Fact Check: गायीच्या तस्करीच्या नावाखाली व्हायरल केले जात आहे ब्राझीलचे छायाचित्र, खोटा दावा करून पश्चिम बंगालचा असल्याचे सांगून व्हायरल
विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत असे आढळून आले आहे की, कत्तलखान्याच्या व्हायरल होत असलेल्या छायाचित्राचा भारताशी कोणताही संबंध नाही. हा फोटो ब्राझीलमधील एका शहरातील असून दहा वर्षांहून अधिक जुना आहे. जुनी आणि परदेशी छायाचित्रे खोटा दाव्यासह भारताशी जोडून प्रचार म्हणून शेअर केली जात आहेत.
- By: Umam Noor
- Published: Jun 24, 2024 at 05:47 PM
- Updated: Jul 19, 2024 at 05:07 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). एका कत्तलखान्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल फोटो भारत-बांग्लादेशमध्ये गायीच्या तस्करीच्या संदर्भात वापरकर्त्यांकडून शेअर केला जात आहे. फोटो शेअर करताना वापरकर्ते दावा करत आहेत की हा पश्चिम बंगालमधील एका कत्तलखान्याचा फोटो आहे.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत असे आढळून आले आहे की, कत्तलखान्याच्या व्हायरल होत असलेल्या छायाचित्राचा भारताशी कोणताही संबंध नाही. हा फोटो ब्राझीलमधील एका शहरातील असून दहा वर्षांहून अधिक जुना आहे. जुनी आणि परदेशी छायाचित्रे खोटा दाव्यासह भारताशी जोडून प्रचार म्हणून शेअर केली जात आहेत.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
व्हायरल फोटो शेअर करताना एका फेसबुक वापरकर्त्यानेने लिहिले की, ‘पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गाईच्या तस्करीवर भारत सरकारचे मौन बरेच काही सांगून जाते, आम्ही जिला पवित्र मानतो त्या गायीच्या तस्करीमुळे आमच्या धार्मिक भावना खूप दुखावल्या जातात. या परिसरात माता गायींची तस्करी झाल्यास गोंधळ माजेल.’
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
तपासणी
आमची तपासणी सुरू केल्यानंतर आम्ही सर्वप्रथम गुगल लेन्सच्या माध्यमातून व्हायरल फोटोचा शोध घेतला. आम्हाला हा फोटो 26 जुलै 2016 रोजी इटलीतील एका वेबसाइटवर कत्तलखान्याबद्दलच्या एका लेखात सापडला. आम्हाला हा फोटो दुबईच्या एका न्यूज वेबसाइटवर 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखातही सापडला.
अधिक तपास करून आम्ही जुलै 2016 पूर्वी गुगल टाइम टूलवर हा फोटो शोधण्यास सुरुवात केली आणि आम्हाला हा फोटो मार्च 2022 मध्ये नॅशनल जिओग्राफिक वेबसाइटवर अपलोड केलेला आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो George Steinmentz ने घेतला आहे.
अधिक तपास करून, आम्ही George Steinmentz चा शोध घेतला आणि त्याच नावाची एक वेबसाइट सापडली. त्याच्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, तो नॅशनल जिओग्राफिकचा फोटोग्राफर आहे. आम्ही त्यांच्या वेबसाइटवर विविध कीवर्डसह व्हायरल फोटो शोधण्याचा प्रयत्न केला.
शोध घेतल्यानंतर आम्हाला या व्हायरल फोटोशी मिळता-जुळता एक फोटो अपलोड केलेला आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो ब्राझीलच्या माटो ग्रोसो दो सुलमधील जेबीएस कत्तलखान्याचा आहे. त्याच वेळी, या फोटोच्या कॉपीराइट 2013 मध्ये George Steinmentz च्या नावावर लिहिल्याचे आढळले, म्हणजेच हा फोटो 2013 मध्ये ब्राझीलमध्ये घेण्यात आला होता.
व्हायरल पोस्टशी संबंधित पुष्टीकरणासाठी, आम्ही आमचे सहकारी दैनिक जागरणमधील पश्चिम बंगालच्या वरिष्ठ पत्रकार सुमिता जैस्वाल यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनीही पुष्टी केली की हा फोटो पश्चिम बंगालचा नाही.
बनावट पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याच्या सोशल स्कॅनिंगमध्ये, आम्हाला आढळले की वापरकर्त्यांद्वारे बहुतेक वैचारिकदृष्ट्या प्रेरित पोस्ट शेअर केल्या जातात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत असे आढळून आले आहे की, कत्तलखान्याचे जे छायाचित्र व्हायरल होत आहे त्याचा भारताशी कोणताही संबंध नाही. हा फोटो ब्राझीलमधील एका शहराचा असून दहा वर्षांहून अधिक जुना आहे. जुनी आणि परदेशी छायाचित्रे खोटा दाव्यासह भारताशी जोडून प्रचार म्हणून शेअर केली जात आहेत.
- Claim Review : हा फोटो पश्चिम बंगालमधील एका कत्तलखान्याचा आहे.
- Claimed By : FB User- Abhay Jaisawal
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.