केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने टोल टॅक्सबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा आणि बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वीही हा दावा व्हायरल झाला होता, ज्याचे परिवहन मंत्रालयानेही खंडन केले होते.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): टोल टॅक्सशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्ट, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा हवाला देत दावा करत आहे, “जर तुम्हाला 12 तासांची स्लिप मिळाली आणि त्या वेळेत परत आला तर तुम्हाला कोणताही टोल टॅक्स भरावा लागणार नाही.” व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये नितीन गडकरींचा फोटोही वापरण्यात आला आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा आणि बनावट असल्याचे आढळून आले. नितीन गडकरी यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Vithalbhai Vaghasiya’ ने 14 जानेवारी 2023 रोजी एक पोर्ट शेअर केली त्यात लिहले होते, “आप टोल प्लाजा पे पर्ची कटवाते हो तो वो पूछता है कि एक साइड की दू या दोनों साइड की तो मित्रों में आपको बता दूं की आप उन्हें कहें कि पर्ची 12 घंटे की दो ना कि डबल या सिंगल साइड अगर आप 12 घंटे में वापस आ सकते हो तो आपको कोई टोल नहीं लगेगा पर्ची पर भी समय लिखा होता है…जानकारी के अभाव में हम लोगों से टोल प्लाजा वाले चोर बाजारी करके हर रोज लाखों रुपया हजम कर रहे है..आप सबसे मेरी दरख्वास्त है कि इस सन्देश को सब लोगों के पास पहुंचाए और जनता को जागरूक करें।”धन्यवाद निवेदक : नितिन गडकरी भारत सरकार। “
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही संबंधित कीवर्ड (Toll charges, 12 hour, Nitin Gadkari etc.) च्या मदतीने दावा शोधला. आम्हाला आढळले की हा दावा यापूर्वीही व्हायरल झाला आहे. हा दावा खोटा असल्याचा दावा करणाऱ्या अनेक बातम्या आम्हाला आढळल्या.
आम्हाला परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दाव्याशी संबंधित एक ट्विट आढळले. 28 डिसेंबर 2018 रोजी, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने ट्विट केले आणि व्हायरल दावा नाकारला होता. या ट्विटमध्ये मंत्रालयाने या संदेशाचा संदर्भ देत याला चुकीचे म्हटले आहे. ट्विट येथे पाहता येईल.
नितीन गडकरी त्यांच्या विभागाशी संबंधित नवीनतम अपडेट्स त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करतात, म्हणून आम्ही त्यांचे सोशल मीडिया हँडल देखील शोधले. आम्हाला येथे दाव्याशी संबंधित कोणतीही पोस्ट आढळली नाही.
यापूर्वीही ही पोस्ट सोशल मीडियावर अशाच दाव्याने व्हायरल झाली होती, ज्याची विश्वास न्यूजने चौकशी केली होती. तुम्ही आमची पूर्वीची तथ्य तपासणी कथा येथे वाचू शकता.
निष्कर्ष काढण्यासाठी, आम्ही अरविंद कुमार, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा NHAI यांच्याशी संपर्क साधला. आम्ही व्हायरल दावा त्यांच्याशी शेअर केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे.
शेवटी आम्ही ही पोस्ट शेअर करणाऱ्या वापरकर्त्याची चौकशी केली. तपासात समोर आले की युजर हा गुजरातचा रहिवासी आहे आणि युजरचे फेसबुकवर 184 मित्र आहेत.
निष्कर्ष: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने टोल टॅक्सबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा आणि बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वीही हा दावा व्हायरल झाला होता, ज्याचे परिवहन मंत्रालयानेही खंडन केले होते.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923