Fact Check: बंगलोरच्या बाजाराच्या गर्दीचा व्हायरल व्हिडिओ या वर्षीचा नाही, २०१९ चा आहे

विश्वास न्यूज़ ला आपल्या तपासात पोस्ट मध्ये केलेले दावे चुकीचे आढळले. व्हायरल व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे. या वर्षी कोरोनाव्हायरस महामारीमुळे बाजार ३१ ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे.

Fact Check: बंगलोरच्या बाजाराच्या गर्दीचा व्हायरल व्हिडिओ या वर्षीचा नाही, २०१९ चा आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका बाजारातली गर्दी दिसून येते. व्हायरल व्हिडिओ मध्ये दावा केला जात आहे कि कोरोनाव्हायरस नियमांचे उल्लंघन करून वरमाला मुखक्ष्मी व्रतम उत्सव च्या वेळी बंगलोर च्या केआर मार्केट मध्ये खूप गर्दी जमली. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. व्हायरल व्हिडिओ मागच्या वर्षी चा आहे. यावर्षी कोरोनाव्हायरस महामारी मुळे ३१ ऑगस्ट होता.

काय होत आहे व्हायरल?

व्हायरल व्हिडिओ मध्ये एका बाजारात खूप गर्दी दिसते, त्यात कोरोनाव्हायरस नियम असताना देखील वरमाला मुखक्ष्मी व्रतम उत्सवादरम्यान बंगलोर च्या केआर मार्केट मध्ये अशी गर्दी झाली.

व्हायरल पोस्ट ची आर्काइव लिंक इथे बघा.

तपास:
आम्ही या व्हिडिओ चा तपास सगळ्यात आधी InVID टूल च्या मदतीने केला. या व्हिडिओ चे स्क्रीनग्रैब्स घेतले आणि नंतर गूगल रिवर्स इमेज वर, ‘Bangalore KR Market’ हे कीवर्ड्स वापरून सर्च केले. आम्हाला YouTube वर हा व्हिडिओ सापडला, ज्याला मागच्या वर्षी अपलोड केले होते. या व्हिडिओ च्या कॅप्शन मध्ये लिहले होते, “बेंगलुरु के केआर मार्केट में वरमाला मुखलक्ष्मी व्रतम के दौरान का दृश्य.” हा व्हिडिओ ८ ऑगस्ट, २०१९ रोजी अपलोड केला गेला होता.

आम्हाला ब्रुहट बेंगलुरु महानगर पालिक (बीबीएमपी) चे कमिश्नर एन मंजूनाथ प्रसाद यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर देखील ३१ जुलै रोजी केलेला एक ट्विट मिळाला ज्यात लिहले होते, “केआर मार्केट आणि कालीसपालय ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत बंद राहतील.”

केआर मार्केट बंद राहणार असल्याची बातमी आम्हाला टाइम्स ऑफ़ इंडिया च्या संकेतस्थळावर देखील सापडली.
या विषयावर अधिक माहिती करता आम्ही बीबीएमपी स्पेशल कमिश्नर (मार्केट्स) एस जी रवींद्र यांच्या सोबत संपर्क साधला. त्यांनी म्हंटले कि हा व्हिडिओ जुना आहे. या वर्षी कोरोनाव्हायरस महामारी ला लक्षात घेता केआर मार्केट ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. मार्केट मार्च महिन्यापासून बंद आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

या पोस्ट ला सोशल मीडिया वर Narendra_Krishnappa @Narendra_K1208 या ट्विटर यूजर नि शेअर केले आहे. यूजर ने प्रोफाइल २०१८ साली बनवले होते. या यूजर चे ११ फोल्लोवर्स आहेत .

निष्कर्ष: विश्वास न्यूज़ ला आपल्या तपासात पोस्ट मध्ये केलेले दावे चुकीचे आढळले. व्हायरल व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे. या वर्षी कोरोनाव्हायरस महामारीमुळे बाजार ३१ ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट