नवी दिल्ली (विश्वास न्यूज). कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढल्यानंतर सोशल मीडियावर त्यासंबंधीचे मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. अशापैकी एका मेसेजमध्ये लोकांना इशारा दिला जात आहे की, जर एखाद्याला कोरोना लसीच्या संदर्भात एखादा कॉल आला आणि तुम्हाला एक किंवा दोन नंबर दाबण्यास सांगितले, तर तुम्ही तसे करताच तुमचा फोन हँग होईल. काही वापरकर्ते दावा करत आहेत की, हा संदेश राजस्थान पोलिसांनी जारी केला आहे, तर काही म्हणतात की, तो महाराष्ट्र पोलिसांनी जारी केला आहे.
विश्वास न्यूजला आपल्या तपासात आढळले आहे की, राजस्थान आणि महाराष्ट्र पोलिसांनी अशी कोणतीही सूचना जारी केलेली नाही. सोशल मीडियावर बनावट दावा शेअर केला जात आहे.
विश्वास न्यूजच्या टिपलाइन नंबर +91 95999372 वर वापरकर्त्याने ही पोस्ट पाठवून, तिची सत्यता कळविण्याची विनंती केली आहे.
फेसबुक वापरकर्ता Danish Khan (संग्रहित लिंक)ने 29 डिसेंबरला अशा प्रकारचा मेसेज पोस्ट केला आहे. त्यात लिहिले आहे की,
“जर तुम्हाला कॉल आला आणि तुम्हाला विचारले गेले की, तुम्ही कोरोनाची लस घेतली आहे का, तर 1 दाबा, तुम्ही लस घेतली नसेल, तर तुम्हाला 2 दाबण्याचा पर्याय दिला जाईल, पण तुम्ही एक किंवा दोन नंबर दाबला, तर तुमचा मोबाइल हँग होईल आणि तुमचा सर्व बँक तपशील बंद होईल आणि तो तपशील कॉलरकडे जाईल, त्यामुळे असा कॉल आल्यास, तो ताबडतोब डिस्कनेक्ट करा, हा संदेश सर्वत्र पाठवा.
महाराष्ट्र-पोलीस”
फेसबुक वापरकर्ता Sudhir Godara (संग्रहित लिंक)ने हा संदेश जयपुर पोलिसांचा असल्याचे सांगितले आहे.
व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही सर्वात प्रथम कीवर्ड वापरून गुगलवर याबद्दल शोध घेतला, परंतु आम्हाला असा कोणताही मीडिया अहवाल सापडला नाही. आम्ही महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत एक्स हँडल स्कॅन केले. यावरही आम्हाला अशी कोणतीही पोस्ट आढळली नाही.
महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवरही अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
28 डिसेंबर 2020 रोजी, ठाणे शहर पोलिसांनी कोविड लसीकरणाच्या नावाखाली आधार किंवा ओटीपी मागणाऱ्या भामट्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यात व्हायरल मेसेजसारखी कोणतीही माहिती मिळाली नाही.
याबाबत मुंबईचे एएनआय के संवाददाता प्रमोद शर्मा यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी कोणतीही सूचना जारी केलेली नाही.
त्याच्या नंतर आम्ही राजस्थान पोलिसांचे सोशल मीडिया एक्स आणि फेसबुक यांना स्कॅन केले, परंतु अशी कोणतीही पोस्ट आढळली नाही.
आम्ही याबद्दल राजस्थान पोलिसचे पीआरओ गोविंद पारीक यांच्याशी बोललो आणि त्यांना व्हायरल पोस्ट पाठवली. त्यांचे म्हणणे आहे की, “राजस्थान पोलिसांनी अशी कोणतीही सूचना जारी केलेली नाही. अलीकडे असे एकही प्रकरण समोर आलेले नाही. खोट्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.”
त्याचवेळी जयपूर पोलीस आयुक्त यांचे पीआरओ हेत प्रकाश व्यास यांनीही असा कोणताही संदेश खोटा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “जयपूर पोलिसांनी असा कोणताही संदेश जारी केलेला नाही.”
एएनआयच्या हवाल्याने 29 डिसेंबर रोजी दैनिक जागरणच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीत असे लिहिले आहे की, शुक्रवारी देशात कोरोनाचे 797 रुग्ण आढळले आहेत. यानंतर सक्रिय प्रकरणांची संख्या 4,091 झाली आहे.
खोटा दावा करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याचे प्रोफाइल आम्ही स्कॅन केले. तो सहारनपूरमध्ये राहतो आणि त्याचे जवळपास 5800 फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: लसीबाबतच्या फसवणुकीविरुद्ध चेतावणी देणारा संदेश ना राजस्थान पोलिसांनी जारी केला आहे, ना महाराष्ट्र पोलिसांनी. सोशल मीडियावर व्हायरल झालेला दावा खोटा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923