Fact Check: केबीसी व्हाट्सअँप द्वारे ऑनलाइन लॉटरी चालवत नाही, वाचकांना सावध राहण्याचे आवाहन

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि केबीसी च्या नावावर व्हायरल होत असलेला लॉटरी चा मेसेज एक स्कॅम आहे. वाचककन सावध करण्यात येते कि अश्या स्कॅम्स पासून दूर राहणेच योग्य. स्वतःची वैयत्तिक माहिती कोणासोबत शेअर करू नका.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूजला व्हाट्सअँप शेअर केलेला एक व्हायरल मेसेज आला ज्यामध्ये लोकांना KBC लकी ड्रॉ 2022 स्पर्धेतून लॉटरी लागली आहे असे सांगण्यात येत आहे. विश्वास न्यूजला आपल्या फॅक्ट चेक मध्ये कळले कि हा मेसेज एक स्कॅम असून लोकांना त्याद्वारे फसवण्यात येत आहे. तसेच त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

लोकांना त्यांच्या व्हाट्सअँप नंबरवर एक ग्राफिक आणि व्हॉईस नोट प्राप्त होत आहे. बॅनरमध्ये दावा करण्यात येत आहे कि ग्राहक एका लकी ड्रॉ चे विजेते आहेत. ह्या बॅनर मध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि विविध मोबाइल ऑपरेटर यांच्या प्रतिमेसह लॉटरी क्रमांकाचाही उल्लेख आहे. बॅनरवर एक मोबाईल क्रमांकही नमूद करण्यात आला आहे.
संदेशासोबत व्हॉईस नोट देखील आहे ज्यात दावा केला आहे की व्यक्ती व्हाट्सअँप कस्टमर केअर, नवी दिल्ली येथून कॉल करत आहे.
व्हॉईस नोटचा दावा आहे की नंबरने 25 लाख रुपये जिंकले आहेत. लॉटरीची रक्कम मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियापर्यंत पोहोचली असून, बॅनरवर नमूद केलेला क्रमांक बँकेच्या व्यवस्थापकाचा असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यावर कॉल केल्यास नंतर अधिक माहिती मिळवून लॉटरी ची किंमत मिळवावी असे त्यात सांगितले आहे. ग्राहकांना सांगण्यात येत आहे कि फक्त व्हाट्सअँप द्वारे ह्या मॅनेजर ला संपर्क करावा, साधा कॉल करण्यास सक्त मनाई आहे.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी दिलेल्या नंबर वर साधा कॉल केला. त्यावर आम्हाला कळले कि इनकमिंग कॉल ची सेवा स्थगित करण्यात आली आहे. त्यात आम्हाला पहिला संशय आला. एखादा बँकेचा कर्मचारी आपला इनकमिंग कॉल सेवा का बंद ठेवेल असा प्रश्न पडला.

विश्वास न्यूज ने नंतर दिलेला नंबर व्हाट्सअँप वर तपासला. त्यात त्या व्यक्तीने ‘KBC office manager’ असे बायो मध्ये लिहले होते. आम्ही त्यांना व्हाट्सअँप द्वारे कॉल लावला. कॉल एका इसमाने उचलला ज्याने स्वतःला राणा प्रताप म्हणून संबोधले. त्यांनी आम्हाला आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारले आणि परत एक व्हॉइस नोट पाठवली. त्या व्हॉइस नोट मध्ये आम्हाला आपले नाव, बँक अकाउंट डिटेल्स आणि एक चित्र असे शेअर करण्यास सांगितले. तसेच तुम्हाला लॉटरी लागली असल्याचे कुठेच सांगू नका असे देखील त्यांनी म्हंटले.

आम्ही त्यानंतर ट्विटर वर केबीसी लॉटरी चा तपास केला. अहमदाबाद पोलिसांनी जून 28, 2021 रोजी केलेला एक ट्विट आम्हाला मिळाला.

विश्वास न्यूज च्या लक्षात आले कि हा एक जुना स्कॅम आहे ज्यात लोक वारंवार फसतात आणि हा पून्हा पुन्हा व्हायरल होतो.

Economic Offences Wing Cyberabad ने देखील ह्याबद्दल त्यांच्या ट्विटर प्रोफाइल वर लिहले आहे.

आम्ही गूगल वर कीवर्ड द्वारे शोध घेतल्यास असे लक्षात आले कि सायबर सेल, दिल्ली ने देखील केबीसी लॉटरी फ्रॉड बद्दल लिहले आहे, आणि लोकांना काळजी घेण्यास सांगितले आहे.

विश्वास न्यूज ने शेवटच्या टप्प्यात, सायबर सेक्युरिटी एक्स्पर्ट, महेश राखेजा ह्यांना संपर्क केला आणि त्यांच्या सोबत व्हाट्सअँप द्वारे होत असलेला हा फ्रॉड शेअर केला. त्यांनी म्हंटले, “जवळपास तीन वर्षांपासून हा फ्रॉड लोकांसोबत होत आहे. लोकांना समजायला पाहिजे कि जर त्यांनी कुठले तिकीट विकत घेतले नाही किंवा, कुठे अप्लाय केले नाही तर त्यांना लॉटरी लागू शकत नाही.”
महेश राखेजा ह्यांनी हे देखील सांगितले कि हे मेसेजस अश्या नंबर वरून केले जातात जे सहज व्हर्चुअल्ली विकत घेता येतात. हे साधारणपणे 80 रुपयांना मिळतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि केबीसी च्या नावावर व्हायरल होत असलेला लॉटरी चा मेसेज एक स्कॅम आहे. वाचककन सावध करण्यात येते कि अश्या स्कॅम्स पासून दूर राहणेच योग्य. स्वतःची वैयत्तिक माहिती कोणासोबत शेअर करू नका.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट