'विश्वास न्यूज'ने केलेल्या त्यांच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे. हा फोटो बाबरी मशिदीचा नसून कर्नाटकातील जामा मशिदीचा आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). एका मशिदीचा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल फोटो शेअर करत वापरकर्ते दावा करत आहेत की, हा बाबरी मशिदीचा खूप जुना फोटो आहे, जो फार कमी लोकांनी पाहिला असेल. हा फोटो, श्रद्धेशी जोडून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.
‘विश्वास न्यूज’ने केलेल्या त्यांच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे. हा फोटो बाबरी मशिदीचा नसून कर्नाटकातील जामा मशिदीचा आहे.
एका फेसबुक वापरकर्त्याने व्हायरल झालेला फोटो शेअर केला होता, ज्यावर लिहिले होते, “अस्सलामू अलैकुम, बाबरी मशिदीचा फोटो फार कमी लोकांनी पाहिला असेल, जर हा फोटो पसंत आला तर, माशा अल्लाह लिहा.”
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
आमचा तपास सुरू करताना, सर्वप्रथम आम्ही गुगल लेन्सद्वारे व्हायरल फोटोचा शोध घेतला. शोध घेतल्यानंतर आम्हाला हा फोटो एका ट्रॅव्हल वेबसाइटवर अपलोड केलेला आढळला. तिथे दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो कर्नाटकातील जामा मशिदीचा आहे.
याच आधारावर आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि आम्हाला हा फोटो अलामी डॉट कॉम एजन्सीवर सापडला. इथे दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो कर्नाटकातील गुलबर्गा येथील जामा मशिदीचा आहे.
gulbargadiocese.org या संकेतस्थळावर या मशिदीसंबंधित दिलेल्या माहितीनुसार, जामा मशीद गुलबर्गा ही मशीद, कर्नाटक राज्यातील गुलबर्गा शहरात आहे. जामा मशीद गुलबर्गाचे निर्माण, मुहम्मद शाह पहिला (शासनकाळ 1358-75) यांनी गुलबर्गाला बहमनी सल्तनतची राजधानी बनवल्याचा स्मरणार्थ केले होते.
हा फोटो यापूर्वी व्हायरल झाला होता आणि त्यावेळी आम्ही दैनिक जागरण अयोध्या ब्युरोचे प्रमुख रामशरण अवस्थी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी सांगितले होते की, व्हायरल पोस्टमध्ये वापरलेला हा फोटो, अयोध्येतील बाबरी मशिदीचा नाही.
दिशाभूल करणारी ही पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक पेजचे आम्ही सोशल स्कॅनिंग केले. आम्हाला आढळले की, या पेजचे दहा लाखाहून अधिक सदस्य आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने केलेल्या त्यांच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. हा फोटो बाबरी मशिदीचा नसून, कर्नाटकातील जामा मशिदीचा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923