Fact Check: नोबेलिस्ट ल्यूक मोन्टैग्नियर ने नाही म्हंटले कोविड वॅक्सीन लावणारे दोन वर्षाच्या आत मरतील, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि नोबेलिस्ट ल्यूक मोन्टैग्नियर यांनी लसीकरणावर केलेले विधान कि लस घेतलेले लोकं दोन वर्षाच्या आत मृत्युमुखी पडतील हे खोटे आहे. ल्यूक मोन्टैग्नियर यांच्या कथित इंटरव्यू मध्ये आलेले विधान आणि दावे, “कोरोनाव्हायरस चे व्हेरिएन्ट वॅक्सीन मुळे बनले आहे.” तसेच ह्या व्हायरस द्वारे बनवलेल्या अँटोबॉडीस आहेत ज्या इन्फेक्शन ला मजबूत करतात, हे दोन्ही दावे चुकीचे आहे. वॅक्सीनमुळे व्हायरस चे म्युटेशन किंवा व्हेरिएन्ट बनत नाही. शरीरातील अँटीबॉडीस मुळे व्हायरस आपले स्वरूप बदलू शकतो पण शरीरात अँटोबॉडीस फक्त व्हायरस बनवत नाही. म्हणून हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि निराधार आहे, वॅक्सीन मुळे कधीच व्हेरिएन्ट बनत नाही आणि म्युटेशन होत नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): फ्रेंच नोबेलिस्ट ल्यूक मोन्टैग्नियर च्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि रेयर फाउंडेशन यूएसए द्वारा अनुवादित आणि प्रकाशित एका इंटरव्यू मध्ये मोन्टैग्नियर ने म्हंटले कि ज्या लोकांनी कोरोनाव्हायरस चे वॅक्सीन लावले आहे, त्यांच्या वाचण्याची काही शक्यता नाही आणि दोन वर्षाच्या आताच त्यांची मृत्यू हू शकते. पोस्ट मध्ये एका बातमी सोबत मोन्टैग्नियर यांचे विकिपीडिया पेज देखील बघितले जाऊ शकते. विश्वास न्यूज ने ल्यूक मोन्टैग्नियर कडून इंटरव्यू च्या माध्यमातून केलेल्या डाव्यांचा एका नंतर एक तपास केला. त्यांनी दावा केला कि, ‘कोरोनाव्हायरसचे नवे व्हेरिएन्ट हे वॅक्सीन मुळे आले आहे आणि हे व्हायरस द्वारे बनवले गेलेले अँटीबॉडीस आहेत आणि ते इन्फेक्शन ला मजबूत करतात. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हे दावे निराधार आहेत.

नोबेलिस्ट ल्यूक मोन्टैग्नियर यांनी हे म्हंटले नाही कि वॅक्सीन घेतलेल्या लोकांचे दोन वर्षाच्या आत मृत्यू होतील, ना हे दावे खरे आहेत. व्हायरल पोस्ट सोबत ज्या lifesitenews.com ची लिंक देण्यात आली आहे, त्या बातमीत देखील आम्हाला हे विधान मिळाले नाही. या शिवाय हे दावे देखील निराधार आहेत. शरीरात अँटीबॉडीस मुळे व्हायरस आपले स्वरूप बदलू शकतो, पण शरीरात अँटीबॉडीस फक्त वॅक्सीन बनवत नाही. WHO ने देखील या पोस्ट चे आणि दाव्यांचे खंडन केले आहे.

काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बरेच यूजर या पोस्ट ला शेअर करत आहेत. त्यातील एक यूजर आहेत सुब्रता चटर्जी, त्यांनी या पोस्ट मध्ये लिहले:
अनुवादित: सगळ्याच लस घेणाऱ्या लोकांचे २ वर्षांच्या आत मृत्यू होतील नोबेल पुरस्कार विजेता ल्यूक मॉन्टैग्नियर ने असे सांगितले आहे कि ज्या लोकांनी वॅक्सीन घेतले त्यांच्या वाचण्याची शक्यता नाही आहे. या आश्चर्यचकित करणाऱ्या इंटरव्यू मध्ये सांगण्यात आले आहे त्या लोकांची वाचण्याची काहीच शक्यता नाही आहे आणि त्याचा काही उपचार पण नाही आहे. आपण सगळ्या शवांना भस्म करण्यास तयार असायला हवे. वॅक्सीन च्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिक प्रतिभा आणि अन्य प्रमुख वायरोलॉजिस्ट यांनी या दाव्यांचे समर्थन केले आहे. हे सगळे अँटीबॉडी निर्भर वृत्ती ने मारतील आणि काहीच म्हण्टले जाऊ शकत नाही. “हि एक खूपच मोठी चूकी आहे, है ना
एका वैज्ञानिक त्रुटी सह चिकित्सा त्रुटी देखील. हि एक अस्वीकार्य चुकी आहे, “मॉन्टैग्नियर ने काल रेयर फाउंडेशन यूएसए द्वारे अनुवादित आणि प्रकाशित एका इंटरव्यू मध्ये म्हंटले, “इतिहासातील पुस्तके हे सांगतील कि हे लसीकरण आहे जे व्हेरिएन्ट बनवत आहेत. बरेच महामारी वैज्ञानिकांना हे माहिती आहे आणि एंटीबॉडी-निर्भर वृद्धि च्या रूपात असलेल्या या समस्येबद्दल सगळे चूप आहेत.

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल होत असलेल्या या पोस्ट चा तपास विश्वास न्यूज ने दोन भागात केला. पहिल्या भागात आम्ही व्हायरल पोस्ट मधील फ्रेंच नोबेलिस्ट ल्यूक मोन्टैग्नियर यांचा दावा कि वॅक्सीन लावल्याच्या दोन वर्षातच लोकं मृत्युमुखी पडतील याचा तपास केला तर दुसऱ्या मार्गात फ्रेंच नोबेलिस्ट ल्यूक मोन्टैग्नियर यांच्या इंटरव्यू चा तपास केला, जो आता व्हायरल होत आहे.

दावा १:
पोस्ट सोबत lifesitenews.com ची लिंक देण्यात आली आहे आणि पोस्ट मध्ये लिहले आहे कि ल्यूक मोन्टैग्नियर ने आपल्या इंटरव्यू मध्ये म्हंटले, “ज्या लोकांनी कोविड वॅक्सीन घेतले त्यांची वाचण्याची शक्यता नाही, वॅक्सीन घेतलेल्या लोकांचा दोन वर्षातच मृत्यू होईल.”

फॅक्ट:
फ्रेंच भाषेत असलेल्या या ल्यूक मोन्टैग्नियर च्या इंटरव्यू ला यूएसएच्या रेयर फाउंडेशन ने अनुवादित केले होते आणि १८ मे २०२१ रोजी आर्टिकल पब्लिश केले होते. या इंटरव्यू च्या भरवश्यावर हा दावा केला जात आहे. पण पूर्ण इंटरव्यू मध्ये व्हायरल दाव्यासारखे कुठलेच विधान नाही. इंटरव्यू मध्ये नोबेलिस्ट ने म्हंटले आहे, “वॅक्सीन पासूनच व्हेरिएन्ट बनले आहे आणि म्हणूनच ज्या देशांमध्ये वॅक्सीन लावण्यात येत आहे तिथे जास्ती मृत्यू झाले आहेत. याच विधानाला खोटे रूप देण्यात आले आहे. रेयर फाउंडेशन चे हे पूर्ण आर्टिकल तुम्ही इथे वाचू शकता.

व्हायरल पोस्ट सोबत lifesitenews.com च्या न्यूज चे लिंक दिले गेले आहे. आम्हाला इथे पण हा दोन वर्षात मृत्यू होणार दावा नाही मिळाला. २५ मे २०२१ रोजी रेयर फाउंडेशन ने आर्टिकल पब्लिश करताना या गोष्टीचे खंडन केले होते कि नोबलिस्ट मोन्टैग्नियर यांनी दोन वर्षात मृत्यू होण्याबद्दल कुठले विधान केले नाही.

विश्वास न्यूज ने अधिक माहिती साठी रेयर फाउंडेशन च्या फाउंडर एमी मेक यांना ट्विटर वरून संपर्क केले. त्यांनी संगीतले कि ल्यूक मोन्टैग्नियर च्या नावाने जे वक्तव्य व्हायरल होत आहे ते चुकीचे आहे, त्यांनी रेयर फाउंडेशन सोबत या बाबतीत खंडन केल्याचे एक ट्विट आणि आर्टिकल देखील शेअर केले.

तसेच डब्लूएचओ ने देखील या बाबतीत विश्वास न्यूज ला सांगितले कि हे विधान चुकीचे आहे आणि वर्तमान वैज्ञानिकांच्या प्रमाणावर आधारित नाही आहे. वॅक्सीन ने २५ पेक्षा जास्ती रोगांना रोखून लाखो लोकांचे प्राण वाचवले आहे.

दावा २:
तपासाच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही ल्यूक मोन्टैग्नियर यांच्या इंटरव्यू च्या माध्यमातून केलेल्या दाव्यांचे तपास केले. त्यांनी पहिला दावा केला, “कॉरोन चे नवीन व्हेरिएन्टस वॅक्सीन मुळे आले आहे आणि हे व्हेरिएन्टस वॅक्सीन साठी प्रतिरोधी आहे”
फॅक्ट:
भारतात पहिले वॅक्सीन १६ जानेवारी २०२१ रोजी लागले, जेव्हाकी मिनिस्ट्री ऑफ बायोटेक्नोलॉजीच्या वेबसाईट वर दिलेल्या माहिती प्रमाणे, इंडिया मध्ये म्युटंट झालेल्या या व्हायरल चा B.1.617 चा पहिला केस महाराष्ट्रात ७ डिसेंबर २०२० रोजी रजिस्टर करण्यात आला.

ह्या दाव्याच्या पुष्टी साठी आम्ही अशोका यूनिवर्सिटी, त्रिवेदी स्कूल ऑफ़ बायोसाइंस चे डायरेक्टर वायरोलॉजिस्ट डॉक्टर शाहिद जमील यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि ल्यूक मोन्टैग्नियरच्या याच इंटरव्यू वर त्यांनी thewire.in साठी एक इंटरव्यू लिहला आहे तिथून सगळी माहिती मिळू शकते. २७ मे २०२१ रोजी प्रकाशित या आर्टिकल मध्ये स्पष्ट लिहले गेले होते, “व्हायरस समवेत सगळ्याच जीवांचे म्युटेशन होतात. हे आरएनए व्हायरस सारख्या कोरोनाव्हायरस, इन्फ्लुएंझा व्हायरस इत्यादी साठी विशेष रूपात खरे आहे. म्हणूनच त्यांचे परिवर्तन होते. इम्म्युन प्रतिक्रिया हि एक मजबूत निवड बल आहे जे फक्त SARS-CoV-2 नाही तर सगळ्या व्हायरस च्या विकासासाठी इवैलुएट करतात. तसेच B.1.617 व्हेरिएन्ट च्या टाइमलाईन ला सांगून लिहले गेले आहे, “हि टाइमलाईन या दृष्टिकोनाला नाकारते कि वॅक्सीन मुळे व्हेरिएन्ट ची उत्पत्ती होते.” हा संपूर्ण आर्टिकल तुम्ही इथे वाचू शकता.

जागरण न्यू मीडिया चे सिनिअर एडिटर प्रत्युष रंजन यांनी ल्यूक मॉन्टैग्नियर द्वारा केलेल्या दाव्यांवर आईसीएमआर चे डॉ. अरुण शर्मा यांच्यासोबत वार्तालाप केला. डॉ अरुण शर्मा आईसीएमआर के नेशनल इंस्टीट्यूट फॉर इम्प्लीमेंटेशन रिसर्च ऑन नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ (जोधपुर) चे डायरेक्टर आहेत. ते कॅम्म्युनिटी मेडिसिन एक्स्पर्ट पण आहे. व्हायरल पोस्ट मध्ये केलेल्या दाव्यांवर डॉ शर्मा यांनी उत्तरे दिलीत.

प्रश्ण: वॅक्सीनच व्हेरिएन्ट बनवते का? नवे व्हेरिएन्ट वॅक्सीन मुले बनत आहेत का?
उत्तर: हा एक निराधार दावा आहे, या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कुठलाच वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाही.

प्रश्ण: व्हायरल व्हेरिएन्ट बनवता येतात का, जे वॅक्सीन प्रतिरोधी असू शकतात?
उत्तर: हे संभव आहे, व्हायरस स्वतःचा व्हेरिएन्ट स्वतः बनवतो. परंतु हे म्हणणे चुकीचे ठरेल कि हे लस किंवा लसीकरणामुळे हे वेरिएन्टस येतात.

