Fact Check: हा व्हायरल व्हिडिओ बंगळुरूच्या नाही, तर महाराष्ट्रातील ट्रॅफिक जॅमचा आहे

विश्वास न्यूज (नवी दिल्ली). आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यामध्ये काही लोक पाईपमधून बाहेर येत दिसत आहेत. या व्हिडिओला बेंगळुरूच्या वाहतूक समस्येशी जोडून शेअर केला जात आहे. काही वापरकर्ते हा व्हिडिओ बंगळुरूच्या बेलंदूर शहरातील आहे असे सांगत आहेत.

विश्वास न्यूजला आपल्या तपासात आढळले की, हा व्हायरल दावा खोटा आहे. तपासाच्या दरम्यान, हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. जिथे रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होत असताना, लोक रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या पाईपच्या आतून त्यांच्या बाईक घेऊन जात आहेत. व्हायरल व्हिडिओचा बंगळुरूशी काहीही संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक वापरकर्ता अश्विनी सिंगने 28 एप्रिल, 2023 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता. वापरकर्त्याने इंग्रजीमध्ये कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “बेलंदूरमध्ये उघडला गेला भारताचा पहिला हायपरलूप!!#बेंगळुरू.”

काही अन्य सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ याच दाव्यासह शेअर केला आहे. या पोस्टची संग्रहित लिंक इथे पाहता येईल.

तपास

या व्हिडिओच्या सत्यतेचा शोध घेण्यासाठी, आम्ही संबंधित कीवर्डसह गुगलवर शोध सुरू केला. न्यूज 18च्या संकेतस्थळावर व्हायरल व्हिडिओशी संबंधित अहवाल आम्हाला आढळला. 28 एप्रिल, 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट वापरण्यात आला आहे. दिल्या गेलेल्या माहितीनुसार, “व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील कल्याणचा आहे, जिथे काही बाईक चालक वाहतूक टाळण्यासाठी पाईपच्या आतून बाइक चालवत आहेत.”

तपासादरम्यान आम्हाला, ‘एचपी लाईव्ह न्यूज‘च्या सत्यापित ट्विटर हँडलवर देखील व्हायरल व्हिडिओशी संबंधित ट्विट सापडले. 21 एप्रिल, 2023 रोजी, व्हिडिओ ट्विट करून लिहिले गेले होते, “वाहतुकीपासून दूर राहण्यासाठी, बाइक चालकांनी अजब रस्ता शोधला आहे, महाराष्ट्राच्या कल्याणमधील एक वायरल व्हिडिओ समोर येत आहे.

ज्यामध्ये काही बाईक चालक वाहतूक टाळण्यासाठी पाईपच्या आत बाईक चालवत आहेत. कल्याणच्या शील रस्त्यावर देसाई गावात एक प्रचंड ट्रॅफिक जॅम होती. रहदारी टाळण्यासाठी, बाईक चालकांनी मोठ्या पाईपमधून उलट दिशेने गाडी चालवून शॉर्टकट मारला. बाईक चालकांची ही बेजबाबदार कृती व्हायरल झाली आहे.

विश्वजीत आर. भोईर‘ नावाच्या एका फेसबुक वापरकर्त्याने 20 एप्रिल, 2023 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओला इंग्रजी भाषेत कॅप्शन देण्यात आले आहे आणि शेअर करण्यात आले आहे.

हा व्हिडिओ कल्याणमधील शील रोड देसाईचा असल्याचे म्हटले आहे. आम्हाला विश्वजीतच्या फेसबुक अकाऊंटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओशी संबंधित आणखी एक पोस्ट सापडली. 21 एप्रिल, 2023 रोजी एका पोस्टमध्ये वापरकर्त्याने लिहिले आहे की, “मी काल पोस्ट केलेला व्हिडिओ, लोकमत कल्याण डोम्बिवलीद्वारे नोटीस केलेला व्हिडिओ आहे. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक नेत्याच्या काही लक्षात आले का? धन्यवाद.”

या व्हायरल व्हिडिओ संबंधित इतर बातम्या इथे वाचता येतील. माहितीसाठी आम्ही मुंबईतील पत्रकार वरुण सिंग यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, “हा व्हिडिओ मुंबईचा आहे, बेंगळुरूचा नाही.

खोट्या दाव्यासह व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या अश्विनी सिंग या युजरचे फेसबुक प्रोफाईल स्कॅन करण्यात आले. त्यानुसार, वापरकर्ता नेपाळच्या काठमांडूचा रहिवासी आहे. फेसबुकवर त्याचे 152 मित्र आहेत.

निष्कर्षः विश्वास न्यूजला त्यांच्या चौकशीत आढळले की, व्हायरल व्हिडिओबद्दल केलेला दावा चुकीचा आहे. महाराष्ट्रातील हा व्हिडीओ बंगळुरूचा असल्याचा सांगून शेअर केला जात आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट