Fact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली होती, व्हायरल दावा खोटा

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. बऱ्याच बॉलीवूड कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर जनरल बिपिन रावत ह्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत, ह्यांच्या पत्नीसह 13 जवानांना देशाने गमावले. ही बातमी ज्या कोणी ऐकली, त्याचे डोळे पाणावले आणि त्यांनी CDS बिपिन रावत यांच्यासह सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यासंदर्भातील एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की बॉलीवूड सेलिब्रिटींनी जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली नाही. अक्षय कुमारपासून ते सलमानपर्यंत त्यांनी जनरल बिपिन रावत यांच्याबाबत एकही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलेली नाही. विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट जारी करून जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Sandeep Arya यांनी ट्विट केले आणि लिहिले की कोणत्याही बॉलिवूड कलाकारांनी सीडीएस बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे का. राष्ट्राच्या सुख-दु:खात सहभागी नसताना आपण या अभिनेत्यांना सुपरहिरो, हिरो, सम्राट बनवून एवढा आदर का देतो?

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. फेसबुक वर अनेक लोकं हा दावा शेअर करत आहेत.

तपास:
व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डद्वारे गूगल वर शोध घेतला. ह्या दरम्यान आम्हाला 9 डिसेंबर 2021 रोजी प्रकाशित झालेला दैनिक जागरणची एक रिपोर्ट मिळाली. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे, अनिल कपूर, सलमान खान, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी जनरल बिपिन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात, आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींची सोशल मीडिया प्रोफाईल्स शोधण्यास सुरुवात केली. यादरम्यान, आम्हाला अनिल कपूर, सलमान खान, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर जनरल बिपिन रावत यांच्याशी संबंधित अनेक ट्विट आढळले.

अधिक माहितीसाठी, आम्ही मुंबईतील दैनिक जागरणच्या एंटरटेनमेंट बीट कव्हर करणाऱ्या स्मिता श्रीवास्तव ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

तपासाअंती, आम्ही Sandeep Arya या ट्विटर वापरकर्त्याचे सोशल स्कॅनिंग केले ज्याने ही पोस्ट शेअर केली. स्कॅनिंगवरून आम्हाला कळले की संदीप आर्य या यूजरला ट्विटरवर हजाराहून अधिक लोक फॉलो करतात. हे खाते मे 2021 पासून ट्विटर वर सक्रिय आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. बऱ्याच बॉलीवूड कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर जनरल बिपिन रावत ह्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट