Fact check: स्वतःचीच मरणाची बातमी वाचतानाचा सुभाष चंद्र बोस यांचे छायाचित्र एडिटेड आहे

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला सोशल मीडिया वर एक सुभाष चंद्र बोस ह्यांचे चित्र व्हायरल होताना दिसले. ह्या चित्रात दावा करण्यात येत होता कि बोस हे स्वतःच्याच मृत्यूची बातमी वृत्तपत्रात वाचत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हे चित्र एडिटेड असल्याचे समोर आले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Bharata Chandra Dash ह्यांनी सुभाष चंद्र बोस ह्यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो अपलोड केला आणि इंग्रजीत त्यावर लिहले होते: What a collection…. share as much as possible

On 23rd April, 1945 Netaji Subhash Chandra Bose is reading the news of his death in a plane crash in a newspaper. The biggest lie by the British pet dog Congress.

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने एक साधे गूगल रिव्हर्स इमेज सर्च वापरले. ह्या सर्चमुळे आम्ही अनुज धर, ह्यांच्या ट्विटर प्रोफाइल वर पोहोचलो. त्यांनी असेच एक चित्र पोस्ट केले होते.

ह्या चित्रात कॅप्शन मध्ये लिहले होते: Subhas Chandra Bose reading Nippon Times (now The Japan Times), Japan’s largest and oldest English-language daily newspaper @japantimes

अर्थात: सुभाष चंद्र बोस हे निप्पोन टाइम्स (आता जपान टाइम्स), जपान आणि जगातील सगळ्यात जुना इंग्रजी न्यूजपेपर वाचताना.

जर ह्या चित्राला झूम केले तर लक्षात येईल कि बोस हे दुसरी बातमी वाचत होते, स्वतःच्या मृत्यूची नाही.

आम्हाला एडिटेड चित्र देखील अनुज धर ह्यांच्या प्रोफाइल वर मिळाले. त्यावर लिहले होते: Original picture with some reimagination by
@BiplabC2

पण @BiplabC2 हे अकाउंट सस्पेंडेड असल्याचे आमच्या तपासात समोर आले.

विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात सुभाष चंद्र बोस अभ्यासक, अंबरीश पुंडलिक ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले,“हे चित्र एडिटेड आहे, ज्याला असे भासवण्याकरिता बनवण्यात आले होते कि क्रॅश नंतर देखील बोस जिवंत आहेत. पण प्लॅन क्रॅश हा 23 एप्रिल ला नाही झाला 18 ऑगस्ट 1945 ला झाला. आणि बोस ह्यांचे ह्या तारखेनंतर एक पण छायाचित्र उपलब्ध नाही आहे. तसेच व्हायरल छायाचित्रात न्यूजपेपर मधील मजकूर बदलण्यात आला आहे.

विश्वास न्यूज ने फेसबुक यूजर, Bharata Chandra Dash ह्यांचे सोशल बॅकग्राऊण्ड चेक केले. त्यात कळले कि ते एक पत्रकार आहेत आणि, बालासोर येथे राहतात.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट