विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. हिंदूंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा हा व्हायरल फोटो आहे. जो आता दिशाभूल करणारा दावा करून शेअर केला जात आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे ज्यात त्यांनी भगवा स्कार्फ परिधान करून पदाची शपथ घेतल्याचा दावा केला जात आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा निघाला. हिंदूंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान चा हा फोटो ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा आहे. जो आता दिशाभूल करणारा दावा करून शेअर केला जात आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Prashant Gupta ने व्हायरल पोस्ट करून लिहले: “ऑस्ट्रेलिया के नए प्रधानमंत्री एंथनी अल्बानीस, भगवा रग की पटिका धारण कर पद की शपथ ली..जय श्री राम।”
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून फोटो शोधला. या दरम्यान, आम्हाला 14 मे 2022 रोजी द गार्डियनच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या व्हायरल दाव्याशी संबंधित एक रिपोर्ट सापडली. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे व्हायरल फोटो ऑस्ट्रेलियातील पररामट्टा भागात हिंदूंनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान घेतले होते. त्यावेळी अँथनी अल्बानीज हे पंतप्रधान नव्हते तर विरोधी पक्षनेते होते. एबीसी न्यूजनेही हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही काही कीवर्डद्वारे गुगलवर सर्च केले. यादरम्यान, आम्हाला 7 मे 2022 रोजी Hindu Council of Australia अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हायरल दाव्याशी संबंधित एक ट्विट सापडले. Hindu Council of Australiaने 7 मे 2022 रोजी या कार्यक्रमाशी संबंधित व्हिडिओ आपल्या फेसबुक पेज वर शेअर केला होता.
तपासादरम्यान, आम्हाला 6 मे 2022 रोजी Anthony Albaneseच्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केलेल्या व्हायरल प्रतिमेशी संबंधित एक ट्विट आढळले. समारंभाचे काही फोटो शेअर करत Anthony Albanese यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज रात्री पररामट्टा येथे हिंदू धर्म आणि उपखंडातील समुदायांच्या नेत्यांसोबत भेट.”
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही Anthony Albanese च्या शपथ ग्रहण समारोहाबद्दल सर्च करण्यास सुरु केले. आम्हाला एक व्हिडिओ 9 News Australia नावाच्या युट्युब चॅनेल वर 23 मे 2022 रोजी अपलोड केलेला मिळाला. व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसते कि त्यांनी भगवा स्कार्फ घातला नाही.
अधिक माहितीसाठी आम्ही ऑस्ट्रेलियातील एका स्वतंत्र पत्रकाराशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. हा फोटो अँथनी अल्बानीज पंतप्रधान होण्यापूर्वीचा आहे. पंतप्रधानांच्या शपथविधीच्या काही आठवड्यांपूर्वी ते हिंदूंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. तेव्हा हे चित्र काढले. शपथविधीवेळी त्यांनी भगवा स्कार्फ घातला नव्हता.
विश्वास न्यूजने तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, व्हायरल पोस्ट शेअर केलेल्या प्रोफाइलचा बॅकग्राउंड चेक केला. आम्हाला कळले कि त्यांना 797 लोक फॉलो करतात. Prashant Gupta हे बिहारचे रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. हिंदूंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा हा व्हायरल फोटो आहे. जो आता दिशाभूल करणारा दावा करून शेअर केला जात आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923