X
X

Fact Check: मुंबईच्या एक सामान्य मानसाच्या फोटोशी छेडछाड करून त्यावर लावण्यात आला पुतिन यांचा चेहरा

नई दिल्ली (विश्वास न्यूज). रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर हा फोटो व्हायरल करताना काही युजर्स हा व्हायरल फोटो पुतिन यांचा असल्याचा दावा करत आहेत. त्यांना हैद्राबादच्या बरकास मध्ये पाहण्यात आले. सोशल मीडियावर काही युजर्स यास एक विनोद म्हणून व्हायरल करत आहेत, तर काही जण त्यास खरे मानत आहेत. विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या पोस्टची तपासणी केली. हा दावा खोटा ठरला.

मुंबईतील एक जुन्या फोटोला एडिट करण्यात आले असून, पुतिन यांच्या चेहऱ्याचा वापर करून एक व्हायरल फोटो तयार करण्यात आला आहे. मूळ फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरनेही याला दुजोरा दिला.

काय व्हायरल होत आहे

फेसबुक पेज ऑनलाइन ट्रेडिंगने, 25 फेब्रुवारी रोजी व्हायरल फोटो पोस्ट करत लिहिले की, “राष्ट्राध्यक्ष पुतिन हैदराबादच्या बरकास मध्ये दिसले.”

ही पोस्ट खरी मानून, इतर युजर्सही ती व्हायरल करत आहेत. त्याची संग्रहित आवृत्ती येथे पाहता येईल.

तपासणी

पुतीन यांच्या नावाने व्हायरल झालेल्या फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने सर्वप्रथम गुगल लेन्स टूलचा वापर केला. या टूलच्या माध्यमातून सर्च केल्यावर ड्रीमटाइम नावाच्या वेबसाईटवर खरे चित्र सापडले. या फोटो विषयी सांगण्यात आले आहे की,12 जानेवारी, 2015 चा हा फोटो, मुंबई येथील आहे. या चित्रास येथे पाहिले जाऊ शकते. फोटोग्राफर, पॉल प्रेस्कॉट यांनी हा फोटो काढला आहे.

तपास पुढे नेत व्हायरल आणि रिअल फोटोचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. कोणीतरी मुद्दाम मूळ चित्राचा चेहरा एडिट करून पुतिन यांचा चेहरा वापरल्याचे समोर आले. तुम्ही खाली खरे आणि खोटे चित्र पाहू शकता.

विश्वास न्यूजने तपास पुढे नेत पॉल प्रेस्कॉट यांच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. त्यांच्यासोबत व्हायरल झालेला फोटो शेअर केला. त्यांनी सांगितले की मूळ फोटो त्यांची काढला होता. कोणीतरी त्याच्या मूळ चित्राशी छेडछाड करून हे बनावट चित्र तयार केले आहे.

तपासाअंती फेक पोस्ट करणाऱ्या युजरची चौकशी करण्यात आली. फेसबुक पेज ऑनलाइन ट्रेडिंगवर व्हायरल मजकूर अधिक अपलोड लेले जात असल्याचे आढळून आले.

निष्कर्ष: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नावाने व्हायरल झालेला एक फोटो खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबईतील एका सामान्य माणसाचा जुना फोटो एडिट करून पुतिन यांच्या चेहऱ्याचा वापर करून व्हायरल फोटो तयार करण्यात आल्याचे विश्वास न्यूजच्या तपासात समोर आले आहे.

  • Claim Review : राष्ट्रपती पुतिन हैदराबादच्या बरकसमध्ये दिसले.
  • Claimed By : फेसबुक पेज ऑनलाइन ट्रेडिंग
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later