विश्वास न्यूज च्या तपासात संजय राऊत ह्यांचे व्हायरल वक्तव्य खोटे असल्याचे समोर आले. लोकसत्ता ने शिव सेनेचे नेते राऊत ह्यांनी म्हंटले कि धनुष्य बाणाची निशाणी गेली तरी राष्ट्रवादीच्या निशाणी वर आम्ही निवडणूका लढू, असे वक्तव्य केले नाही. व्हायरल पोस्ट एडिटेड आहे.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): महाराष्ट्रातील राजकीय अराजक आणि बहुचर्चित शिवसेनेच्या राजकीय चिन्हाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असताना, शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत ह्यांचे एक विधान फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गमावल्यास राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे संजय राऊत यांनी विधान केल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या पोस्टचे श्रेय अग्रगण्य मराठी दैनिक लोकसत्ता यांनाही देण्यात आले आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात असे निष्पन्न झाले की संजय राऊत यांनी असे विधान केलेले नाही आणि लोकसत्ताने ते घेतलेले देखील नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, Sushant Yerondkar ह्यांनी हि पोस्ट शेअर केली आणि लिहले:
पूर्ण दुकान बंद होत नाही तो पर्यंत काय हे गप्प बसणार नाहीत.
उरलेल्या शिवसैनिकानो तयारीला लागा निवडणुकीच्या, साहेबांनी पर्याय निवडलाय….
ह्या पोस्ट मधल्या मजकुरात लिहले होते:
धनुष्यबाण निशाणी गेली तरी काही फरक पडत नाही. वेळ पडली तर शिवसेना पुढील सर्व निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणी वर लढेल.
हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा .
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात किवर्ड सर्च पासून केली.
आम्हाला टाइम्स ऑफ इंडिया च्या वेबसाईट वर एक बातमी सापडली, ज्याचे शीर्षक होते:
Maharashtra: Sanjay Raut says ‘apex court not in anyone’s pocket’.
आम्हाला कुठेच अशी बातमी दिसली नाही ज्यात राऊत ह्यांचे व्हायरल विधान असतील.
अजून एक बातमी आम्हाला आढळली, ज्याचे शीर्षक होते: ‘Sanjay Raut faces ire of rebels, Sainiks alike’
आम्हाला कुठेच व्हायरल पोस्ट सोबत संबंधित बातमी मिळाली नाही.
आम्ही Loksatta.com ची वेबसाईट देखील बघितली. आम्हाला व्हायरल बातमी कुठेच सापडली नाही.
आम्हाला ह्यांच्या फेसबुक पेज वर संजय राऊत ह्यांचे तेच व्हायरल चित्र सापडले. ह्या पोस्ट मधील मजकूर व्हायरल पोस्ट पेक्षा वेगळा होता.
आता हे स्पष्ट होते कि संजय राऊत ह्यांनी व्हायरल विधान केले नाही.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही ANI करस्पॉण्डेण्ट सौरभ जोशी ह्यांना संपर्क केला, ज्यांनी आधी पासून महाराष्ट्र राजकारण कव्हर केले आहे. त्यांनी सांगितले कि व्हायरल वक्तव्य राऊत ह्यांनी केले नाही.
आम्ही त्यानंतर लोकसत्ता च्या डिजिटल हेड ला संपर्क केला. योगेश मेहंदळे ह्यांनी स्पष्ट केले कि व्हायरल पोस्ट एडिटेड आहे. लोकसत्ता नि संजय राऊत ह्यांचे व्हायरल वक्तव्य घेतले नाही. हि पोस्ट खोटी आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही शिव सेनेच्या खासदार आणि प्रवक्ता प्रियांका चतुर्वेदी ह्यांना संपर्क केला त्यांनी देखील व्हायरल पोस्ट चा मजकूर खोटा असल्याचे संगीतले.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर चे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. आम्हाला कळले कि Sushant Yerondkar हे एका विशिष्ट विचारसरणीचे आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात संजय राऊत ह्यांचे व्हायरल वक्तव्य खोटे असल्याचे समोर आले. लोकसत्ता ने शिव सेनेचे नेते राऊत ह्यांनी म्हंटले कि धनुष्य बाणाची निशाणी गेली तरी राष्ट्रवादीच्या निशाणी वर आम्ही निवडणूका लढू, असे वक्तव्य केले नाही. व्हायरल पोस्ट एडिटेड आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923