X
X

Fact Check: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्यांचे व्हायरल चित्र एडिटेड आहे, व्हायरल पोस्ट खोटी आहे

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्यांचे व्हायरल चित्र एडिटेड आहे. हे इराणी ह्यांचे जुने चित्र नाही.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला भारताच्या महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी ह्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असलेला एक फोटो दिसला. या इमेजमध्ये इराणी बेली डान्सर म्हणून दाखवण्यात आल्या आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हे चित्र एडिटेड असल्याचे समोर आले, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची ही जुनी प्रतिमा नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, विकास कैमरी अंबेडकरवादी ह्यांनी व्हायरल चित्र शेअर केले आणि हिंदी मध्ये लिहले: आँखों में अजीब सा धुंधलापन है कोई बताएगा ये क्या अंधभक्तों की मम्मी इमरती ईरानी है

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आम्ही आमचा तपास, व्हायरल चित्र गूगल रिव्हर्स इमेज मध्ये चित्र शोधण्यापासून केली.

आम्हाला असे भासले जणू ह्या चित्रावर एक फिल्टर लावण्यात आले होते, हे चित्र जुने असल्याचे दाखवण्यासाठी.

आम्हाला खरे चित्र tripadvisor.com वर सापडले.

ह्या दोन्ही चित्रात साम्य होते.

ह्या चित्राच्या कॅप्शन मध्ये लिहले होते, ‘Photo: Belly Dancer on the Turkish BBQ night’

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे चित्र एडिटेड आहे आणि स्मृती इराणी ह्यांच्याबद्दल दुष्प्रचार करण्याच्या हेतूने हे चित्र बनवण्यात आले आहे.

तपासाच्या शेवट्च्या टप्प्यात आम्ही विकास कैमरी अंबेडकरवादी ह्यांचे सोशल बॅकग्राउंड चेक केले. त्यात आम्हाला कळले कि त्यांना 8.9 हजार लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्यांचे व्हायरल चित्र एडिटेड आहे. हे इराणी ह्यांचे जुने चित्र नाही.

  • Claim Review : स्मृती इराणी चे चित्र
  • Claimed By : विकास कैमरी अंबेडकरवादी
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later