Fact Check: हत्यार जप्त केल्याचे हे छायाचित्र जुने आहे, याचा RSS सोबत काहीच संबंध नाही

विश्वास न्यूज च्या तपासात संघाच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे कळले. संघाच्या कार्यालयावर छापा पडून हत्यार सापडल्याचा दावा निराधार आहे. हे छायाचित्र आधी देखील व्हायरल झाले होते.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एका परत तीन छायाचित्रांचे कॉलाज एका खोट्या दाव्यासह व्हायरल होताना दिसत आहे. यात हत्यारांचे विविध छायाचित्र दिसतात. दावा केला जात आहे कि दिल्ली मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या एका कार्यालयात छापा मारून हे हत्यार जप्त करण्यात आले.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात हा दावा खोटा असल्याचे समजले. या आधी देखील हे छायाचित्र विविध दाव्यांसह व्हायरल झाले आहेत. त्यांचा तपास देखील विश्वास न्यूज ने केला आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज The Real Hero’s Of Nation ने २३ मार्च रोजी एका पोस्ट मध्ये दावा केला कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या ठिकाणांवर छापा मारून पोलिसांनी हत्यार जप्त केले. यूजर ने इंग्रजीत दावा केला आहे: Extensive raid in Delhi. Police were shocked to find * weapons * seized from RSS hideouts. Society still needs to think about why so many weapons were stockpiled in the Indian capital. * Understand eating “crops by the fence”. Who are the traitors? Who are the communal terrorists? People need to evaluate. For an impartial inquiry Police assistance from outside Delhi should be sought. Chowkidar speaks nothing!
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
संघाच्या नावावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांमागचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूज ने तिन्ही छायाचित्रांचा वेग-वेगळा तपास केला. सगळ्यात आधी आम्ही पहिले छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च मध्ये टाकून सर्च केले. सर्च च्या वेळी आम्ही flicker वर असलेल्या एका लिंक पर्यंत पोहोचलो. तिथे आम्हाला बरेच छायाचित्र मिळाले. हा अकाउंट कृपाण फैक्ट्री या नावाने आहे. आम्ही फॅक्टरी चे मालक बच्चन सिंह यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल छायाचित्र त्यांच्या दुकानाचे आहे. पहिले देखील हे छायाचित्र बऱ्याच वेळा व्हायरल झाले आहे.

दुसरे छायाचित्रामागचे देखील आम्ही सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही यासाठी देखील गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. आम्हाला @GujratHeadline नावाच्या ट्विटर हॅन्डल वर काही छायाचित्र मिळाले. ५ मार्च २०१६ रोजी केलेल्या ट्विट मध्ये सांगितले गेले कि राजकोट च्या नॉवेलटी स्टोर मध्ये हत्यार मिळाले. आम्हाला छायाचित्रात पोलीस कर्मचारी, हत्यार आणि पोलीस स्टेशन देखील दिसले, जे व्हायरल छायाचित्रात आहे. हे तुम्ही इथे बघू शकता.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही तिसऱ्या छायाचित्राचे देखील सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला देखील आम्ही रिव्हर्स इमेज सर्च मध्ये टाकून सर्च केले. एन्डेक्स इमेज सर्च मध्ये कळले कि @mehrzadalavinia नावाच्या इंस्टाग्राम यूजर द्वारे हे छायाचित्र शेअर केले गेले होते. त्यांनी हे छायाचित्र १७ एप्रिल २०१९ रोजी अपलोड केले होते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संपर्क केला. दिल्ली चे प्रवक्ता, राजीव तुला यांनी सांगितले कि संघाला बदनाम करण्यासाठी हा खोटा पोस्ट व्हायरल करण्यात आला आहे. व्हायरल पोस्ट मध्ये दिलेल्या छायाचित्रांचा संघासोबत काहीच संबंध नाही.

शेवटी आम्ही फेसबुक पेज The Real Hero’s Of Nation चा तपास केला. या अकाउंट ने खोटी पोस्ट व्हायरल केली होती. आम्हाला कळले कि ह्या पेज ला ७९५ लोकं फॉलो करतात. हा पेज या वर्षी २७ फेब्रुवारी रोजी बनवला गेला.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात संघाच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे कळले. संघाच्या कार्यालयावर छापा पडून हत्यार सापडल्याचा दावा निराधार आहे. हे छायाचित्र आधी देखील व्हायरल झाले होते.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट