Fact-Check: Zee New ने नाही चालवली १५ जून पासून संपूर्ण लॉकडाउन ची बातमी, खोटी पोस्ट होत आहे व्हायरल

निष्कर्ष: विश्‍वास न्‍यूज च्या तपासात व्हायरल झालेले ग्राफिक खोटे असल्याचे समजले. झी न्यूज ने लॉकडाउन बाबत अशी कुठलीही बातमी आपल्या वाहिनी वर प्रसारित केली नाही.

नवी दिल्ली (विश्‍वास न्‍यूज) संपूर्ण देशात आज झी न्युज च्या नावानी एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केला जातोय कि १५ जून पासून संपूर्ण देशात परत एकदा लॉकडाउन हू शकतो. ह्या पोस्ट ला जवळपास सगळ्याच सोशल मीडिया वेबसाईट वर शेअर करण्यात आले आणि तसेच हे व्हाट्सअँप वर देखील व्हायरल झाले. विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि झी न्यूज ने अशी कुठलीही बातमी चालवली नाही. कोणीतरी झी न्यूज ची ब्रेकिंग न्यु ची प्लेट वापरून हि चुकीची पोस्ट मुद्दाम बनवली आहे. पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे, १० जून पर्यंत लॉकडाउन ची कुठलीही बातमी उपलब्ध नव्हती.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Gayas Ahamad ने ९ जून रोजी एक ग्राफिक अपलोड केले. त्यात लिहले होते, “पन्द्रह जून के बाद फिर से हो सकता है सम्पूर्ण लॉकडॉउन गृह मंत्रालय ने दिये संकेत ट्रेन और हवाई सफर पे लगेगा ब्रेक!”
अर्थात: पंधरा जून नंतर परत संपूर्ण देशात लोकडाउन हू शकतं. गृहमंत्रालयाने दिला इशारा, ट्रेन आणि विमान प्रवासाला लागू शकतात ब्रेक!”


फेसबुक यूजर Gayas Ahamad ने ९ जून रोजी एक ग्राफिक अपलोड केले. त्यात लिहले होते, “पन्द्रह जून के बाद फिर से हो सकता है सम्पूर्ण लॉकडॉउन गृह मंत्रालय ने दिये संकेत ट्रेन और हवाई सफर पे लगेगा ब्रेक!”
अर्थात: पंधरा जून नंतर परत संपूर्ण देशात लोकडाउन हू शकतं. गृहमंत्रालयाने दिला इशारा, ट्रेन आणि विमान प्रवासाला लागू शकतात ब्रेक!”

तपास:

विश्‍वास न्‍यूज ने सगळ्यात आधी व्हायरल पोस्ट मधले मजकूर गूगल सर्च केले. आम्हाला अशी बातमी कुठेही सापडली नाही.
तपासादरम्यान आम्हाला झी न्यूज ची वेबसाईट zeenews.india.com वर एक याच संदर्भात बातमी आढळली. या पोस्ट बद्दल त्या बातमीत लिहले होते कि कसे चॅनेल चे नाव घेऊन एक खोटी पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. तसेच त्यात, झी न्युज नि अशी कुठलीही बातमी आपल्या चॅनेल वर चालवली नाही याचे देखील स्पष्टीकरण दिले. टीव्ही स्क्रीन चे दिलेले छायाचित्र खोटे आहे.
या नंतर विश्‍वास न्‍यूज ने चॅनेल चे संपादक सुधीर चौधरी यांना संपर्क केला. त्यांना आम्ही व्हायरल होत असलेल्या पोस्ट बद्दल विचारले. त्यांनी आम्हाला ती खोटी असल्याचे सांगितले. झी न्युज ने अशी कुठलीही बातमी आपल्या वाहिनी वर प्रसारित केली नाही.

शेवटच्या टप्प्यात आम्ही हि पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर चे अकाउंट तपासले. Gayas Ahamad च्या सोशल स्‍कैनिंग मध्ये आम्हला समजले, Gayas हे उत्तर प्रदेश चे रहिवासी आहेत आणि त्यांच्या वॉल वर ते नेहमीच व्हायरल होत असलेले मजकूर शेअर करतात.

निष्कर्ष: निष्कर्ष: विश्‍वास न्‍यूज च्या तपासात व्हायरल झालेले ग्राफिक खोटे असल्याचे समजले. झी न्यूज ने लॉकडाउन बाबत अशी कुठलीही बातमी आपल्या वाहिनी वर प्रसारित केली नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट