Fact Check: गणपती मिरवणुकीत विजेचा धक्का बसल्याचा व्हायरल व्हिडिओ जुना आहे, अलीकडचा नाही

व्हायरल व्हिडिओ ज्यात गणेश मिरवणुकीत लोकांना विजेचा झटका लागतो, तो गुजरात मधील अंकलेश्वर चाच आहे पण जुना आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूजला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मोठया प्रमणवर शेअर होत असलेला व्हिडिओ सामोर आला. गणपती मिरवणुकीत ३ जनांचा मृत्यू झाला असून ७ लोकं घायाळ झालाचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ गुजरात मधील अंकलेश्वरचा अस्ल्याचा दावा करण्‍यात
येत आहे. पण विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचा समजले. हा व्हिडिओ 2019 सालचे आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर, Adv Pramod Kumar ह्यांनी व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि हिंदी मध्ये लिहले:
23 फिट ऊँची गणेश मूर्ति लाते वक्त बिजली के तार से छू कर 3 लड़के मर गए और 7 गंभीर हालत में ,गुजरात के अकलेस्वर की घटना ….संकटमोचन , विघ्नहर्ता, के सामने घटना हो गई पर भगवान आये नही बचाने …????

भाषांतर: २३ फीट उंच गणेशाची मूर्ती आणताना विजेच्या तारेच्या झटक्याने तीन लोकं गेले तर ७ गंभीर जखमी झाले. गुजरात च्या अंकलेश्वर ची हि घटना आहे. संकटमोचन विघ्नहरते समोर हि घटना घडली पण ते वाचवायला आले नाही.

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये अपलोड केला. त्यातून किफ्रेम्स काढल्यानंतर आम्ही त्यावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला.

एका किफ्रेम वरून आम्हाला India TV च्या संकेतस्थळावर 27, ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित एक बातमी मिळाली. बातमी चे शीर्षक होते: गुजरात में गणेश प्रतिमा लाते समय बड़ा हादसा, करंट लगने से 2 की मौत, 5 अस्पताल में भर्ती

2019 मध्ये गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे ही घटना घडल्याची माहिती या बातमीत देण्यात आली आहे.

नंतर, विश्वास न्यूजने कीवर्ड शोध घेतला, आम्हाला TV9 Gujarati च्या YouTube चॅनेलवर व्हिडिओ सापडला.

त्यामुळे हा व्हिडिओ अलीकडील नसून 2019 चा असल्याचे स्पष्ट झाले.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूजने दैनिक जागरणच्या गुजरात आवृत्तीचे ब्यूरो प्रधान संवाददाता, शत्रुघ्न शर्मा यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, “3 वर्षांपूर्वी गुजरातमधील अंकलेश्वर येथील आदर्श मार्केटमध्ये गणेशमूर्ती आणताना हा अपघात झाला होता. या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला होता, तर अन्य गंभीर जखमी झाले होते. पावसाळा होता तसेच, गणेशमूर्ती 23 फूट उंच होती. वर लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाला, त्यामुळे मूर्ती आणणाऱ्या 10 युवकांना विजेचा धक्का लागून गंभीर दुखापत झाली. लोकांच्या श्रद्धेची खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही घटना ताजी असल्याचे सांगून काही उपद्रवी तत्वे लोकांच्या धार्मिक श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे.”

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, आम्ही पोस्ट शेअर केलेल्या यूजरचे बॅकग्राउंड चेक केले. अ‍ॅड. प्रमोद कुमार मे 2020 रोजी व्यासपीठावर सामील झाले. त्यांचे 4867 फॉलोवर आहेत.

निष्कर्ष: व्हायरल व्हिडिओ ज्यात गणेश मिरवणुकीत लोकांना विजेचा झटका लागतो, तो गुजरात मधील अंकलेश्वर चाच आहे पण जुना आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट