Fact Check: मिल्खा सिंह यांची मृत्यू झाल्याचे सांगत असलेली पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात मिल्खा सिंह यांच्या मृत्यू ची बातमी खोटी असल्याचे समजले. बातमी लिहली जात पर्यंत अर्थात ८ जून पर्यंत ते चंडीगढ़ च्या एका दवाखान्यात भरती होते.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर मिल्खा सिंह यांची मृत्यू ची अफवा लोकं शेअर करताना दिसत आहेत. यूजर्स दावा करत आहेत कि मिल्खा सिंह यांचे कोविड मुळे निधन झाले. आमच्या तपासात हि व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि मिल्खा सिंह हे कोविड झाल्याकारणाने, चंडीगढ़ च्या पीजीआई में एडमिट आहेत. बातमी लिहल्या जात पर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधार होता.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ‘अपना पागलखाना’ ने ६ जून रोजी एक पोस्ट शेअर केला आणि दावा केला: ‘दुःखद उड़न खटोला के नाम से प्रसिद्ध सिख मिल्खा सिंह जी कोविड से जंग हारे, विनम्र श्रद्धांजलि.
हि फेसबुक पोस्ट आणि याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
मिल्खा सिंह यांच्या मृत्यू च्या अफवेमागचं कारण शोधून काढण्यास विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी गूगल सर्च ची मदत घेतली. सर्च च्या वेळी आम्हाला एका वेबसाईट वर ते चंडगढ़ च्या पीजीआई मध्ये ऍडमिट असल्याची बातमी मिळाली. ५ जून रोजी जागरण डॉट कॉम वर पब्लिश झालेल्या या बातमीत सांगितले गेले आहे कि पीजीआइ डायरेक्टर प्रो. जगतराम ने एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले कि मिल्खा सिंह यांच्या प्रकृतीत बराच सुधार आहे. त्यांनी सांगितले कि तीन डॉक्टरची टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत आहे. त्यांची ऑक्सिजन लेवल देखील स्थिरावली आहे. पण अजूनही मिल्खा सिंह हे आयसीयू वॉर्ड मधेच आहेत. पूर्ण बातमी इथे वाचा.

आम्हाला त्यांचा मुलगा जीव मिल्‍खा सिंह यांचा देखील ४ जून रोजी केलेला एक ट्विट मिळाला. यात त्यांनी सांगितले कि मिल्खा सिंह हे दवाखान्यत भरती आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. मिल्खा सिंह यांची विचारपूस करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कॉल केला होता.

तसेच आम्हाला केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांचा देखील ट्विट मिळाला. ५ जून रोजी केलेल्या या ट्विट मध्ये त्यांनी मिल्खा सिंह यांच्या मृत्यू च्या बातमीचे खंडन केले.

https://twitter.com/KirenRijiju/status/1401103721308704770

अधिक माहिती साठी विश्वास न्यूज ने दैनिक जागरण चे स्‍पोर्ट्स एडिटर अभिषेक त्रिपाठी यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला दवाखान्यात भरती असलेल्या मिल्खा सिंह यांचे छायाचित्र आणि दवाखान्याचे स्टेटमेंट देखील पाठवले. त्रिपाठी यांनी सांगितले मिल्खा सिंह यांना कोविड झाल्या कारणाने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.

शेवटी आम्ही खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या पेज चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि फेसबुक पेज अपना पागलखाना ला तब्बल एक लाख लोकं फॉलो करतात. या पेज ला २३ मार्च २०१४ रोजी बनवले गेले.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात मिल्खा सिंह यांच्या मृत्यू ची बातमी खोटी असल्याचे समजले. बातमी लिहली जात पर्यंत अर्थात ८ जून पर्यंत ते चंडीगढ़ च्या एका दवाखान्यात भरती होते.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट