Fact Check: डॉन न्यूज ने नाही केले हे आर्टिकल पब्लिश, व्हायरल होत आहे फेक पोस्ट

विश्वास न्यूजने तपासात डॉन न्यूजच्या नावाने प्रसारित केलेला हा स्क्रीनशॉट बनावट असल्याचे आढळून आले आहे. डॉन न्यूजने अशी कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सध्या पाकिस्तानच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या एपिसोडमध्ये, डॉन न्यूजच्या लेखाचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की पाकिस्तानमध्ये आलेला पूर हवामान बदलामुळे नाही तर लोक कुराण वाचत नसल्यामुळे आहे. विश्वास न्यूजने तपासात डॉन न्यूजच्या नावाने प्रसारित केलेला हा स्क्रीनशॉट बनावट असल्याचे आढळून आले आहे. डॉन न्यूजने अशी कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर ने एक न्यूज स्टोरी चा स्क्रीनशॉट शेअर केला ज्यात डॉन न्यूज चे वृत्तपत्र दिसते, तसेच हेडलाईन मध्ये लिहले आहे, मराठी अनुवाद: “पाकिस्तानात आलेला पूर हवामान बदलामुळे आलेला नाही तर लोक कुराण वाचत नाहीत म्हणून आले आहेत.”
ह्या बातमी च्या स्क्रीनशॉट सोबत काही दृश्य म्हणजेच पुराचे काही चित्र देखील दिसतात.

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

डॉन न्यूजच्या नावाने व्हायरल झालेल्या या स्क्रीनशॉटमध्ये 27 ऑगस्ट 2022 ही तारीख लिहिली आहे आणि बातमी लिहिणाऱ्या पत्रकारांमध्ये सलीम शाहिद, मंजूर अली, इफ्तिखार-ए खान यांची नावे दिसत आहेत.

तपास सुरू करण्यासाठी आम्ही डॉन न्यूजच्या वेबसाइटवर गेलो आणि तिथे कीवर्डच्या आधारे बातम्या शोधून आमचा शोध सुरू केला. शोधात आम्हाला 27 ऑगस्ट 2022 ची बातमी सापडली, ज्यामध्ये पुराशी संबंधित तीच व्हायरल छायाचित्रे वापरली गेली आहेत आणि या पत्रकारांची नावे व्हायरल पोस्टमध्ये लिहिली आहेत. या बातमीचा मथळा आहे, ‘केपीला पुराचा धोका असल्याने लष्कराला बोलावले.’

आम्हाला ही बातमी 27 ऑगस्ट 2022 च्या पहिल्या पानावर ई-पेपरवर देखील मिळाली. येथे हे देखील स्पष्टपणे दिसून येते की मूळ शीर्षक संपादित केले गेले आहे आणि बनावट केले आहे.

एडिटेड आणि मूळ बातम्यांचे स्क्रीनशॉट यातील फरक स्पष्टपणे दिसून येतो.

आम्हाला डॉन न्यूज वेबसाइटवर व्हायरल स्क्रीनशॉट खोटा म्हणून संबोधल्याची बातमी देखील मिळाली. 30 ऑगस्ट 2022 रोजी प्रकाशित झालेली बातमी, “पाकिस्तानमधील विनाशकारी पुराबद्दल डॉन न्यूजचा संपादित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रसारित केला जात आहे. डॉनचा मूळ अहवाल 27 ऑगस्ट रोजी वृत्तपत्रात ‘केपीला पुराचा धोका असल्याने लष्कराला बोलावण्यात आले.’ या मथळ्यासह प्रसिद्ध झाला होता.

पुष्टीकरणासाठी, आम्ही डॉन न्यूजच्या डीएन (डायरेक्टर न्यूज) जाहिद मजहरशी संपर्क साधला आणि त्याच्यासोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. त्याने आम्हाला पुष्टी केली की स्क्रीनशॉट बनावट आहे.

त्यात तीन पत्रकारांची नावे आहेत ज्यात बातमी संपादित करून व्हायरल केली जात आहे. त्यापैकी आम्ही मंजूर अली यांच्याशी ट्विटरद्वारे संपर्क साधला आणि व्हायरल पोस्टचा हवाला देऊन त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांच्या बातमीची हेडलाइन संपादित केली गेली आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि डॉन न्यूज व्हायरल स्क्रीनशॉटच्या मथळ्यासारखा फॉन्ट देखील वापरत नाही.

फेक पोस्ट शेअर करणार्‍या फेसबुक वापरकर्त्याच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की आलोक शर्मा हा वापरकर्ता फेसबुकवर खूप सक्रिय आहे आणि त्याचे 199 फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपासात डॉन न्यूजच्या नावाने प्रसारित केलेला हा स्क्रीनशॉट बनावट असल्याचे आढळून आले आहे. डॉन न्यूजने अशी कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट