नवी दिल्ली (विश्वास न्यूज). 6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन्ही देशांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा 50 हजारांवर पोहोचला आहे. भूकंप झाल्यापासून सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या फेक न्यूज, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तरीही जुना आणि संबंधित नसलेला व्हिडीओ व्हायरल करून खोटेपणा पसरवला जात आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगी एका लहान मुलाला शांत करताना आणि आईप्रमाणे तिला सांभाळताना दिसत आहे. सोशल मीडियावर काही वापरकर्ते, हा व्हिडिओ तुर्की भाषेत असल्याचा दावा करत आहेत.
विश्वास न्यूजने तपास केला असता हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल झालेला व्हिडिओ बराच जुना आहे. तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपाशी त्याचा काहीही संबंध नाही. व्हायरल व्हिडिओ, नोव्हेंबर 2022 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे, ज्यास आता तुर्की भूकंपाशी जोडून शेअर केला जात आहे.
फेसबुक वापरकर्ता शहीद बाबाने 10 फेब्रुवारी, 2023 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक निष्पाप मुलगी, आपल्या भावाचे आई म्हणून सांत्वन करत आहे … आई जगली नाही म्हणून लहान मुलगी आपल्या भावाला खायला घालण्याचा अभिनय करत आहे जेणेकरून तिचा लहान भाऊ गप्प बसेल. हे अल्लाह दया कर.”
#तुर्कीसीरियाभूकंप
फेसबुक पोस्टची सामग्रीला, येथे आहे तशी लिहिले गेले आहे. त्याची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.
सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर देखील इतर अनेक वापरकर्त्यांनी याच दाव्यासह पोस्ट शेअर केली आहे.
ट्विटर वर ही वापरकर्ते या व्हिडीओला, याच डाव्यासह शेअर करत आहेत.
विश्वास न्यूजने प्रथम इनव्हिड टूलच्या सहाय्याने व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या अनेक ग्रॅब्स घेतल्या. मग गुगल लेन्स टूलच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. या दरम्यान, आम्हाला 13 फेब्रुवारी, 2023 रोजी ओसा एरिक नावाच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केलेला एक व्हायरल व्हिडिओ आढळला. कॅप्शनमध्ये या व्हिडिओला तुर्कीमधील भूकंपाचा सांगण्यात आले आहे, परंतु व्हिडिओवर टिक टॉक अकाउंट anelya.495चा लोगो आहे.
तपास पुढे नेत, टूल्सच्या मदतीने आम्ही anelya.495चे टिक टॉक खाते स्कॅन करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, व्हायरल व्हिडिओ 26 नोव्हेंबर, 2022 रोजी शेअर करण्यात आला होता. या अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेल्या मुलीचे इतरही अनेक व्हिडिओ आम्हाला आढळले. या अकाऊंटवर मुलाच्या बालपणीचे इतरही अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
टिक टॉकवर Anelya.495 अकाऊंट सतत सक्रिय असते. तारकिया येथील भूकंपानंतरही या मुलीचे अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. मुलीचा नाचतानाचा शेवटचा व्हिडिओ 20 फेब्रुवारी, 2023 रोजी anelya.495 या अकाउंटवर शेअर करण्यात आला होता.
अधिक माहितीसाठी, आम्ही तर्कीच्या फॉरेन मीडिया असोसिएशनशी मेलद्वारे संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, व्हायरल दावा खोटा आहे. या व्हिडिओचा तुर्कीमधील भूकंपाशी काहीही संबंध नाही.
मुलीचा हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे याची खात्री, विश्वास न्यूज स्वतंत्रपणे करू शकत नाही, मात्र हा व्हिडीओ तुर्कीमधील भूकंपाच्या आधीचा असून बराच जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही खोटी पोस्ट अनेक लोकांनी शेअर केली आहे, ज्यात एक फेसबुक वापरकर्त्याचा समावेश आहे ज्याच्या पोस्टची आम्ही तपासणी केली आहे. प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, वापरकर्ता, हैदराबादमध्ये राहतो आणि मूळचा बगहा येथील आहे. फेसबुकवर या वापरकर्त्याचे 4,832 मित्र आहेत आणि 5700 हून अधिक लोक, वापरकर्त्याला फॉलो करतात.
निष्कर्ष: एका लहान मुलाची काळजी घेत असलेल्या मुलीचा व्हायरल व्हिडिओ खूप जुना आहे, त्याचा तुर्कीमधील भूकंपाशी काहीही संबंध नाही. व्हायरल व्हिडिओ नोव्हेंबर 2022 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे, जो आता तुर्की भूकंपाशी जोडून शेअर केला जात आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923