Fact Check: अखिलेश यादव च्या नावावर व्हायरल होत असलेला ट्विट खोटा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. अखिलेश यादव कडून असे कुठलेच ट्विट करण्यात आले नाही. व्हायरल ट्विट फेक असल्याचे कळले.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): युपी मधील विधानसभा निवडणुकांच्या मध्ये, विविध खोट्या पोस्ट व्हायरल होत आहे. अश्यातच एक ट्विट आता व्हायरल होत आहे, ज्यात सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत कि हा ट्विट सपा चिफ अखिलेश यादव ह्यांनी केला. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि त्यात हा दावा खोटा निघाला. अखिलेश यादव नि असा कुठलाच ट्विट केला नाही आहे. व्हायरल ट्विट खोटा असल्याचे सिद्ध झाले.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर मोहित गुप्‍ता ने 6 नोव्हेंबर रोजी एका ट्विट चा स्क्रीनशॉट आपल्या अकाउंट वर अपलोड करून लिहले: ‘अकलेश भैया जैसे लोगों धरती पे कभी कभी ही जन्म लेते है।’

व्हायरल ट्विट वर अखिलेश यादव चे चित्र वापरण्यात आले आहे. सोबत लिहले होते, ‘ छक्‍का मारकर भारत के विश्‍व कप अभियान की उम्‍मीद को जीवंत करने पे यादव शिरोमणि सूर्यकुमार का हार्दिक आभार। हमारी सरकार आने पर आपको तीनों फॉर्मे का कप्‍तान बनाया जायेगा।’

ट्विट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने व्हायरल ट्विट चा तपास पोस्ट मध्ये दिलेल्या ट्विटर हॅन्डल @yadavakhilesh चा तपास करून केला. अखिलेश यादव च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर आम्हाला व्हायरल ट्विट सारखा दिसणारा एक पण ट्विट मिळाला नाही.

आम्ही व्हायरल ट्विट ला स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि भाषा, कन्टेन्ट आणि चित्राचा शेप हा ट्विटर च्या फॉरमॅट सोबत मॅच होत नाही. ट्विट मध्ये वापरलेले चित्र चौकोनी आकाराचे दिसले, जेव्हाकी ट्विट मध्ये वापरण्यात आलेले चित्र ह्याचे कोपरे नेहमी गोल आकाराचे असतात.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने समाजवादी पार्टी के प्रवक्‍ता राजीव राय ह्यांना संपर्क केला. त्यांच्यासोबत आम्ही व्हायरल ट्विट शेअर केला. त्यांनी सांगितले कि हि ट्विट खोटी आहे.

विश्वास न्यूज ने शेवटच्या टप्प्यात खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला, त्यात आम्हाला कळले कि फेसबुक यूजर मोहित गुप्‍ता ह्यांचे चार हजार पेक्षा जास्ती फ्रेंड्स आहेत आणि यूजर लखनौच्या रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. अखिलेश यादव कडून असे कुठलेच ट्विट करण्यात आले नाही. व्हायरल ट्विट फेक असल्याचे कळले.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट