Fact Check: वादळ तोक्ते च्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा नाही, जुना आहे
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ भारतातील नाही तर स्पेन चा आहे.
- By: Pallavi Mishra
- Published: May 21, 2021 at 04:55 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात एक चक्रवाती वादळ पहिल्या जाऊ शकते. पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकण क्षेत्रातील कुंकेश्वर गावाचे आहे. लोकं या व्हिडिओ ला तोक्ते वादळाचा समजून व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. हा व्हिडिओ भारतातील नाही स्पेन चा आहे.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल व्हिडिओ मध्ये एक चक्रवाती वादळ बघितले जाऊ शकते. पोस्ट सोबत लिहले आहे “Devgad kunkeshwar today.” या पोस्ट ला नुकतेच आलेल्या तोक्ते वादळाच्या नावाने व्हायरल करण्यात येत आहे. कंमेंट्स मध्ये देखील असेच वाटत आहे कि लोकं याला तोक्ते वादळ चा व्हिडिओ समजत आहेत.
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
तपासाच्या पहिल्या टप्प्यात आम्ही या व्हिडिओ चे स्क्रीनग्रेब घेऊन त्याला रिव्हर्स इमेज सर्च मध्ये शोधले. आम्हाला हा लांब व्हिडिओ Kodela Suryalatha Yadav नावाच्या फेसबुक प्रोफाइल वर मिळाला. हा या दाव्याने जानेवारी २०२१ मध्ये शेअर केला गेला कि हा व्हिडिओ स्पेन चा आहे. या पोस्ट सोबत लिहले होते: “It’s the Northern part of Spain. It happens roughly twice a year. Due to deep water pressure the waves can reach up to 24m height. Enjoy the wall of water. The beauty of God’s creation.. . From WhatsApp.”
आम्हाला हा व्हिडिओ काही युट्युब चॅनेल्स वर देखील याच दाव्यासह मिळाला कि हा व्हिडिओ स्पेन चा आहे.
कीवर्डस आणि रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने आम्हाला कळले कि हि जागा पसेउ नुएवा, सैन सेबेस्टियन चे आहे. सैन सेबेस्टियन ला इंटरनेट वर शोधल्यास आम्हाला बरेच छायाचित्र मिळाले, जे व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या जागे सारखे आहे.
आम्हाला व्हायरल छायाचित्र इमेज एजेंसी शटरस्टॉक वर देखील एक छायाचित्र मिळाले. हे छायाचित्र Javier Etxezarreta नावाच्या फोटोग्राफर ने घेतले आहे. आम्ही या विषयी Javier यांच्यासोबत ट्विटर वर संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा व्हिडिओ स्पेन मधील पसेउ नुएवा चा आहे आणि त्यांनी हे छायाचित्र तिथे घेतले होते.
यानंतर आम्ही कुंकेश्वर मंदिर आणि बीच चे छायाचित्र इंटरनेट वर शोधले. खालील छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे कि व्हायरल व्हिडिओतील छायाचित्राच्या तुलनेत हे छायाचित्र बरेच वेगळे आहे.
या पोस्ट ला सोशल मीडिया वर बरेच लोकं चुकीच्या दाव्यासह व्हायरल करत आहेत. यातीलच एक आहेत Vishwas Gaonkar. सोशल स्कँनिंग मध्ये कळले कि फेसबुक वर त्यांचे १६७ फॉलोवर्स आहेत आणि यूजर ठाणे चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ भारतातील नाही तर स्पेन चा आहे.
- Claim Review : वादळ तोक्ते चा व्हिडिओ
- Claimed By : Vishwas Gaonkar
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.