X
X

Fact Check: WHO चे संचालक ह्यांना अटक झाली नाही, व्हायरल व्यंग खरे समजून व्हायरल

विश्वास न्यूजने तपासात कळले की WHO संचालकाला मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी अटक केलेली नाही. व्हायरल दावा खोटा आहे. एक व्यंग्य लेख खरा म्हणून शेअर केला जात आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला एक दावा फेसबुक वर व्हायरल होत असल्याचा लक्षात आला, ज्यात दावा करण्यात येत होता कि डब्ल्यूएचओचे संचालक Tedros Adhanom Ghebreyesus ह्यांना मानवतेविरुद्ध गुण्यांसाठी अटक करण्यात आली आहे. पण विश्वास न्यूज च्या तपासात असे समोर आले कि व्हायरल दावा खोटा आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Michael Jay Casale ह्यांनी फेसबुक प्रोफाइल वर २५ जुलै रोजी लिहले: Wow! WHO director arrested for crimes against humanity. He was caught on an airplane trying to escape to Africa with large amount of cash. This movie is getting wild.

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

आम्हाला ट्विटर वर देखील काही पोस्ट मिळाले.

https://twitter.com/JoiedeV56644660/status/1551410539548610560
https://twitter.com/13molon/status/1551582902000836608

तपास:

विश्वास न्यूज च्या तपासाची सुरुवात गूगल किवर्ड सर्च सोबत केली. आम्हाला कुठेच हि बातमी दिसली नाही.
जर डब्ल्यूएचओचे संचालक Tedros Adhanom Ghebreyesus ह्यांना अटक झाली असती तर हि खूप मोठी बातमी बनली असती आणि बाकी संस्थांनी देखील ती बातमी घेतली असती.

आम्हाला काही व्हायरल ट्विट सोबत एक लिंक देखील शेअर केल्याचे दिसले.

https://vancouvertimes.org/who-director-arrested-for-crimes-against-humanity/

Vancouver Times‘ नावाच्या वेबसाईट वर हि बातमी शेअर केल्याचे आमच्या लक्षात आले.

आम्ही हि वेबसाईट नीट निरखून बघितले.

आम्ही ‘अबाउट अस‘ सेक्शन तपासल्यावर असे लक्षात आले कि हि एक ‘satire’ (व्यंग) वेबसाईट आहे.

ह्या वेबसाईट वर लिहले होते: Vancouver Times is the most trusted source for satire on the West Coast. We write satirical stories about issues that affect conservatives.

भाषांतर: व्हँकुव्हर टाईम्स हे वेस्ट कोस्टवरील व्यंगसाठी सर्वात विश्वसनीय स्त्रोत आहे. पुराणमतवादींवर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर आम्ही उपहासात्मक कथा लिहितो.

आता हे स्पष्ट झाले होते कि हि बातमी एक व्यंग आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही WHO मीडिया कॉन्टॅक्ट, Margaret Harris and Tarik Jasarevicn ह्यांना इमेल द्वारे संपर्क केला. दोघं पण डब्ल्यूएचओचे प्रवक्ता आहे. त्यांनी आम्हाला सांगतले कि व्हायरल दावा खोटा आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक ह्यांना अटक झाली नाही.

शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर, ज्यांनी हा दावा शेअर केला त्यांचे सोशल बॅकग्राउंड चेक केले. Michael Jay Casale हे Daagsboro, Delaware चे रहिवासी आहेत आणि त्यांचे 1.7K फेसबुक फ्रेंड्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपासात कळले की WHO संचालकाला मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी अटक केलेली नाही. व्हायरल दावा खोटा आहे. एक व्यंग्य लेख खरा म्हणून शेअर केला जात आहे.

  • Claim Review : Wow! WHO director arrested for crimes against humanity.
  • Claimed By : Michael Jay Casale
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later