी करून शोधला.

विश्वास न्यूज ला असे मजकूर कुठेच दिसले नाही.

तसेच विश्वास न्यूज च्या लक्षात आले कि कॅरेक्टर काउंट पेक्षा जास्ती मजकूर होता.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने, Matt Dornic, हेड ऑफ स्ट्रेटिजिक कॉयुनिकेशन, सीएनएन ह्यांना संपर्क केला. त्यांनी म्हंटले कि सीएनएन ने अशी बातमी पब्लिश केली नाही आणि तसेच, ट्विटर वर देखील पोस्ट केलेली नाही. व्हायरल स्क्रीनशॉट खोटा आहे.

तपासाच्या शेवटच्या विश्वास न्यूज ने स्क्रीनशॉट पोस्ट करणाऱ्या ट्विटर यूजर चा तपास केला. Lord Miles Routledge Adventures चे 114.7K फॉलोवर्स आहेत.

निष्कर्ष: व्हायरल सीएनएन ट्विट बनावटी आहे. सीएनएन ने असे कुठलेच ट्विट चीन बद्दल केले नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट