Fact Check: व्हायरल व्हिडिओ चा अयोध्या मध्ये बनत असलेल्या राम मंदिर सोबत काही संबंध नाही
विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल व्हिडिओ ग्राफिक डिजाइनर रोहित सांखला यांनी आपल्या युट्युब चॅनेल ‘शिवाजी होम डिजाइन’ साठी बनवला होता, ज्याला लोकं राम मंदिर चा ऍनिमेटेड व्हिडिओ समजून शेअर करत आहे. खरा राम मंदिर चा ऍनिमेटेड व्हिडिओ बराच वेगळा आहे.
- By: Pragya Shukla
- Published: Jan 14, 2023 at 02:01 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): एका मंदिराचा थ्रीडी अनिमेशन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करून, यूजर्स ते उत्तर प्रदेशातील अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराचे अधिकृत अनिमेशन असल्याचे सांगत आहेत. यासोबतच राम मंदिर बांधल्यानंतर ते असे काही दिसेल, असेही यूजर्स सांगत आहेत.
विश्वास न्यूजने ह्या व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि दावा खोटा असल्याचे त्यात समजले. हा व्हायरल व्हिडिओ ग्राफिक डिझायनर रोहित सांखला यांनी त्यांच्या ‘शिवाजी होम डिझाईन’ या यूट्यूब चॅनेलसाठी तयार केला होता, जो लोकांनी अधिकृत व्हिडिओ म्हणून शेअर करण्यास सुरुवात केली. राम मंदिर अनिमेशन चा मूळ व्हिडिओ व्हायरल झालेल्या व्हिडिओपेक्षा खूप वेगळा आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर जितेंद्र सिंह ने 11 जानेवारी 2023 रोजी एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहले: “करोड़ों हिन्दुओं का धाम अयोध्या में भव्य श्री राम मंदिर अगले वर्ष जनवरी में स्थापित हो रहा है। जय श्री राम।”
या पोस्ट ला बाकी यूजर्स देखील खरे समजून शेअर करत आहेत. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्डसह गूगल वर शोधण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान, आम्हाला ‘शिवाजी होम डिझाईन’ नावाच्या युट्युब चॅनेलवर अपलोड केलेला संपूर्ण व्हिडिओ सापडला. 3 नोव्हेंबर 2021v रोजी व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ रोहित सांखला याने तयार केला आहे, जे ग्राफिक डिझायनर आहे आणि असे व्हिडिओ बनवतात. त्यांच्या चॅनलवर असे अनेक व्हिडिओ आहेत.
तपास पुढे नेत, आम्ही इतर कीवर्डद्वारे गूगल वर शोधण्यास सुरुवात केली. दरम्यान, एएनआयच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या दाव्याशी संबंधित एक रिपोर्ट आम्हाला सापडला. हा रिपोर्ट 13 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित झाला होता. रिपोर्टनुसार, राम मंदिर ट्रस्टने 13 जानेवारी 2022 रोजी राम मंदिराचा 3डी ऍनिमेश व्हिडिओ जारी केला होता.
शोध दरम्यान, आम्हाला दैनिक जागरणच्या वेबसाइटवर 13 फेब्रुवारी 2022 रोजी प्रकाशित झालेल्या दाव्याशी संबंधित आणखी एक अहवाल सापडला. रिपोर्टनुसार, राम मंदिर ट्रस्टने 13 फेब्रुवारीला राम मंदिराच्या 3डी अनिमेशन दुसरा व्हिडिओ जारी केला होता.
तपास पुढे नेत आम्ही राम मंदिर ट्रस्टच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू केली. यादरम्यान, आम्हाला अकाउंटवर पोस्ट केलेले दोन्ही व्हिडिओ आढळले. पहिला व्हिडिओ 13 जानेवारी 2022 रोजी आणि दुसरा 13 फेब्रुवारी 2022 रोजी शेअर करण्यात आला होता. दोन्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर, आम्हाला आढळले की ते व्हायरल व्हिडिओपेक्षा बरेच वेगळे आहे.
अधिक माहितीसाठी आम्ही व्हायरल व्हिडिओमागील ग्राफिक डिझायनर रोहित सांखला ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले, व्हायरल दावा खोटा आहे. लोकांची श्रद्धा आणि स्थान लक्षात घेऊन त्यांनी वर्षभरापूर्वी हा व्हिडिओ बनवला होता. त्याचा राम मंदिर ट्रस्ट किंवा बांधकामाशी काहीही संबंध नाही. “मी हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करण्यासाठी बनवला होता, पण लोकांनी तो अधिकृत व्हिडिओ समजून शेअर करायला सुरुवात केली,” असे ते म्हणाले.
दैनिक जागरणच्या वेबसाइटवर 10 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, “मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करायचे आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात रामलला भव्य गर्भगृहात विराजमान होणार असून, भाविकांच्या दर्शनाला सुरुवात होणार आहे. हे लक्षात घेऊन श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला दगडी कोरीव कामासह इतर सर्व तयारी आधीच पूर्ण करायची आहे. त्यामुळे दगडी बांधकामात मजुरांची फौज तैनात करण्यात आली होती. राजस्थानमधील सिरोही येथील वर्कशॉपमध्ये सुमारे एक हजार तर अयोध्येतील रामसेवकपुरम, न्यास वर्कशॉप आणि मंदिर संकुलात पाचशे कामगार आहेत.
तपासाअंती, विश्वास न्यूजने बनावट दावा शेअर करणाऱ्या जितेंद्र सिंगच्या फेसबुक हँडलचे सोशल स्कॅनिंग केले. फेसबुकवर युजरचे 3500 पेक्षा जास्त मित्र आहेत. प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, युजर हा रायबरेलीचा रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल व्हिडिओ ग्राफिक डिजाइनर रोहित सांखला यांनी आपल्या युट्युब चॅनेल ‘शिवाजी होम डिजाइन’ साठी बनवला होता, ज्याला लोकं राम मंदिर चा ऍनिमेटेड व्हिडिओ समजून शेअर करत आहे. खरा राम मंदिर चा ऍनिमेटेड व्हिडिओ बराच वेगळा आहे.
- Claim Review : अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराच्या अधिकृत अनिमेशन व्हिडिओ.
- Claimed By : जितेंद्र सिंह
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.