Fact Check: झारा आपल्या 46व्या वाढदिवसानिमित्त मोफत भेटवस्तू देण्याचा दावा करणारी पोस्ट भ्रामक आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. ह्या ब्रँड ची स्थापना, 1975 मध्ये झाली आणि नुकतेच त्याला 46 पूर्ण झाले पण व्हायरल पोस्ट मध्ये दिलेली लिंक खोटी आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला आपल्या व्हाट्सअँप अकाउंट वर फॅक्ट चेक करता हा दावा मिळाला, ज्यात दिले होते कि क्लोथिंग ब्रँड झारा ने आपल्या 46व्या वाढदिवसानिमित्त ग्राहकांना मोफत भेटवस्तू देत आहे. पोस्ट सोबत एक लिंक देखील शेअर केली गेली होती. विश्वास न्यूज च्या तपासात हि व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे. ह्या ब्रँड ची स्थापना 1975 साली झाली होती आणि त्याला नुकतेच 46वर्ष पूर्ण झाले पण पोस्ट मध्ये देण्यात आलेली लिंक खोटी आहे.

काय होत आहे व्हायरल?
व्हाट्सअँप वर व्हायरल पोस्ट मध्ये दावा करण्यात येत होता कि झारा आपल्या 46व्या वाढदिवसानिमित्त आपल्या ग्राहकांना मोफत उपहार देत आहे. पोस्ट सोबत एक लिंक देखील शेअर करण्यात येत आहे.

हीच पोस्ट बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर देखील व्हायरल होत आहे.

तपास:
सगळ्यात आधी आम्ही झारा च्या वेरिफाइड पोस्ट चा तपास केला. आम्हाला त्यांच्या पेज वर अशी कुठलीच पोस्ट किंवा प्रोमोशन मिळाले नाही.

आम्ही झारा चे अधिकृत वेबसाईट www.zara.com देखील तपासली, तिथे देखील आम्हाला काही मिळाले नाही.

आम्ही झारा चा इंस्टाग्राम हॅन्डल देखील तपासला, त्यावर देखील आम्हाला व्हायरल होणार दावा मिळाला नाही.

आम्ही व्हायरल होणाऱ्या लिंक वर क्लीक केल्यावर, व्हायरल लिंक एका एरर पेज वर उघडली.

आम्हाला त्यात स्पष्ट दिसले कि व्हायरल पोस्ट मध्ये दिलेली लिंक जिथे उघडली ती झारा ची अधिकृत लिंक नव्हती.
आम्ही झारा च्या स्टोर च्या अधिकारी सोफीया ह्यांना संपर्क केला, त्यांनी म्हंटले, “हा एक स्कॅम आहे. हा प्रोमोशन झारा ने केले नाही.”
झारा स्पेन मधील एक फॅशन ब्रँड आहे, ज्याचे जगभरात आउटलेट आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. ह्या ब्रँड ची स्थापना, 1975 मध्ये झाली आणि नुकतेच त्याला 46 पूर्ण झाले पण व्हायरल पोस्ट मध्ये दिलेली लिंक खोटी आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट