X
X

Fact Check: चॅनेल च्या ट्विट चा खोटा स्क्रीनशॉट व्हायरल करत शाहरुख खान बद्दल करण्यात येत आहे खोटा दावा

एनडीटीव्ही च्या खोट्या ट्विट चा स्क्रीनशॉट खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. एनडीटीव्ही ने असा कुठलाच ट्विट केला नाही. तसेच, शाहरुख खान ने देखील आपल्या आगामी चित्रपटाबद्दल कुठलीच अपील केली नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): शाहरुख खान चा येणार चित्रपट ‘पठाण’ ला घेऊन सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यूजर्स एनडीटीव्ही च्या एका ट्विट चा स्क्रीनशॉट शेअर करत आहे. ह्यात लिहले आहे, ‘किंग खान यानी की शाहरुख खान की अपील’
ज्यादा से ज्यादा मुस्लिम फिल्म ‘पठान’ को देखें. इसकी कमाई का 10% हाजी अली और 10% हिस्सा अजमेर दरगाह को दिया जाएगा।
स्क्रीनशॉट च्या खाली तारीख 30 मार्च 2022 अशी देण्यात आली आहे.

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल स्क्रीनशॉट खोटा असल्याचा समजले. शाहरुख खान ने ह्या प्रकारची कुठलीच अपील केली नाही, आणि एनडीटीव्ही ने देखील असा कुठला ट्विट केला नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, ‘आशिष शुक्ल‘ ने स्क्रीनशॉट शेअर जातात लिहले:

अत्यंत भावुक अपील
(आपको पता है ना क्या करना है मित्रों??)

तपास:
व्हायरल दाव्याचा तपासासाठी आम्ही सगळ्यात आधी स्क्रीनशॉट नीट बघितला. ह्यात ‘और’ च्या जागी ‘ओर’ लिहले आहे, जेव्हाकी एनडीटीव्ही एक विश्वसनीय मीडिया ऑर्गनायझेशन आहे, जे अशी चूक करू शकत नाही. ह्या शिवाय एनडीटीव्ही ची आयडी, @mdtvindia अशी लिहण्यात आली आहे. NDTV India चा आयडी @ndtvindia आहे. आम्ही NDTV Indiaच्या वेरिफाइड ट्विटर अकाउंट चा तपास केला. त्यात शोधल्यास आम्हाला 30 मार्च रोजी शाहरुख खान चा चित्रपट पठाण वरून कुठलाच ट्विट केल्याचे आढळले नाही.

ह्या बद्दल अधिक माहिती साठी आम्ही एनडीटीव्ही चे वरिष्ठ पत्रकारांना संपर्क केला. त्यांचे म्हणणे होते की हा स्क्रीनशॉट खोटा आहे. @mdtvindia अशी आयडी असल्यामुळे हे स्पष्ट दिसते कि हा खोटा स्क्रीनशॉट आहे. ह्या प्रकारचा कुठलाच ट्विट एनडीटीव्ही ने केला नाही.

आता आम्ही शाहरुख खान ने व्हायरल होत असलेली अपील केली कि नाही, ह्याची पुष्टी करण्यासाठी किवर्ड सर्च चा वापर केला. पण अशी कुठलीच बातमी आम्हाला मिळाली नाही, ज्यात ह्या वक्तव्याची पुष्टी होईल. अधिक माहिती साठी आम्ही मुंबई मध्ये एंटरटेनमेंट चे वरिष्ठ पत्रकार पराग छापेकर ह्यांना संपर्क केला. त्यांनी हे वक्तव्य खोटे असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले कि शाहरुख खान ने असे कुठलेच वक्तव्य केले नाही.

ह्या आधी देखील शाहरुख खान चा चित्रपट पठाण वरून खोटे वक्तव्य व्हायरल झाले होते. विश्वास न्यूज ने ह्याचा तपास करून शोधले होते कि हा दावा खोटा होता. पूर्ण रिपोर्ट इथे वाचू शकता.

एनडीटीव्ही चा खोटा स्क्रीनशॉट खोट्या दाव्यासह पोस्ट करणाऱ्या फेसबुक यूजर ‘आशीष शुक्ल’ च्या प्रोफाइल ला आम्ही स्कॅन केले. ते फेसबुक वर जुलै 2012 पासून सक्रिय आहेत आणि एका विशिष्ठ विचारधारा पासून प्रेरित आहेत.

निष्कर्ष: एनडीटीव्ही च्या खोट्या ट्विट चा स्क्रीनशॉट खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. एनडीटीव्ही ने असा कुठलाच ट्विट केला नाही. तसेच, शाहरुख खान ने देखील आपल्या आगामी चित्रपटाबद्दल कुठलीच अपील केली नाही.

  • Claim Review : एनडीटीवी ने ट्विट केले: शाहरुख खान ने कहा, ज्यादा से ज्यादा मुस्लिम फिल्म 'पठान' को देखें। इसकी कमाई का 10% हाजी अली और 10% हिस्सा अजमेर दरगाह को दिया जाएगा।
  • Claimed By : FB User- आशीष शुक्ल
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later