Fact Check: विराट कोहली नाही होणार ‘भारत जोडो यात्रेत’ सहभागी, व्हायरल दावा खोटा

विराट कोहली ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभागी होत नाहीये. विश्वास न्यूजने तपास केला असता हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. सोशल मीडिया वापरकर्ते खोटा दावा करून पोस्ट शेअर करत आहेत.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रे’ने अर्धे अंतर कापले आहे. या प्रवासात राहुल गांधींना अनेक सेलिब्रिटींची साथ मिळत आहे. मध्य प्रदेशात राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज सातवा दिवस आहे. दरम्यान, विराट कोहली राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सामील होत असल्याचा दावा करत विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. विराट कोहली मध्य प्रदेशात राहुल गांधींसोबत सामील होणार असल्याचा दावा अनेक यूजर करत आहेत. विश्वास न्यूजने तपास केला असता हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. कोहली अद्याप ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभागी झाला नसल्याचे तपासात आढळून आले आहे. बातम्यांनुसार, कोहली 1 डिसेंबरपासून टीम इंडियासोबत बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर ‘दिनेश विशवकर्मा’ ने 24 नोव्हेंबर रोजी व्हायरल पोस्ट शेअर केली आणि लिहले: दुनिया के सर्वश्रेष्ठ बल्लेबाज और सच्चे देशभक्त विराट कोहली भी होंगे भारत जोडो यात्रा में शामिल।

पोस्ट ला खरे समजून बाकी यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हायरल दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही विविध कीवर्ड वापरून गूगल वर शोधले, परंतु दाव्याशी संबंधित कोणतेही विश्वसनीय मीडिया अहवाल सापडले नाहीत. विराट कोहली खरोखरच ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभागी झाला असता तर तो नक्कीच चर्चेत आला असता.

अधिक तपास करत आम्ही विराट कोहलीचे सोशल मीडिया हँडल स्कॅन केले. दरम्यान, विराट कोहली ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सामील होत असल्याची पुष्टी करण्यासाठी व्हायरल दाव्याशी संबंधित कोणतीही पोस्ट आम्हाला सापडली नाही.

शोध दरम्यान, आम्हाला कळले की न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. विराट कोहली 1 डिसेंबरला टीम इंडियासोबत बांगलादेशला रवाना होणार असून वनडे मालिकेतील पहिला सामना 4 डिसेंबरला खेळवला जाणार आहे. जे विराट कोहलीच्या ‘भारत जोडो यात्रे’मधील सहभागाचे संकेत देत नाही.

विराट कोहली ‘भारत जोडो यात्रे’शी जोडले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही कोहली ‘भारत जोडो यात्रे’ला पाठिंबा देत असल्याच्या दाव्यासह एक फोटो शेअर करण्यात आला होता. त्यानंतर विश्वास न्यूजने या व्हायरल दाव्याची सत्यता तपासली होती. तुम्ही आमचे पूर्वीचे अन्वेषण येथे वाचू शकता.

याबाबत आम्ही दैनिक जागरणचे क्रीडा प्रतिनिधी अभिषेक त्रिपाठी यांच्याशी बोललो. तो म्हणतो, ‘व्हायरल झालेला दावा खोटा आहे. विराट कोहली ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभागी होणार नाही.

अधिक माहितीसाठी आम्ही नायदुनिया डिजिटलचे प्रभारी अरविंद दुबे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. राहुल गांधींच्या मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेत विराट कोहलीच्या सहभागाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. हे खोटे सोशल मीडियावर पसरवले जात आहे.

तपासाअंती बनावट पोस्ट टाकणाऱ्या युजरची चौकशी करण्यात आली. युजर मध्य प्रदेशातील नीमच येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. फेसबुकवर युजरला 213 लोक फॉलो करतात. वापरकर्त्याचे 5000 पेक्षा जास्त मित्र आहेत.

निष्कर्ष: विराट कोहली ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभागी होत नाहीये. विश्वास न्यूजने तपास केला असता हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. सोशल मीडिया वापरकर्ते खोटा दावा करून पोस्ट शेअर करत आहेत.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट