नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केशरी रंगाची बस दिसत आहे, ज्यावर बसचा मार्ग क्रमांक 420 लिहिलेला आहे. सोबत विधान सौधा ते परप्पाना अग्रहार असे लिहिले आहे. पोस्टच्या वर पॉलिटिशियन स्पेशल असे लिहिले आहे. पोस्टच्या माध्यमातून भ्रष्ट राजकारण्यांना टोमणे मारले जात आहेत.
विश्वास न्यूजला त्यांच्या फॅक्ट चेकमध्ये बसचे चित्र प्रत्यक्षात एडिट केले गेल्याचे आढळून आले. बंगळुरूमध्ये मार्ग क्रमांक 420वर कोणतीही बस नाही. मूळ फोटो मार्ग क्रमांक 365च्या बसचा आहे.
फेसबुक वापरकर्ता बालासुब्रमण्यम बी. के. ने फोटो पोस्ट केला आहे आणि सोबत लिहिले आहे, “पहिल्यांदीच, सत्तारूढ़ काँग्रेस सरकारद्वारा बंगळुरूमध्ये एक बस मार्गाची पूर्णपणे योजना तयार करण्यात आली आहे… स्रोत ते गंतव्यापर्यंत. मार्ग क्रमांक 420 विधान सौधा ते … ते …परप्पाना अग्रहारा (सेंट्रल जेल). वाईट वाटून घेऊ नका पॉलिटिशियन स्पेशल आहे।”
येथे पोस्ट आणि संग्रहित आवृत्ती पाहा.
या पोस्टचा तपास करण्यासाठी, आम्ही प्रथम गुगल रिव्हर्स इमेजवर हा फोटो शोधला. आम्हाला हा फोटो BMTC Volvo Bus नावाच्या फेसबुक पेजवर प्रोफाइल फोटो म्हणून सापडला. त्याला 8 मे 2010 रोजी अपलोड करण्यात आले होते. पण या फोटोतील मार्ग क्रमांक 365 होता, 420 नाही. त्यासोबत कन्नडमध्ये नॅशनल पार्क लिहिण्यात आले होते.
आम्हाला मार्ग क्रमांक 365चा हा फोटो इतर अनेक वेबसाइट्सवर देखील सापडला होता.
मूळ फोटो आणि एडिट केलेला फोटो यातील फरक खालील कोलाजमध्ये पाहता येईल.
आता हे स्पष्ट झाले होते की, व्हायरल फोटो एडिट करण्यात आला होता, परंतु आम्हाला माहित करून घ्यायचे होते की, बंगळुरूमध्ये 420 मार्ग बस आहे का? आम्ही संपूर्ण BMTCच्या संपूर्ण वेबसाइटवर शोध घेतला पण त्या मार्गावर एकही बस आढळली नाही.
त्यानंतर आम्ही विधानसभे (कन्नड भाषेत विधान सौधा)पासून बंगळुरूमधील परप्पना अग्रहारा येथील मध्यवर्ती कारागृहापर्यंतचा मार्ग शोधला. या मार्गावर एकही बस नाही, असे सांगण्यात आले. विधान सौधा ते परप्पाना अग्रहरापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी 2 वेळा बस बदलावी लागते.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, 420चा संदर्भ भारतात फसवणूकीशी संबंधित आहे. छळ किंवा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर आयपीसीचे कलम 420 लागू केले जाते.
आम्ही या प्रकरणाबाबत पीआरओच्या बीएमटीसीच्या अरियन्ना यांच्याशीही बोललो. त्यांनी देखील पोस्ट बनावट आणि एडिट केल्याचे सांगितले. तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूजने व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या बालसुब्रमण्यम बी.के. या फेसबुक वापरकर्त्याच्या सोशल साइटची चौकशी केली. आम्हाला आढळले की, वापरकर्ता चेन्नईचा आहे आणि त्याचे 3000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
निष्कर्षः विश्वास न्यूजला त्यांच्या फॅक्ट चेकमध्ये बसचे छायाचित्र एडिट केले असल्याचे आढळले. मूळ फोटो मार्ग क्रमांक 365 वरील बसचा आहे. बेंगळुरूमध्ये मार्ग क्रमांक 420 वर एकही बस नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923