Fact-Check: शेफाली वैद्य यांच्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट चे छायाचित्र खोटे आहे

विश्वास न्यूज च्या तपासात, लेखिका शेफाली वैद्य यांच्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट मॉर्फ्ड असल्याचे समजले. हे ट्विट चे छायाचित्र खोटे आहे. त्यांनी हे ट्विट शेअर केले नाही.

Fact-Check: शेफाली वैद्य यांच्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट चे छायाचित्र खोटे आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला शेफाली वैद्य यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या एका ट्विट चे छायाचित्र विविध सोशल नेटवर्किंग वेबसाईट वर आढळले, त्यांनी वादग्रस्त तनिष्क जाहिरातीविरूद्ध आपला आक्रोश दाखविला असा दावा त्या ट्विट च्या छायाचित्रांद्वारे केला जात आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. व्हायरल होत असलेले ट्विट शेफाली वैद्य यांनी आपल्या प्रोफाइल वरून केले नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ‘Muslims of India’ यांनी लेखिका शेफाली वैद्य यांनी एक ट्विट केला असा दावा करून त्यांच्या नावाने ट्विट चे छायाचित्र शेअर केले आणि त्याबरोबर लिहले, “What #BoycottTanishq is on Twitter and what it actually is.
From one lakh twelve thousand to 200 rupees.
©️ https://t.co/lGWjgsqRx2′

या पोस्ट प्रमाणे शेफाली वैद्य यांनी केलेल्या ट्विट चा मजकूर खालील प्रमाणे आहे:
Last year ,I bought “Luminous gold neckwear set” of INR 112484price from @TanishqJewelry that was my life worst decision. I gonna sell this “Jihadi” brand in any local store because I don’t want such Hinduphobic brand in my home. #BoycottTanishq

या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

अजून एक फेसबुक पेज ‘Mahua Moitra Fans‘ यांनी देखील हेच ट्विट चे छायाचित्र आपल्या पेज वर शेअर केले आणि लिहले, “Reality of #BoycottTanishq movement.
BJP don’t want anyone to promote peace & unity. If the peace is restored in the country, Modi will have to start his first job again. ☕️

या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तसेच, ट्विटर यूजर, “Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील” यांनी देखील शेफाली वैद्य यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या ट्विट चे छायाचित्र आपल्या ट्विटर प्रोफाइल वर शेअर केले. त्यांनी लिहले, “देवा रे देवा!Woman facepalmingRolling on the floor laughing
@ShefVaidya जी “कडू”न विकायला काढलेले 112484₹ चे दागिने 199₹ मध्ये मिळत आहेत.Rolling on the floor laughing धन्य हो आप @narendramodi जी जो एैसे महान कार्यकर्तावों को संभालते हो। @SardesaiVarun @Raja_Africa @AnaghaAcharya @kundanAvhad19 @real230799 @shwetasuryava19 @PomaneSpeaks

या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
दागिन्यांचे ब्रँड तनिष्क यांनी नुकतीच एक जाहिरात प्रसारित केली होती. या जाहिरातीत एक हिंदू सून आणि तिची मुसलमान सासू दाखवण्यात आली आहे, सोशल मीडिया वर लोकांनी या जाहिरातीचा बहिष्कार केल्यानंतर, तसेच #BoycottTanishq सोशल मीडिया वर ट्रेंड झाल्या नंतर तनिष्क ने ती जाहिरात काढून घेतली. पण हे सगळे होत असताना लेखिका शेफाली वैद्य यांच्या नावाने एका ट्विट चे छायाचित्र व्हायरल होत आहे.

विश्वास न्यूज ने या व्हायरल छायाचित्राचा तपास केला. आम्ही सगळ्यात आधी शेफाली वैद्य यांचे ट्विटर प्रोफाइल तपासले. आम्हाला जाणून घ्यायचे होते कि खरेच त्यांनी असा कुठला ट्विट केला कि नाही. आम्हाला त्यांच्या प्रोफाइलवर कुठेच असा ट्विट केलेला दिसला नाही.

नंतर आम्ही ज्या ट्विट चे छायाचित्र शेफाली वैद्य यांच्या नावावर व्हायरल होत आहे ते निरखून बघितले.

विश्वास न्यूज च्या तपासात असे दिसले कि, ज्या ट्विट चे छायाचित्र व्हायरल होत आहे त्यात शेफाली वैद्य यांच्या युजरनेम मध्ये ‘@’ आणि ‘Y’ हे दोन अक्षर खालून अर्धवट दिसले. हा फरक ठळकपणे दिसतो.

त्यानंतर आम्ही शेफाली वैद्य यांचे फेसबुक प्रोफाइल तपासले. त्यांच्या नावावर व्हायरल होत असलेले ट्विट चे छायाचित्र खोटे असल्याचे त्यांनी आपल्या प्रोफाइल वर स्पष्ट केले आहे.

तसेच त्यांनी हा ट्विट खोटे असल्याचे आपल्या ट्विटर प्रोफाइल वर देखील स्पष्ट केले आहे.

https://twitter.com/ShefVaidya/status/1316936428794896385

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही शेफाली वैद्य यांच्या सोबत संवाद साधला. विश्वास न्यूज सोबत बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट चे छायाचित्र खोटे आहे. जे लोकं मला फोल्लो करतात त्यांना पण माहिती आहे कि माझी इंग्रजी ह्या पेक्षा चांगली आहे. तसेच माझ्यासोबत असं पहिल्यांदा झालेलं नाही. पण, शेवटी सत्याचाच विजय होतो.”

शेवटी आम्ही ”Muslims of India’ या फेसबुक पेज चे सोशल स्कॅनिंग केले त्यात आम्हाला असे कळले कि, या पेज ला ३७,००४ लोकं फॉलो करतात आणि ३१,७९१ लोकांनी या पेज ला लाईक केले आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, लेखिका शेफाली वैद्य यांच्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट मॉर्फ्ड असल्याचे समजले. हे ट्विट चे छायाचित्र खोटे आहे. त्यांनी हे ट्विट शेअर केले नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट