व्हायरल व्हिडिओ मध्ये महिलांसोबत नृत्य करताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसून, कवठे पिरान चे सरपंच भीमराव माने आहेत.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईट्स वर चांगलाच व्हायरल होताना दिसला. ह्या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती जे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असे दिसते. ह्या व्हिडिओ मध्ये काही बायका देखील नृत्य करताना दिसतात. असा दावा करण्यात येत आहे कि ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आहेत. पण विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल व्हिडिओ मधील व्यक्ती सांगली नजीकचे गाव कवठे पिरान येथील सरपंच, भीमराव माने असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, Nilesh Chavan ने व्हायरल व्हिडिओ “एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक” ह्या ग्रुप मध्ये पोस्ट केला आणि लिहले: मला वाटलं #शहाजीच_शौकीन आहे पण बघतो तर गुवाहाटी निर्माते या 40 चोर चा म्होरक्या पण लपून छपून लाजून अंग हलवतो स्टेज वर
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी हा व्हिडिओ नीट निरखून बघितला. त्यात असे लक्षात आले कि जर ह्या व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्री स्वतः असते तर सेक्युरिटी करता काही लोकं दिसले असते नाही तर काही प्रसिद्ध नेते तरी दिसले असते. पण आम्हाला असे काहीच स्टेज वॉर जाणवले नाही.
व्हिडिओ खूपच अस्पष्ट होता, पण काही वेळानंतर, स्टेज वर मागे लागलेल्या बॅनर वर ‘टायगर ग्रुप आयोजित‘ असे लिहलेले दिसले. आता हे स्पष्ट होते कि हा व्हिडिओ टायगर ग्रुप नामक संस्थेनी, महाराष्ट्रात आयोजित केला होता.
आम्ही काही किवर्डस वापरून, महाराष्ट्रातील टायगर ग्रुप बद्दल शोधून काढले.
फेसबुक ला सर्च इंजिन सारखे वापरून आमचा संपर्क टायगर ग्रुप चे एक सदस्य आकिब ह्यांच्या सोबत झाला. आम्हाला असे कळले कि टायगर ग्रुप एक सामाजिक संस्था आहे जी तानाजी जाधव ह्यांच्या नेतृत्वात चालवली जाते.
आम्ही आकिब ह्यांच्या सोबत हा व्हिडिओ व्हाट्सअँप वर शेअर केला. त्यांनी सांगितले कि असा कुठलाच कार्यक्रम टायगर ग्रुप तर्फे घेण्यात आला नाही जिथे एकनाथ शिंदे ह्यांना अतिथी म्हणून बोलावण्यात आले असतील. किंवा व्हिडिओ मधला कार्यक्रम देखील त्यांच्या तर्फे घेण्यात आला नाही.
पण आकिब ह्यांनी आपल्या सांगली च्या एका कारकर्त्यासोबत संवाद साधला, ज्यांनी सांगितले कि व्हिडिओ सांगली मधील एक गाव कवठे पिरान चा आहे. हा कार्यक्रम तिथे घेण्यात आला होता.
आम्ही परत किवर्डस वापरून, कवठे पिरान मधील टायगर ग्रुप चे कोणी कार्यकर्ते सापडतात का हे शोधून काढले. आम्हाला एक पोस्टर त्यात सापडले. ह्या पोस्टर वर काही कार्यकर्त्यांचे फोन नंबर होते.
आम्ही टायगर ग्रुप चे राहुल पाटील ह्यांना संपर्क केला. त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि हा व्हिडिओ १५ सप्टेंबर रोजी घेण्यात आला आहे, जेव्हा टायगर ग्रुप ने रस्सी खेच स्पर्धेचे कवठे पिरान मध्ये आयोजन केले होते. ह्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण, ‘गौरी पुणेकर डान्स शो’ असे होते. व्हिडिओ मध्ये दिसत असलेली व्यक्ती, कवठे पिरान चे सरपंच, भीमराव माने आहेत. भीमराव माने हे हिंदकेसरी मारुती माने ह्यांचे पुतणे आहे. पाटील ह्यांनी सांगितले कि हा एक पब्लिक कार्यक्रम होता आणि म्हणून अशी शक्यता आहे कि बऱ्याच लोकांनी फोन वर रेकॉर्डिंग करून हा व्हिडिओ शेअर केला असेल. पण व्हिडिओ मधील व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीत. ते भीमराव माने आहेत.
अजून एका टायगर ग्रुप चे कार्यकर्ते, विशाल शिंदे ह्यांनी देखील हे स्पष्ट केले.
आम्ही सीएम ऑफीस मधील विराज मुळे ह्यांना देखील संपर्क केला, त्यांनी सांगितले कि एकनाथ शिंदे अश्या कुठल्याच कार्यक्रमात गेले नाही.
विश्वास न्यूज ला हा ह्या व्हिडिओ चा सोर्स सापडला नाही. पण हे स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ मध्ये एकनाथ शिंदे नसून भीमराव माने आहेत.
शेवटच्या टप्प्यात आम्ही, ज्या फेसबुक यूजर ने हा दावा करत व्हिडिओ शेअर केला, त्यांचे बॅकग्राउंड चेक केले. आम्हाला कळले कि निलेश चव्हाण हे पुण्याचे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: व्हायरल व्हिडिओ मध्ये महिलांसोबत नृत्य करताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसून, कवठे पिरान चे सरपंच भीमराव माने आहेत.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923