प्रश्ण: हा व्हायरस वॅक्सीन द्वारे निर्मित अँटीबॉडी आहे, जी संक्रमण वाढवते, जर आपण कॉवीड बद्दल असे विधान केले तर हे किती योग्य ठरेल.
उत्तर: हा एक खूपच निराधार दावा आहे, आणि आतापर्यंत कॉवीड -१९ लसीकरणाच्या असे बघितले गेले नाही. सगळ्यांनीच जास्ती विचार ना करता, लसीकरणाला गेले पाहिजे आणि आवश्यकतेनुसार दोन्ही डोसेस घेतले पाहिजे. तसेच सगळ्या गाईडलाईन्स चे पालन करण्यात आले पाहिजे.
तुम्ही डॉ. शर्मा यांच्या सोबत कॉवीड-१९ आणि लसीकरण यावर जागरण डायलॉग चा एक्सकॅलुसीव्ही इंटरव्यू इथे बघू शकता.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही अधिक माहिती गोळा करण्यासाठी न्यूज सर्च केले, त्यात आम्हाला 16 मार्च 2021 रोजी medpagetoday च्या वेबसाईट वर पब्लिश झालेले एक आर्टिकल सापडले. त्यात डेरेक लोव, पीएचडी होल्डर यांचा साइंस ट्रांसलेशनल मेडिसिन ब्लॉग ‘इन द पाइपलाइन’ मध्ये दिलेल्या माहिती वरून सांगण्यात आले होते, “COVID-19 लस च्या डेव्हलोपमेंट च्या सुरुवातीला, वैज्ञानिकांनी SARS-CoV-2 प्रोटीन ला टार्गेट करण्याची मागणी केली होती. ज्याने ADE होण्याची संभावना कमी होती. उदाहरणासाठी, जेव्हा त्यांना कळले कि SARS-CoV-2 चे न्यूक्लियोप्रोटीन ला टार्गेट केल्यास ADE हू शकतो, त्यांनी लगेच अँप्रोच सोडून दिला. सगळ्यात सुरक्षित उपाय स्पाइक प्रोटीन च्या S2 सबयूनिट ला टार्गेट करणे दिसत होते आणि म्हणूनच त्यांनी या अप्रोच ला बढावा दिला.

“वैज्ञानिकांनी एडीई च्या शोधासाठी जनावरांवर अभ्यास केला. त्यांनी याचा शोध ह्यूमन ट्रेल्स वापरून केला आणि इमरजेंसी ऑथोराइज़ेशन सोबत कोविड वॅक्सीन चा रियल वर्ल्ड डेटा देखील शोधण्यास सुरु केला. जेव्हाकी अजून पर्यंत याचे लक्षण बघितल्या गेले नाही. खरे तर याच्या विपरीत होत आहे.”
हे संपूर्ण आर्टिकल इथे वाचा.

ल्यूक मॉन्टैग्नियर यांना Françoise Barré-Sinoussi आणि Harald Zur Hausen सोबत २००८ मध्ये ह्यूमन इम्युनोडिफिशिएंसी वायरस (एचआईवी) च्या शोधासाठी फिजियोलॉजी या मेडिसिन मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते. मॉन्टैग्नियर नेहमीच एका कॉंट्रोव्हर्सी चा भाग असतात. एप्रिल २०२० मध्ये त्यांनी म्हंटले होते कि चायना च्या वुहान लैब मधून कोरोनाव्हायरस ची निर्मिती झाली होती. हि बातमी इथे वाचा.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि नोबेलिस्ट ल्यूक मोन्टैग्नियर यांनी लसीकरणावर केलेले विधान कि लस घेतलेले लोकं दोन वर्षाच्या आत मृत्युमुखी पडतील हे खोटे आहे. ल्यूक मोन्टैग्नियर यांच्या कथित इंटरव्यू मध्ये आलेले विधान आणि दावे, “कोरोनाव्हायरस चे व्हेरिएन्ट वॅक्सीन मुळे बनले आहे.” तसेच ह्या व्हायरस द्वारे बनवलेल्या अँटोबॉडीस आहेत ज्या इन्फेक्शन ला मजबूत करतात, हे दोन्ही दावे चुकीचे आहे. वॅक्सीनमुळे व्हायरस चे म्युटेशन किंवा व्हेरिएन्ट बनत नाही. शरीरातील अँटीबॉडीस मुळे व्हायरस आपले स्वरूप बदलू शकतो पण शरीरात अँटोबॉडीस फक्त व्हायरस बनवत नाही. म्हणून हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि निराधार आहे, वॅक्सीन मुळे कधीच व्हेरिएन्ट बनत नाही आणि म्युटेशन होत नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट