X
X

Fact Check: डोक्यावर दगडं ठेवलेले छायाचित्रात दिसणारी महिला पीएसआई पद्मशीला तिरपुड़े नाही आहे

व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मजदूर महिला पद्मशीला तिरपुड़े नाही आहे. पद्मशीला तिरपुड़े यांनी कधीच मजदुरी केली नाही. व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात एक बाई डोक्यावर दगडं ठेऊन कडेवर एक लहान मुलगा घेऊन उभी असताना दिसते आणि दुसऱ्या छायाचित्रात एक बाई पोलिसांच्या वर्दीत उभी असलेली दिसते. व्हायरल पोस्ट मध्ये दावा केला जात आहे कि हि महिला, पद्मशीला तिरपुड़े आहे, ज्यांच्या घरची परिस्थिती खूपच बेताची असल्यामुळे त्यांनी खलबत आणि दगडाचा पाटा वरवंटा विकून आपले घर चालवले, नंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य पीएससी मध्ये पीएसआई ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता त्या सब इन्स्पेक्टर बनल्या आहेत.

विश्वास न्यूज च्या तपासात असे कि हि दगडं घेऊन असलेली महिला, पद्मशीला तिरपुड़े नाही आहे. तिरपुड़े यांनी कधीच खलबत्ता आणि पाटा वरवंटा विकायचे काम केले नाही.

काय आहे व्हायरल पोस्ट मध्ये:
फेसबुक वर हा मेसेज एका सक्सेना विशु नामक यूजर ने शेअर केला आहे, त्याने कॅप्शन मध्ये लिहले,
इस महिला का नाम है पद्मशीला तिरपुड़े…
भंडारा ज़िले की वे निवासी हैं और इन्होंने प्रेम विवाह किया है।
पति के घर के हालात बिकट होने से उन्होंने खलबत्ता और पत्थर के सिलबट्टे बेचते हुए और इस बच्चे को संभालते हुए, यशवंतराव चव्हाण मुक्त विश्वविद्यालय से शिक्षा हासिल कर, महाराष्ट्र राज्य PSC में
पी.एस.आई की परीक्षा उत्तीर्ण की है।
वे बौद्ध परिवार से आती हैं…
उनकी मेहनत को हम सैल्यूट करते हैं।
शिक्षा में परिस्थिति व्यवधान नहीं बनती, परिस्थिति केवल बहाना होती है। इस महिला ने ये साबित कर दिखाया है।

अर्थात:
या महिलेचे नाव पद्मशीला तिरपुड़े आहे.
त्या भंडाऱ्या जिल्ह्याच्या निवासी आहेत, यांनी प्रेम विवाह केला आहे
पतीच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे यांनी आपल्या बाळाला सांभाळत खलबत्ता आणि पाटा वरवंटा विकण्याचे काम केले, त्यांनी नंतर यशवंतराव चव्हाण विश्वविद्यालय मधून शिक्षण पूर्ण केले आणि महाराष्ट्र राज्य PSC मध्ये, पी.एस.आई ची परीक्षा उत्तीर्ण केली.
त्या बौद्ध परिवाराच्या आहेत,
त्यांच्या मेहनतीला आम्ही सॅल्यूट करतो.

या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चे तपास करत, एक एक दाव्याचा तपास केला.

महिलेचे नाव पद्मशीला तिरपुड़े आहे:

विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि व्हायरल छायाचित्रात वर्दीत असलेली महिला या पद्मशीला तिरपुड़े आहे. त्यांच्या गणवेशावर लागलेला त्यांच्या बैज वर त्यांचा नाव वाचता येत, पण दुसऱ्या छायाचित्रात लहान मुलाला घेऊन दिसत असलेली महिला या पद्मशीला तिरपुड़े नाही. विश्वास न्यूज ने पद्मशीला तिरपुड़े यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी स्पष्ट केला कि मुलगा कडेवर घेतलेले छायाचित्र हे त्यांचे नाहीत. आम्ही मजदूर महिलेची ओळख नाही पटवू शकलो.

त्या भंडाऱ्या जिल्ह्याच्या रहिवासी आहे आणि त्यांनी प्रेम विवाह केला:

पद्मशीला तिरपुड़े यांनी स्पष्ट केल्या कि हे दोन्ही दावे खरे आहे.

नवऱ्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना खलबत्ता आणि पाटा वरवंटा विकावा लागला:

पद्मशीला तिरपुड़े यांनी सांगितले कि त्यांची परिस्थिती बेताची होती पण त्यांनी कधी काही विकायचे काम नाही केले, त्या एक गृहिणी होत्या.

मुलाला सांभाळत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर यशवंतराव चव्हाण विश्वविद्यालय मधून शिक्षण पूर्ण करून, महाराष्ट्र राज्य पीएससी मधून पीएसआई ची परीक्षा उत्तीर्ण केली:

पद्मशीला यांनी सांगितले कि त्यांनी आपले ग्रेजुएशन आपल्या दोन मुलांच्या जन्मानंतर पूर्ण केले आणि नंतर कॉम्पिटीटिव परीक्षेची तयारी करून पीएसआई ची परीक्षा उत्तीर्ण केली.

त्या बौद्ध परिवाराच्या आहे:
पद्मशीला त्यांनी पुष्टी केली कि त्या बौद्ध कुटुंबातल्या आहेत.

विश्वास न्यूज सोबत बोलताना पद्मशीला तिरपुड़े यांनी सांगितले कि व्हायरल पोस्ट जवळ-पास तीन वर्षाआधीपण सोशल मीडिया वर व्हायरल झाली होती. तेव्हा पण त्यांनी हे स्पष्ट केले होते कि दगडं उचललेली महिला ह्या त्या नाहीत, त्यांनी कधीच मजदुरी केली नाही, तसेच त्यांनी सांगितले कि सध्या त्या नागपुरात पोस्टेड आहेत.

फेसबुक वर हि पोस्ट सक्सेना विशु ने शेअर केली होती. आम्ही यूजर ची प्रोफाइल स्कॅन केली त कळले कि ते दिल्ली चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मजदूर महिला पद्मशीला तिरपुड़े नाही आहे. पद्मशीला तिरपुड़े यांनी कधीच मजदुरी केली नाही. व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे.

  • Claim Review : सब इन्स्पेक्टर पद्मशीला या इन्स्पेक्टर बनायच्या आधी दगडाचा पाटा वरवंटा विकायचं काम करायच्या, त्यांनी प्रेम विवाह केली आणि त्यांच्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती बिकट होती.
  • Claimed By : सक्सेना विशु
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later