विश्वास न्यूज च्या तपासात अस समजल कि दरभंगा मध्ये १ जुलै रोजी एका ज्योती नामक मुलीचा मृत्यू झाला, पण मृत मुलगी हि ती ज्योती नाही जिने आपल्या जखमी वडिलांना गुरुग्राम वरून दरभंगा सायकलवर आणले.
नवी दिल्ली (विश्वास टीम)
सोशल मीडिया वर सध्या एका व्हायरल पोस्ट मध्ये हा दावा करण्यात येत आहे कि ज्योती, जिने आपल्या जखमी वडिलांना सायकल वर बसवून, १२०० किलोमीटर सायकल चालवून आपल्या गावी पोहोचली, तिची गावात बलात्कार करून गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. विश्वास न्यूज ला हा दावा ट्विटर वर सगळ्यात आधी आढळला. हाच दावा फेसबुक वर पण शेअर करण्यात आला आहे. विश्वास न्यूज च्या तपासात आढळले कि दरभंगा मध्ये १ जुलै रोजी एका ज्योती नावाच्या मुलीचा मृत्य झाला, पण हि ती ज्योती नव्हे, जीनी आपल्या बाबांना सायकल वर बसवून गुरुग्राम वरून दरभंगा ला आणले.
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये असा दावा करण्यात येत आहे कि आपल्या जखमी वडिलांना सायकल वर बसवून १५०० किलोमीटर पेक्षा जास्ती अंतर पार करून त्यांना गावात आणणाऱ्या ज्योतीचे बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. व्हायरल पोस्ट मध्ये एका मृत मुलीचा आणि ज्योती पासवान च्या छायाचित्राचे कोलाज करण्यात आले आहे.
पोस्ट सोबत हा मजकूर पोस्ट करण्यात आला आहे: “इस खबर से हिल गया हूँ ।
लाॅकडाउन में साईकिल से 1500 किलोमीटर चल कर अपने पिता को गांव लाने वाली ज्योति पासवान को हवस का शिकार बना कर एक सामंती अर्जुन मिश्रा ने हत्या कर दी है। मिश्रा के आम के बाग से आम चुन रही थी जिस से को इतना गुस्से में आया कि पहले उसने अपनी पत्नी के है सामने उसका बलात्कार किया और फिर हसिए से उसका गला रेत कर मार डाला।
ज्योति पासवान आप को याद ही होगा ये वही लड़की है जिसकी वजह से दरभंगा का नाम खूब सुर्खियों में आया था और अमरीका के राष्ट्रपति की बेटी ने भी उसके जज्बे की सराहना की थी।
मीडिया चुप, भाजपा सरकार चुप, पासवानों के भगवान राम विलास चुप है क्योंकि बिहार में चुनाव है।
बहुजन आर्मी“
अर्थात: “ह्या बातमी ने मी काहीसा हादरून गेलो आहे. लोकडाऊन मध्ये सायकल वर १५०० किलोमीटर अंतर पार करून आपल्या वडिलांना गावात परत आणणारी ज्योती पासवान वासनेची शिकार बनली. आणि अर्जुन मिश्रा नामक व्यक्ती ने तिची हत्या केली. मिश्राच्या आंब्याच्या बागांतून आंबे घेत असताना मिश्रा ला इतका राग असह्य झाला कि त्यानी आधी तिच्यावर आपल्याच बायको समोर अतिप्रसंग केला आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली.
ज्योती पासवान चे नाव तुम्हाला लक्षात असेलच, हि तीच मुलगी जिच्यामुळे दरभंगाचे नाव बातम्यांमध्ये आले होते, आणि अमेरिका च्या राष्ट्रपतींच्या मुलीने देखील याची दखल घेतली होती.
मीडिया चूप, भाजप सरकार चूप पासवान चे देव रॅम विलास चूप कारण बिहार मध्ये मतदान आहेत.
बहुजन आर्मी”
या फेसबुक पोस्ट ची अर्काइव्ह लिंक बघा.
तपास:
या दाव्याचा तपास करत असताना, कीवर्डस च्या मदतीने आम्ही नुकतेच बिहार मध्ये कुठल्या बलात्काराच्या घटना घडल्या का, ते शोधून काढले. दरभंगा च्या एका युवतीच्या बलात्काराची घटना आम्हाला सापडली. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलेल्या बातमी प्रमाणे अशोक पेपर मिल पोलीस स्टेशन च्या अंतर्गत गावात एका १४ वर्षीय मुलीवर सांगण्यात आल्या प्रमाणे, आंबे चोरल्याच्या आरोपावर आधी तिचा बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. पूर्ण बातमीत कुठेच असा उल्लेख नाही केला आहे, कि ती सायकल वर आपल्या वडिलांना आणणारी ज्योती पासवान आहे.
livehindustan.com च्या बातमी प्रमाणे, “पतोर ओपी क्षेत्रात बुधवारी संदिग्ध अवस्थेत एक मृतदेह आढळला, जो एका १३ वर्षीय मुलीचा होता. आंबे चोरल्याचा आरोपावरून तिचा बलात्कार आणि हत्या झाल्याबद्दल एफआईआर तिच्या नातेवाईकांनी केली आहे”. यात देखील कुठेच असे नमूद केलेले नाही कि हि ज्योती नामक सायकल गर्ल आहे.
सायकल गर्ल ज्योती च्या वडिलांचे नाव मोहन पासवान आहे तर मृत मुलीच्या वडिलांचे नाव अशोक पासवान आहे.
आम्हाला एका ट्विट मध्ये एक व्हिडीओ देखील सापडला ज्यात मृत मुलीचे वडील आपल्या मुलीसाठी न्याय मागताना दिसतात. व्हिडीओ मध्ये असलेली व्यक्ती आणि सायकल गर्ल ज्योती चे बाबा यांच्यात कुठलेच साम्य नाही, हे आपण खाली दिलेल्या छायाचित्रात बघू शकतो.
या विषयावरील पुढील पुष्टीकरणासाठी आम्ही दैनिक जागरण च्या दरभंगाचे रिपोर्टर विभाषशी संपर्क साधला. विभाषने आम्हाला सांगितले की दरभंगाचे एसएसपी बाबू राम यांनी त्यांच्याशी बोलताना सांगितले, “सोशल मीडियावर काहींनी प्रसारित केलेली सायकल गर्ल ज्योतीच्या हत्येची बातमी पूर्णपणे खोटी आहे. ती पूर्णपणे निरोगी आणि सुरक्षित आहे. पाच दिवसांपूर्वीच पटोर येथे याच नावाच्या एका मुलीची हत्या करण्यात आली होती, त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि एका आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. उर्वरित लोकांनाही एक ते दोन दिवसांत अटक केली जाईल. शवविच्छेदन अहवालात वविजेचा करंट लागून मृत्यू झाल्याचे कारण सांगितले गेले आहे. बलात्काराच्या आरोपाची पुष्टी झालेली नाही. अफवा पसरवून स्वार्थी घटक सामाजिक समरसता बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा अफवा टाळा आणि इतरांनाही जागरूक करा. खोट्या बातम्यांचा प्रसार आणि अल्पवयीन मुलीच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी कमतौल पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली गेली आहे. यासंदर्भात लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये छापलेल्या बातम्या देखील पाहिल्या जाऊ शकतात. केवळ सत्य बातम्यांवरच विश्वास ठेवावा.
या पोस्ट ला फेसबुक वर Indrajeet K Jaiswar नावाच्या व्यक्तीने शेअर केले आहे. या यूजर चे ५,००० फ्रेंड्स आहेत आणि यूजर उत्तर प्रदेश चा रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात अस समजल कि दरभंगा मध्ये १ जुलै रोजी एका ज्योती नामक मुलीचा मृत्यू झाला, पण मृत मुलगी हि ती ज्योती नाही जिने आपल्या जखमी वडिलांना गुरुग्राम वरून दरभंगा सायकलवर आणले.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923