Fact Check: वृद्ध महिलेच्या हत्तेचा प्रयत्न करणारा व्यक्ती त्या महिलेचा मुलगा नाही, चुकीचा दावा व्हायरल
- By: Jyoti Kumari
- Published: Feb 6, 2024 at 05:26 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर एका वृत्त महिलेवर अत्याचार करताना एका व्यक्तीचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेचा गळा एक व्यक्ती निर्दयीपणे आवळतो आहे असे दाखवले गेले आहे. आता काही युजर्सचे असे म्हणणे आहे की हा व्यक्ती त्या महिलेचा मुलगा आहे.
विश्वास न्यूजने आपल्या पडताळणी मध्ये असे पाहिले की हा दावा चुकीचा आहे. हा व्हिडिओ आंध्र प्रदेश राज्यातील आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध महिने का मुलगा नसून, तो एक टेबल ऑपरेटर आहे. या व्हिडिओला भ्रामक पद्धतीने शेअर केले जात आहे.
काय आहे या व्हायरल पोस्ट मध्ये?
फेसबुक युजर नाजीमा सिद्दिकीने (आर्काइव लिंक) वायरम व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ” हे ईश्वर हा राक्षस कोण आहे, जो आपल्या आईला इतक्या निर्दयीपणे मारत आहे. मला हा व्यक्ती कोण आहे हे माहिती नाही, पण याला इतके रीपोस्ट करा की हा राक्षस पकडला जाईल.”
काही इतर यूजर्स ने या व्हिडीओ ला शेअर करत यासारखाच दावा केला आहे.
पडताळणी
“आपली पडताळणी सुरू करण्याआधी सर्वात आधी आम्ही व्हिडिओचे स्क्रीन शॉट काढले, त्यानंतर त्याला गुगल इमेज द्वारे सर्च केले. आम्हाला एबीपी लाईव्ह डॉट कॉमवर व्हिडिओ संदर्भातील बातमी मिळाली. 30 जानेवारी 2024 ला प्रकाशित केल्या गेलेल्या बातमीनुसार, “आंध्रप्रदेशमध्ये हृदयात पिळवटून टाका आणि घटना समोर आली आहे, यामध्ये घरात कामासाठी आलेल्या केबल टेक्निशियन ने कधीतरीत्या वृत्त महिलेच्या हप्तेचा प्रयत्न केला आहे. तेथे गवरपालेम मध्ये झालेल्या घटनेचे चित्रीकरण खोलीमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरयामध्ये कैद झाले आहे, त्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. 26 जानेवारी 2024 लग्नाला या घटनेमध्ये गोविंद नावाच्या आरोपीची ओळख पटली आहे.”
वायरल व्हिडिओ संदर्भातील बातमी इंडिया टीव्हीच्या न्यूज वेबसाइटवर पण मिळाली. 30 जानेवारी 2024 ला प्रकाशित झालेल्या बातमीमध्ये व्हिडिओचा स्क्रीनशॉट वापरला गेला आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार ही घटना विशाखापट्टणमच्या गवारापालेम भागात झाली आहे. जेथे एका केबल टेक्निशियन वर वृद्ध महिलेच्या सोन्याच्या चैनला चोरण्याच्या उद्देशाने गळा दाबून महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या आरोपीची ओळख गोविंद म्हणून झाली आहे.
ईटीव्ही भारतवर 30 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले आहे की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव हे गोविंद असून तो केबल ऑपरेटर म्हणून काम करतो.
“पीडीतेचा मुलगा किशोर याने सांगितले की आरोपीने सोमवारी सकाळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. किशोर याने या गोष्टीवर अत्यंत दुःख व्यक्त करत असे सांगितले की जी स्थिती त्याच्या आईची आहे, अशी स्थिती कोणाचीही व्हायला नको.
व्हिडिओ संदर्भातील अन्य बातम्या या लिंक वर आपण वाचू शकता.
अधिक माहितीसाठी आम्ही आंध्र प्रदेशचे पत्रकार राहुल देवुलपल्ली यांच्याशी संपर्क साधला. त्याने सांगितले की, “हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील आहे. पण व्हिडिओमध्ये जी व्यक्ती दाखवली जात आहे ती व्यक्ती त्या वृद्ध महिलेचा मुलगा नाही.”
शेवटी,आम्ही विडिओ खोट्या दाव्यासह शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे खाते स्कॅन केले. वापरकर्त्याचे 2 हजार मित्र आहेत. युजरने त्याच्या प्रोफाईलवर स्वतःला दिल्लीचा रहिवासी असल्याचे सांगितले आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने आपल्या तपासणीत आढळून आले की एका पुरुषाने वृद्ध महिलेचा निर्घृणपणे गळा दाबल्याच्या व्हायरल व्हिडिओबाबत केला जात असलेला दावा हा खोटा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती हा त्या महिलेचा मुलगा नसून एक केबल ऑपरेटर आहे. आंध्र प्रदेशातील हा व्हिडिओ खोटा दावा करून शेअर करण्यात आला होता.
- Claim Review : मुलाने स्वतःच्या आईची निर्घृण हत्या केली.
- Claimed By : फेसबुक यूजर – नाझिमा सिद्दीकी
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.