विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि एबीपी न्यूज च्या नावावर व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट खोटा आहे. ह्या चॅनेल चा एक जुना स्क्रीनशॉट आता लोक एडिट करून 2022 च्या नावाने शेअर करत आहेत.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे. ह्यात एका चॅनेल चा जुना ओपिनियन पॉल एडिट करून आत्ताचा सांगून व्हायरल करण्यात येत आहे. ह्याला यूपी 2022 च्या निवडणुकांचे ओपिनियन पॉल म्हणून व्हायरल करण्यात येत आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि हि पोस्ट खोटी आहे. ह्या गोष्टीची पुष्टी स्वतः एबीपीच्या वरिष्ठ संपादकांनी केली आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर राघवेंद्र राजपूत ने ओपिनियन पोल चे एक चित्र शेअर केले आणि लिहले: अबकी बार अखिलेश भैया की सरकार।
चित्रात एबीपी न्यूज सर्वे लिहले होते आणि त्यात असे सांगितले होते कि 2022 च्या यूपी निवडणुकांमध्ये सपा ला 228 सीट मिळाल्या. जेव्हाकी पुढे लिहले होते 300+ पार ओपिनियन पोल.
ह्या पोस्ट चा कन्टेन्ट जसाच्या तसा इथे दिला आहे. ट्विटर सोडून फेसबुक वर देखील हि पोस्ट बरीच व्हायरल होत आहे. पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या तपासाची सुरुवात युट्युब पासून केली. इथे आम्ही संबंधित किवर्डस टाईप करून सर्च केले. आम्हाला सुरुवातीला एबीपी न्यूज च्या यूट्यूब चॅनेल वर अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला, ज्यात व्हायरल स्क्रीनशॉट सारखा कन्टेन्ट दिसला. ह्यात सांगितले होते यूपी 2012 चे निकाल. ह्यात पुढे म्हंटले होते कि 2012 च्या निवडणुकीत एसपी ला 228 जागा मिळाल्या. ह्या शिवाय दुसऱ्या पार्ट्यांना मिळालेल्या जागांचा निकाल देखील इथे सांगण्यात आला होता. हा पूर्ण व्हिडिओ इथे बघा.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने एबीपी च्या सोशल मीडिया अकाउंट ला स्कॅन करण्यास सुरुवात केली. आम्हाला एबीपी न्यूज च्या ट्विटर हैंडल वर ऑक्टोबर 8, 2021 चा एक ट्विट मिळाला. ह्यातील सर्वे प्रमाणे सांगण्यात आले होते कि यूपी मध्ये परत भाजप चंगी सरकार, सपा ला देखील फायदा.
व्हायरल पोस्ट आयामधी आम्ही एबीपी न्यूज च्या एडिटोरियल डिपार्टमेंट चे वरिष्ठ संपादक ह्यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि व्हायरल पोस्ट पूर्णपणे खोटी आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात कळले कि फेबूक यूजर, राघवेन्द्र राजपूत एका राजनेतिक दलाचे आहे. हा अकॉउंट फेब्रुवारी 2018 मध्ये बनवला गेला.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि एबीपी न्यूज च्या नावावर व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट खोटा आहे. ह्या चॅनेल चा एक जुना स्क्रीनशॉट आता लोक एडिट करून 2022 च्या नावाने शेअर करत आहेत.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923