Fact Check: भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी ह्यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारा खोटा लेटर पॅड व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले भदोहीचे भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी यांचे लेटरपॅड बनावट आहे. खुद्द आमदारानेच राजीनाम्याचा बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांच्या वतीने एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): निवडणुकीपूर्वी नेत्यांची पक्ष बदलण्याची वेळ आली आहे. भाजपचे काही आमदारही सपामध्ये दाखल झाले आहेत. असे असताना भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी यांच्या नावाचा लेटरपॅड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भदोहीचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांनी भाजपचा राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत आहे. लेटरपॅडवर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे लिहिले आहे.

विश्वास न्यूजच्या तपासात लेटरपॅड बनावट असल्याचे आणि दावा खोटा असल्याचे आढळले. भदोहीचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांनी स्वत: या लेटरपॅडला खोटे असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसात एफआयआरही दाखल केला आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज Sagar Sharma वर 12 जानेवारी रोजी हा लेटरपॅड पोस्ट करून दावा करण्यात आला: एक और विकेट अखिलेश यादव जी के नाम अखिलेश जी बीजेपी को ऑल आउट करने पर तुले है…भदोही से विधायक रवींद्र नाथ त्रिपाठी ने भी दिया इस्तीफा…

फेसबुक वर इतर यूजर देखील हि पोस्ट शेअर करत आहे.

तपास:
व्हायरल दावा तपासण्यासाठी, आम्ही प्रथम कीवर्डसह गूगल वर सर्च केले. यामध्ये 12 जानेवारी रोजी जागरणमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची लिंक मिळाली. यानुसार लेटरपॅड व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी यांनी पत्रकार परिषद घेऊन ते बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. यामागे कोणत्या तरी बड्या नेत्याचे कारस्थान असल्याचे आमदाराने सांगितले आहे. ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत त्यांनी ज्ञानपूर कोतवाली येथे गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक जागरणमधील भदोहीच्या अंकात १३ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेले वृत्त.
दैनिक जागरणमधील भदोहीच्या अंकात 14 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेली बातमी.

यानंतर आम्ही आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांचे ट्विटर अकाउंटही सर्च केले. यामध्ये आमदाराचा 12 जानेवारीचा ट्विट केलेला (संग्रहित) व्हिडिओ सापडला आहे. त्यात ते म्हणतात, आता मला समजले आहे की, काही खोडकर घटकांनी आमच्या लेटरपॅडवर टाईप करून, जो आमचा लेटरपॅड नाही, आमची सहीही नाही, त्यावर कोणीतरी समाजात दिशाभूल करणारी परिस्थिती पसरवण्याचे काम केले आहे. हे लेटरपॅड कट रचून व्हायरल करण्यात आले आहे. ज्या आयडीसोबत ते जोडले आहे त्यावर कडक कारवाई करावी, अशी माझी पोलिस-प्रशासनाकडे मागणी आहे. मी भाजपचा सैनिक असून त्यात आमची निष्ठा आहे.

https://twitter.com/Ravindranathbjp/status/1481115200702980097

याबाबत आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांच्याशी विश्वास न्यूज ने चर्चा केली. ते म्हणाले, हे लेटरपॅड बनावट आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत गुन्हाही दाखल केला आहे. आमदाराने एफआयआरची प्रत विश्वास न्यूजलाही पाठवली.

भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी यांचे बनावट लेटरपॅड पोस्ट करणारे सागर शर्मा हे फेसबुक पेज आम्ही स्कॅन केले. हे एका राजकीय पक्षाच्या विचारसरणीने प्रेरित आहे. 21 ऑक्टोबर 2019 रोजी बनवलेल्या या पेजला 1 लाख 44 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.

निष्कर्ष: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले भदोहीचे भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठी यांचे लेटरपॅड बनावट आहे. खुद्द आमदारानेच राजीनाम्याचा बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांच्या वतीने एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट