Fact Check: श्रीनगरमध्ये दहशतवाद्याला पकडल्याचा दावा करून ब्राझीलमधील एक जुनी घटना केली जात आहे व्हायरल
- By: Umam Noor
- Published: May 14, 2024 at 06:56 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलीस दुचाकीचा पाठलाग करताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना वापरकर्ते दावा करत आहेत की, हा श्रीनगरचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये पोलीस दहशतवाद्यांना पकडताना दिसत आहेत.
विश्वास न्यूजने केलेल्या त्यांच्या तपासात असे आढळून आले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2021 चा ब्राझीलचा आहे. ब्राझीलचा हा जुना व्हिडिओ श्रीनगरशी जोडून खोट्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
व्हायरल पोस्ट शेअर करताना एका फेसबुक वापरकर्त्याने लिहिले की, “श्रीनगरमध्ये लष्कराच्या कमांडोने दहशतवाद्याला कसे पकडले ते पहा. दहशतवादी त्याच्या जॅकेटमध्ये लपवलेले शस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. कमांडोने धावत जाऊन त्याच्या छातीवर अशा प्रकारे लाथ मारली की तो तोंडावर धपकन खाली पडला. जवानाची ऊर्जा पहा.”
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
तपास
आमचा तपास सुरू करताना, सर्वप्रथम आम्ही गुगल लेन्सद्वारे व्हिडिओचे मुख्य फ्रेम्स शोधले. शोध घेत असताना, आम्हाला हा व्हिडिओ 3 ऑगस्ट 2021 रोजी ब्राझीलच्या एक बातम्यांवर आधारित यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आढळला. येथे व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ ब्राझीलच्या पेरोला शहरातील आहे.
याच आधारावर आम्ही आमचा तपास सुरू केला आणि आम्हाला 3 ऑगस्ट 2021 रोजी ब्राझीलच्या न्यूज वेबसाइटवर या प्रकरणाशी संबंधित बातमी प्राप्त झाली, जिथे व्हायरल व्हिडिओ देखील बातम्यांमध्ये वापरला गेला आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार, पेरोला भागात पोलीस गस्त घालत असताना त्यांनी संशयास्पद मनोवृत्तीच्या मोटारसायकलस्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी त्याने मोटारसायकलचा वेग वाढवला आणि त्याचदरम्यान त्याने एका वाहनाला धडक दिली, परंतु पोलिसांनी संशयिताचा पाठलाग करून त्याला पकडले.
2 ऑगस्ट 2021 रोजी ब्राझीलच्या अनेक बातम्यांच्या वेबसाइटवर आम्हाला अशीच घटना प्रकाशित झाल्याची आढळली. देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘पोलिस अहवालात असे म्हटले आहे की, एजंटांनी गस्त घालत असताना मोटरसायकल चालकाला “संशयास्पद उपक्रमा” मध्ये पाहिले आणि त्यावेळी पोलिसांनी त्याला थांबविण्याचा आदेश दिला, परंतु तरुणाने नकार दिला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.”
यापूर्वी देखील व्हायरल व्हिडीओ काश्मीरच्या श्रीनगरच्या नावाखाली व्हायरल झाला आहे आणि त्यावेळी आम्ही काश्मीरचे पत्रकार जूनेद पीर यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यांनी पुष्टी करताना सांगितले होते की, हा व्हिडिओ काश्मीरचा नाही.
9 मे 2024 च्या बातम्यां नुसार, काश्मीरमधील पुंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या (आईएएफ) ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता आणि याच मालिकेत जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील रेडवानी पाइन भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.
बनावट पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की, वापरकर्त्याच्या वतीने विचारसरणीशी संबंधित पोस्ट शेअर केल्या जातात.
निष्कर्षः विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात आढळले की, व्हायरल केला जात असलेला व्हिडिओ 2021 मधील ब्राझीलचा आहे. ब्राझीलमधील हा जुना व्हिडिओ श्रीनगरशी खोट्या दाव्यासह जोडून व्हायरल केला जात आहे.
- Claim Review : हा व्हिडिओ श्रीनगरचा आहे, ज्यामध्ये पोलीस दहशतवाद्यांना पकडताना दिसत आहेत.
- Claimed By : FB User- Sharma Narendra
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.