Fact Check: १ जुलै पासून रेल्वेच्या नियम बदलल्याचा नावावर व्हायरल होत आहे फेक पोस्ट

विश्वास न्यूज च्या तपासात १ जुलै पासून रेल्वे चे नियम बदलण्यात येतील असा दावा करणारी पोस्ट खोटी असल्याचे समजले. व्हायरल मेसेज खोटा आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर भारतीय रेल्वे च्या नियमांच्या नावावर एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात येत आहे कि १ जुलै पासून रेल्वे च्या १० नियमांमध्ये बदलाव होतील. यात वेटिंग लिस्ट पासून पपेरलेस तिकीट, राजधानी ट्रेन, रिफंड सारख्या नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले. रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील हि पोस्ट खोटी असल्याचे सांगितले.

काय होत आहे व्हायरल?
बऱ्याच फेसबुक यूजर्स ने हि पोस्ट शेअर करून दावा केला कि १ जुलै पासून रेल्वे चे १० नियम बदलण्यात येतील. यात फक्त कन्फर्म तिकीट देण्याचे बोलले आहे. या शिवाय तिकीट रद्द करण्यास ५० टक्के राशी मिळण्याची गोष्ट देखील केली आहे.
असेच काही नियम बदल्याचे या पोस्ट मध्ये सांगितले गेले आहे. या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी गूगल सर्च ची मदत घेतली कारण जर असे महत्वाचे बदल करण्यात आले असते तर याची बातमी नक्कीच आली असती. आम्हाला काही जुन्या बातम्या मिळाल्या, ज्यात व्हायरल दाव्याचा वापर करून सांगण्यात आले होते कि ते फेक आहेत. आणि रेल्वे नि नियमनध्ये काहीच बदलाव केले नाहीत. पूर्ण बातमी इथे वाचा.

तपासाच्या वेळी आम्हाला हे देखील कळले कि हाच मेसेज काही वर्षांआधी व्हायरल झाला होता. आम्हाला २०१५ व्हायरल झालेला हाच मेसेज देखील मिळाला. तो इथे बघा.

या तपासादरम्यान आम्हाला  रेल मंत्रालय कडून ३० जून २०१७ रोजी जारी केलेले एक प्रेस नोट मिळाली . त्यांनी व्हायरल मेसेज चे खंडन केले आणि सांगितले कि रेल्वे नियमांमध्ये बदल करण्यात आले असा दावा करणारी पोस्ट निराधार आहे. ती तुम्ही इथे वाचा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने  भारतीय रेलवे च्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यांच्या सोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. सेंट्रल रेलवे च्या सीपीआरओ शिवाजी सुतार ने संगितले कि रेल्वे कडून असे काहीच जाहीर करण्यात आले नाही आहे, जो दावा व्हायरल मेसेज मध्ये करण्यात येत आहे. तसेच वेस्‍टर्न रेलवे च्या वड़ादेरा डिविजन च्या पीआरओ खेमराज मीणा यांनी देखील सांगितले कि असे कुठलेच नोटिफिकेशन जारी करण्यात आले नाही. पुणे रेल डिविजन चे पीआरओ मनोज झवर यांनी देखील व्हायरल मेसेज खोटा असल्याचे सांगितले.

 

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात १ जुलै पासून रेल्वे चे नियम बदलण्यात येतील असा दावा करणारी पोस्ट खोटी असल्याचे समजले. व्हायरल मेसेज खोटा आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट