Fact Check: सुप्रिया सुळेंचे एडिटेड चित्र होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात, सुप्रिया सुळे ह्यांचे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचे चित्र एडिटेड असल्याचे समोर आले. व्हायरल दावा खोटा आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: Sep 26, 2022 at 12:37 PM
- Updated: Sep 26, 2022 at 02:01 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चालू असलेला वाद आता सोशल मीडिया वर आला आहे. नुकतेच विश्वास न्यूज ला एक राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या सुप्रिया सुळे ह्यांचे एडिटेड चित्र व्हायरल होतानादिसले . ह्यात त्या महाराष्ट्र मुख्यमंत्रयांच्या खुर्चीत बसलेल्या दिसतात. विश्वास न्यूज च्या तपासात हे चित्र एडिटेड असल्याचे समोर आले.
काय होत आहे व्हायरल?
एकनाथ शिंदेच्या गटातील शिव सेनेच्या प्रवक्ता, शीतल म्हात्रे, ह्यांनी एडिटेड चित्र ट्विटर वर शेअर करून लिहले: हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ??
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
आम्ही तपासाची सुरुवात पोस्ट वरचे कमेंट्स वाचण्यापासून केली. बऱ्याच लोकांनी त्यात हि पोस्ट खोटी असल्याचे म्हंटले होते.
त्यानंतर आम्ही, सुप्रिया सुळे ह्यांच्या चित्राचा तपास करण्यास सुरु केले. त्यात आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च आणि गूगल लेन्स चा वापर केला. आम्हाला हे चित्र Hon. Supriya Tai Sule Fan Club ह्या पेज चे प्रोफाइल पिक्चर असल्याचे समजले.
ह्यात खरे चित्र देखील होते.
आम्हाला हे चित्र सुप्रिया सुळे ह्यांच्या वेरिफाइड पेज वर देखील सापडले.
हे चित्र कुठल्या मीटिंग चे नाही तर कार्यक्रमाचे वाटत होते.
त्यांनी औरंगाबाद मध्ये झालेल्या ह्याच कार्यक्रमाचे काही चित्र देखील शेअर केले होते.
आम्ही त्यानंतर मीटिंग च्या चित्राचा तपास केला.
खऱ्या चित्रात मधली खुर्ची रिकामी होती, बऱ्याच राष्ट्रवादी च्या नेत्यांनी हे चित्र शेअर केले होते.
खरे चित्र अदिती नलावडे ह्यांनी शेअर केले होते. हे चित्र मोदी ह्यांनी घेतलेल्या कोविड मधील ऑनलाईन मीटिंग चा आहे.
तपासाच्या पुढील टप्प्यात विश्वास न्यूज ने राष्ट्रवादी चे नेते, जगदीश पंचबुधे ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल चित्र खोटे आणि एडिटेड आहे. त्यांनी म्हण्टले कि, “हा वादविवाद तेव्हा सुरु झाला जेव्हा, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ता, रविकांत वर्पे ह्यांनी एकनाथ शिंदे ह्यांच्या मुलाचा मुख्यमंत्री खुर्चीत बसल्याचा फोटो शेअर केला होता. ह्या गोष्टीला प्रतिउत्तर म्हणून आता शिंदे गटाकडून एडिटेड चित्र शेअर करण्यात येत आहे.”
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने शीतल म्हात्रे चे बॅकग्राउंड चेक केले. त्यात कळले कि त्या पूर्व नगरसेविका आणि शिव सेनेच्या प्रवक्ता आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, सुप्रिया सुळे ह्यांचे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचे चित्र एडिटेड असल्याचे समोर आले. व्हायरल दावा खोटा आहे.
- Claim Review : सुप्रिया सुळेंचे चित्र
- Claimed By : Sheetal Mhatre
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.