Fact Check: प्रतिभा अडवाणी यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केल्याची अफवा सोशल मीडिया वर व्हायरल

भाजप चे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांची मुलगी प्रतिभा अडवाणी यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केल्याचा दावा खोटा आहे.

Fact Check: प्रतिभा अडवाणी यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केल्याची अफवा सोशल मीडिया वर व्हायरल

नवी दिल्ली (विश्वास न्युज): सोशल मीडिया वर बरेच यूजर्स, भारतीय जनता पार्टी (भाजप) चे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी, यांची मुलगी प्रतिभा अडवाणी यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केल्याचा दावा करत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा पूर्णपणे खोटा आढळला. प्रतिभा अडवाणी यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केले नाही.

काय होत आहे व्हायरल?
रजनीश के झा जे एक पत्रकार आहे, त्यांनी आपल्या फेसबुक प्रोफाइल वर पोस्ट करून (अर्काइव्ह लिंक) हा दावा केला, “लालकृष्ण अडवाणी जी यांची मुलगी प्रतिभा अडवाणी यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केले.”

अन्य काही यूजर्स ने देखील (अर्काइव्ह लिंक) यांनी प्रतिभा अडवाणी यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केल्याचा दावा करत सोशल मीडिया वर पोस्ट शेअर केले.

ट्विटर वर देखील बऱ्याच यूजर्स ने प्रतिभा अडवाणी यांच्या काँग्रेस पदार्पणाच्या दाव्याला शेअर केले.

तपास:

प्रतिभा अडवाणी या वरिष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सुपुत्री आहेत, जर त्यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केले तर ती नक्कीच एक मोठी बातमी ठरेल. पण विश्वास न्यूज ला आपल्या न्यूज सर्च मध्ये अशी कुठलीच बातमी आढळली नाही, ज्यात त्यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केल्याच्या दाव्याची पुष्टी होईल.

आम्ही इंग्लिश मध्ये ‘Praribha Advani’ हे कीवर्ड वापरले तरी आम्हाला कुठलीच बातमी सापडली नाही.

आमचे सहयोगी, दैनिक जागरण चे राष्ट्रीय ब्युरो प्रमुख आशुतोष झा यांच्या सोबत आम्ही संपर्क साधला त्यांनी हा दावा आधारहीन असल्याचे सांगितले, ते म्हणाले, “प्रतिभा अडवाणी यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केले हा दावा संपूर्णपणे खोटा आहे, यात कुठलेही तथ्य नाही.” यानंतर आम्ही लालकृष्ण अडवाणी यांच्या कार्यालय सोबत देखील संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “असे काहीच घडले नाही, हि फक्तआ एक अफवा आहे.”

असे पहिल्यांदा नाही झाले आहे, जेव्हा प्रतिभा अडवाणी यांच्या काँग्रेस मध्ये पदार्पण केल्याच्या बातम्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बऱ्याच यूजर ने दावा केला होता कि त्या काँग्रेस च्या तिकीट वर निवडणूक लढणार आहे. असा दावा केला गेला होता कि त्या काँग्रेस कडून गुजरातच्या गांधी नगर च्या उमेदवार राहतील.

भाजप चे प्रवक्ता तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी पण या दाव्याचे खंडन केले, आणि विश्वास न्यूज ला सांगितले, “प्रतिभा अडवाणी यांची काँग्रेस मध्ये पदार्पण केल्याचा दावा अफवा आहे. यात काहीच तथ्य नाही.”
व्हायरल पोस्ट शेअर करणारा यूजर एक पत्रकार आहे. त्यांच्या प्रोफाइल ला जवळपास ५००० लोक फोल्लो करतात.

निष्कर्ष: भाजप चे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांची मुलगी प्रतिभा अडवाणी यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केल्याचा दावा खोटा आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट