Fact check: फूटपाथ कोसळून एक माणूस वाचण्याची घटना चेन्नई ची नसून आंध्र प्रदेश ची आहे
व्हायरल व्हिडिओ ज्यात एक माणूस फूटपाथ कोसळण्यापासून वाचताना वाचताना दिसतो तो व्हिडिओ तिरुपती, आंध्र प्रदेश चा आहे, चेन्नई चा नाही.
- By: Ankita Deshkar
- Published: Aug 13, 2022 at 04:38 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विविध सोशल मीडिया वेबसाइट्सवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस मोबाईल शॉपच्या बाहेर फूटपाथ कोसळून पडलेल्या पडझडीतून वाचताना दिसत आहे. या व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. मात्र, आता काही जण हा व्हिडिओ चेन्नईचा असल्याचा दावा करत आहेत. विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील तिरुपती शहरातील असल्याचे आढळले. आम्हाला असे देखील समजले कि ड्रेनेजचा प्रश्न देखील आता सुटला आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर DURAI ADMK ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि तामिळ मध्ये लिहले: “விடியலோ விடியல்”🙄 சென்னையில் விடியல் ஆட்சியில தற்போது போடப்பட்ட மழைநீர் வடிகால் பணியின் அவலநிலை.
भाषांतर: चेन्नईत सध्या विद्याल शासनाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा निचरा होत असलेल्या कामांची दुर्दशा..
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात हा व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये टाकून किफ्रेम्स शोधले.
त्या किफ्रेम्स वर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला आणि त्यावरून आम्हाला बरेच मीडिया रिपोर्ट्स मिळाले, ज्यात ह्या व्हायरल व्हिडिओ बद्दल संज्ञात आले होते. पण कुठल्याच रिपोर्ट मध्ये हि घटना कुठली आहे ह्याचा उल्लेख केला नव्हता.
त्यानंतर आम्ही किवर्डस सह तपास सुरु केला, आम्हाला युट्युब वर एका चॅनेल वर हा व्हिडिओ शेअर केल्याचे लक्षात आले.
V6 News Telugu ज्यांचे 8.15 मिलियन स्बस्क्राइबर्स आहेत, त्या व्हिडिओ सोबत इंग्लिश मध्ये लिहले होते: Footpath Collapsed At Tirupati Air Bypass Road Over Govt Negligence | V6 News
आता हे स्पष्ट झाले होते कि हा व्हिडिओ तिरुपती शहर, आंध्र प्रदेश चा आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने आंध्र प्रदेश च्या पत्रकारासोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला वेदमं मोबाईल शॉप चा नंबर दिला, ज्या दुकानासमोर हि घटना घडली.
त्यानंतर आम्ही त्या दुकानातील मॅनेजर ला फोन वर संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हि घटना एक आठवड्या आधी दुकानासमोर घडली असे त्यांनी सांगितले. त्यांनी हे देखील सांगितले कि हि फूटपाथ आता मुनिसिपालिटी ने ठीक केला आहे.
तपासाच्या शेवटच्या आम्ही, त्या ट्विटर प्रोफाइल चा तपास केला ज्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. DURAI ADMK தோகமலை கிழக்கு ஒன்றியம் தகவல் தொழிநுட்ப @DURAIDU78031144 ने जानेवारी 2021 मध्ये ट्विटर जॉईन केले आणि त्यांना 1,368 लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: व्हायरल व्हिडिओ ज्यात एक माणूस फूटपाथ कोसळण्यापासून वाचताना वाचताना दिसतो तो व्हिडिओ तिरुपती, आंध्र प्रदेश चा आहे, चेन्नई चा नाही.
- Claim Review : चेन्नईत सध्या विद्याल शासनाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा निचरा होत असलेल्या कामांची दुर्दशा..
- Claimed By : DURAI ADMK
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.