विश्वास न्यूज च्या टीम ला आपल्या फॅक्ट चेक मध्ये कळले कि सोशल मीडिया वर कॅडबरी मध्ये बीफ असल्याचा दावा करणारी पोस्ट खोटी आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर कॅडबरी च्या वेबसाईट वरून घेतलेला एक स्क्रीनशॉट खूप शेअर केला जात आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि कॅडबरी ‘हलाल’ प्रमाणित आहे आणि यात बीफ चा समावेश आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे समोर आले.
काय होत आहे व्हायरल?
दि लॉस्ट हिंदू नावाच्या फेसबुक यूजर ने 18 जुलाई 2021 रोजी Cadbury.com.au वेबसाईट चा एक स्क्रीनशॉट शेअर केला ज्यात लिहले होते:
If u are a Hindu and u like cadbury choclates then this is for u. These fckrs are using halal certified gelatine in these choclates which is derived from beef🤦♂ Cadbury Dairy Milk SILK – Have you felt Silk lately? Cadbury Celebrations
याच यूजर ने कॅडबरी च्या वेबसाईट चा स्क्रीनशॉट शेअर केला होता त्यात लिहले होते:
Please note, if any products contain gelatin in the ingredients, the gelatin we use is halal certified and derived from beef.
दुसरे यूजर देखील हि पोस्ट या स्क्रीनशॉट सह शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत कि भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी च्या प्रॉडक्ट मध्ये बीफ चा वापर करण्यात येत आहे. बरेच यूजर कॅडबरी चा बहिष्कार करण्यास देखील आवाहन करत आहेत.
व्हायरल पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने या व्हायरल पोस्ट चा तपास केला. आम्हाला तपासात स्क्रीनशॉट मध्ये, ‘.com.au’ हे डोमेन नेम दिसले. आम्ही हा अनुमान लावला कि हा डोमेन नेम ऑस्ट्रेलिया या देशाचा असावा. त्यानंतर आम्ही कॅडबरी ची ऑस्ट्रेलिया ची वेब्सिते बघितली. त्यात कळले कि व्हायरल स्क्रीनशॉट या वेबसाईट चा होता.
त्यानंतर आम्ही गूगल वर हे कीवर्ड सर्च केले. आम्हाला कॅडबरी डेअरी चा एक ट्विट मिळाला. ट्विट मध्ये भारतीय कॅडबरी मध्ये बीफ असल्याच्या दाव्याचे खंडन केले गेले आहे.
कॅडबरी डेअरी मिल्क प्रमाणे, भारतात निर्मिती करण्यात येणारे कॅडबरी चे सगळे प्रॉडक्ट्स १००% शाकाहारी आहेत. चॉकोलेट च्या ररॅपर वर असलेला हिरवा टिम्ब हे सूचित करतो. आणि स्क्रीनशॉट मध्ये सांगितलेली गोष्ट मोंडेलेज उत्पादकांसोबत संबंधित नाही. भारतात उत्पादित करण्यात येणारे सगळे प्रॉडक्ट्स १००% शाकाहारी आहेत.
कॅडबरी चा ट्विट व्हायरल स्क्रीनशॉट च्या उत्तरात आहे, त्यात लिहले आहे: अश्या नकारात्मक पोस्ट मुळे आमच्या ग्राहकांच्या विश्वासाला धक्का बसतो. आम्ही आमच्या ग्राहकांना आवाहन करतो कि आधी सगळे सत्य तपासून घ्या नंतरच त्यावर विश्वास ठेवा.
जेव्हा आम्ही कॅडबरी च्या स्वामित्व मोंडलेज इंटरनेशनल ला या व्हायरल मेसेज बद्दल स्पष्टीकरण मागितले त्यांनी ट्विटर च्या माध्यमातून सांगितले कि व्हायरल स्क्रीनशॉट भारतात निर्मित मोंडेलेज / कॅडबरी उत्पादकांसोबत संबंधित नाही. भारतात निर्मित सगळेच प्रॉडक्ट्स शाकाहारी आहेत. रॅपर वर असलेला ग्रीन डॉट हे सिद्ध करतं. अमेरिका मध्ये असलेल्या मोंडेलेझ ने कॅडबरी हे अधिग्रहण केले आहे.
आम्ही फेसबुक यूजर शीरम शॉ चे फेसबुक प्रोफाइल तपासले, त्यात कळले कि यूजर पश्चिम बंगाल चे रहिवासी आहेत.
(With support from Manish Kumar)
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या टीम ला आपल्या फॅक्ट चेक मध्ये कळले कि सोशल मीडिया वर कॅडबरी मध्ये बीफ असल्याचा दावा करणारी पोस्ट खोटी आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923