Fact-check: भगवान राम चे टाइम्स स्क्वेयर वरचे व्हायरल छायाचित्र खोटे आहे

५ ऑगस्ट रोजी टाइम्स स्क्वेयरवर भगवान श्री राम यांचे छायाचित्र दर्शविले गेले पण व्हायरल असलेले च्याचीत्र ते नव्हे. व्हायरल छायाचित्र खोटे आहे.

Fact-check: भगवान राम चे टाइम्स स्क्वेयर वरचे व्हायरल छायाचित्र खोटे आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): जेव्हा पासून अयोध्या भूमिपूजन च्या अवसर वर टाइम्स स्क्वेयरवर भगवान राम यांचे छायाचित्र तिथल्या बिलबोर्ड वर लागण्याच्या बातम्या आल्या, तेव्हा पासून सोशल मीडिया वर बरेच छायाचित्र व्हायरल होत असतानाचे दिसून आले. विश्वास न्यूज ला त्याच्या तपासात हे व्हायरल छायाचित्र खोटे असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?:

ट्विटर यूजर Mane @Mane25994231 यांनी ५ ऑगस्ट रोजी आपल्या प्रोफाइल वर ट्विट केले, “Times Square in New York in full glory in preparation of ground breaking ceremony of Ram Mandir in Ayodhya,by PM Modi on 5th August 2020.
What a proud moment.
Jai Shree Ram.

अर्थात: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अयोध्या राम मंदिरच्या भूमिपूजन च्या अवसर वर टाइम्स स्क्वेयर असे न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेयर असे सजले होते. गर्वाचा क्षण. जय श्री राम

या पोस्ट ची अर्काइव्ह लिंक इथे बघा.

तपास:
ट्विटर यूजर Mane @Mane25994231 यांनी ट्विटरवर एक चित्र शेअर केले जे बाकी सोशल नेटवर्किंग साईट्स वर देखील व्हायरल होत आहे.
अयोध्या भूमिपूजन च्या उप्लक्ष मध्ये टाइम्स स्क्वेयर च्या बिलबोर्ड वर भगवान श्री राम यांचे छायाचित्र दाखवण्यात येणार असल्याचे बातम्या यायला लागल्या.

आम्हाला एक बातमी जागरण न्यूज च्या वेबसाईटवर दिसली:

पण आम्हला अजून एक बातमी बिसनेस टुडेवर सापडली ज्यात असे म्हंटले होते कि काही मुस्लिम संघटनांच्या पुढाकारानंतर हे छायाचित्र दर्शविले जाणार नाही.

आम्हाला वरील बातम्या गूगल सर्च मध्ये कीवर्डस टाकल्यावर सापडल्या.

विश्वास न्यूज ने नंतर शेअर केलेल्या छायाचित्राचा तपास केला, गूगल रिव्हर्स इमेज सर्च वापरून विश्वास न्युजला त्या सर्च मध्ये, ‘हिंदू गॉड’ असे आढळले ज्यात सगळ्या देवी देवतांचे फोटो सापडले.

तसेच वृत्त वाहिनीवर किंवा कुठल्याच वृत्त संस्थेवर हे छायाचित्र सापडले नाही. यावरून असे स्पष्ट झाले कि हे छायाचित्र बनवण्यात आले असावे.
विश्वास ने नंतर कीवर्डस, “टाइम्स स्क्वेयर बिलबोर्ड जेनरेटर” वापरून गूगल सर्च केले. यावरून आम्हाला, “https://makesweet.com/my/board-1066

या वेबसाईट वरून बिलबोर्डस चे टेम्प्लेट्स आम्हाला आढळले ज्यावर तुम्ही डिजिटली बिलबोर्ड बनवू शकता. आम्ही “विश्वास न्यूज” चा वापरून एक बिलबोर्ड चे छायाचित्र बनवून बघितले.

जवळून निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात आले कि या छायाचित्राला फ्लिप करण्यात आले होते, म्हणजेच आरश्यात हे छायाचित्र कसे दिसेल तसे आम्हाला दिसले.

तसेच एक भगवान राम यांचा फोटो स्टॉक इमेजेस मधून वापरल्याचा देखील आढळला.

विश्वास न्यूज ने एच एस एस, चे संपर्क प्रमुख, गणेश रामकृष्णन याच्या सोबत संपर्क साधला, त्यांनी व्हायरल होत असलेले छायाचित्र खोटे असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी आमच्या सोबत टाइम्स स्क्वेयरवरचे काही छायाचित्र आणि व्हिडिओ देखील शेअर केले.

पियुष कुकडे ज्यांनी ह्या टाइम्स स्क्वेयरवर झालेल्या इव्हेंट मध्ये सहभाग घेतला त्यांनी देखील हे व्हायरल छायाचित्र खोटे असल्याचे सांगितले.

विश्वास न्युज ला टाइम्स स्क्वेयरवर झळकलेले खरे छायाचित्र ANI च्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर सापडले:

तसेच ANI ने एक छोटा व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यात मागे जय श्री राम ची घोषणा ऐकू येते.

बिलबोर्ड वरती ५ ऑगस्ट रोजी भगवान श्री राम यांचे छायाचित्र झळकले पण व्हायरल छायाचित्र खोटे आहे.

ज्या ट्विटर प्रोफाइल नि ते शेअर केले त्याचे सोशल चेक केले असता असे लक्षात आले, कि त्या ट्विटर यूजर ने एप्रिल २०२० रोजी ट्विटर वर प्रोफाइल बनवले.

निष्कर्ष: ५ ऑगस्ट रोजी टाइम्स स्क्वेयरवर भगवान श्री राम यांचे छायाचित्र दर्शविले गेले पण व्हायरल असलेले च्याचीत्र ते नव्हे. व्हायरल छायाचित्र खोटे आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट