Fact Check: किडनी घोटाळ्यातील डॉक्टरचा कोरोनाव्हायरस रुग्णांशी काही संबंध नाही, व्हायरल दावा खोटा आहे
सोशल मीडिया वर शेअर केलेले किडनी रॅकेट सोबत जोडल्या गेलेल्या डॉक्टरांचा कोरोनाव्हायरस च्या रुग्णांसोबत काही संबंध नाही. सोशल मीडिया वर शेअर केलेले दावे खोटे आहे.
- By: ameesh rai
- Published: Sep 2, 2020 at 10:17 AM
नवी दिल्ली (विश्वास टीम): सोशल मीडियाच्या वेग-वेगळ्या प्लॅटफॉर्म वर कोरोनाव्हायरस रुग्ण आणि किडनी घोटाळ्याची एक स्टोरी व्हायरल होत आहे. त्यात एका वृत्तपत्राचे कात्रण शेअर करण्यात येत आहे. त्यात असा दावा केला जात आहे कि एका धड-धाकट माणसाला कॉरोनॅव्हिअर्स असल्याचे सांगून किडनी काढून घेत असलेल्या डॉक्टर ला अटक करण्यात आली आहे.
विश्वास न्यूज च्या फॅक्ट चेकिंग वॉट्सऐप चैटबॉट (+91 95992 99372) वर पण हा दावा फॅक्ट-चेक करण्यास आमच्या वाचकांनी पाठवला. विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा ठरला. एका किडनी घोटाळ्याच्या वेगळ्याच बातमी ला जोडून हि खोटी बातमी व्हायरल केली जात आहे.
काय होत आहे व्हायरल?
हा दावा फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सऐप सारख्या प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल आहे. Ankur Munakhya Kandera नावाच्या एका फेसबुक यूजर ने याच दाव्यासोबत आपल्या फेसबुक वॉल वर पोस्ट शेअर केले आहे. या पोस्ट मध्ये एका छायाचित्राचे क्लिप शेअर करून लिहले आहे, “स्वस्थ आदमी को कोरोना पेशेंट बता कर अब तक 125 लोगो का किडनी निकाल कर हत्या करने वाला डॉ देवेन्द्र शर्मा गिरफ्तार ऐसे ना जाने कितने डॉ हमारे आपके बीच मे है जिससे हमलोगो को सतर्क रहना होगा और अपने लोगो का ख्याल रखना होगा किसी भी स्वस्थ इन्सान की कोरोना से मौत होती है तो डॉ द द्वारा लपेटे हुवे बॉडी को चैक जरूर करे👇।”
अर्थात: निरोगी रुग्णाला कोरोनाव्हायरस चा रुग्ण सांगून आतापर्यंत १२५ लोकांची किडनी काढून त्यांची हत्या करणारा डॉ देवेंद्र शर्मा ला ताब्यात घेतले आहे, असे कितीचं डॉक्टर आपल्या मध्ये आहे ज्यांच्यापासून आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे आणि स्वतःला सांभाळायचे आहे. कोणत्यापन निरोगी व्यक्तीची कॉरोन नि मृत्यू होईल तर डॉक्टर नि लपेटलेली बॉडी चेक नक्की कराल.
या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे क्लिक करून पहिले जाऊ शकते.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी या पोस्ट सोबत शेअर केलेल्या न्यूज क्लिपिंग ला महत्वाच्या कीवर्डस ला गूगल वर सर्च केले. आम्हाला खूप सारे प्रामाणिक न्यूज रिपोर्ट मिळाल्या. आम्हाला टाइम्स ऑफ इंडिया ची १ ऑगस्ट ची रिपोर्ट मिळाली. त्या रिपोर्ट मध्ये सांगितले गेले कि व्हायरल पोस्ट मध्ये ज्या डॉक्टर चा उल्लेख आहे, तोच किडनी रॅकेट चालवतो. या बातमी ला इथे क्लिक करून वाचा.
सर्च करताना आम्हाला दैनिक जागरण ची पण एक रिपोर्ट मिळाली. या रिपोर्ट मध्ये या घटने बद्दल संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. या बातमीचा स्क्रीनशॉट खाली शेअर करण्यात आला आहे, इथे क्लिक करून त्याला वाचा.
दैनिक जागरण च्या या बातमीत अटक केलेल्या या डॉक्टर ला अलिगढ चा रहिवासी म्हंटले आहे. आम्ही या संबंधात, दैनिक जागरण चे अलिगढ चे चीफ रिपोर्टर यांच्या सोबत संपर्क साधला. त्यांनी सोशल मीडिया वर सांगितलेल्या दाव्य्नना खोटा सांगितले आहे. त्यांनी म्हंटले कि ह्या डॉक्टरांना निरोगी लोकांना कॉरोन चा रुग्ण सांगून किडनी काढण्याच्या संबंधात अटक नाही केले आहे. त्यांच्या प्रमाणे ह्या डॉक्टर ला किडनी रॅकेट आणि मर्डर सारख्या गुन्ह्यात अटक गेले होते आणि ते पॅरोल वर निघाल्या नंतर फरार झाले. त्यानंतर त्यांना परत अटक केले गेले.
विश्वास न्यूज ने हि पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Ankur Munakhya Kandera च्या प्रोफाइल ची सोशल सकॅनिंग केली, हा प्रोफाइल फेब्रुवारी २०१५ मध्ये बनवण्यात आला होता. प्रोफाइल वर दिलेल्या माहिती प्रमाणे यूजर चंदीगड चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: सोशल मीडिया वर शेअर केलेले किडनी रॅकेट सोबत जोडल्या गेलेल्या डॉक्टरांचा कोरोनाव्हायरस च्या रुग्णांसोबत काही संबंध नाही. सोशल मीडिया वर शेअर केलेले दावे खोटे आहे.
- Claim Review : स्वस्थ आदमी को कोरोना पेशेंट बता कर अब तक 125 लोगो का किडनी निकाल कर हत्या करने वाला डॉ देवेन्द्र शर्मा गिरफ्तार ऐसे ना जाने कितने डॉ हमारे आपके बीच मे है जिससे हमलोगो को सतर्क रहना होगा और अपने लोगो का ख्याल रखना होगा किसी भी स्वस्थ इन्सान की कोरोना से मौत होती है तो डॉ द द्वारा लपेटे हुवे बॉडी को चैक जरूर करे
- Claimed By : Ankur Munakhya Kandera
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.